आपण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात स्वतःला पॉझिटिव ठेवू शकत नाही.
सोनाली जे.
आपली सकारात्मकता किंवा नकारात्मकता ही कुटुंब, समाज , मित्र – मैत्रिणी ,आजूबाजूचे वातावरण , मीडिया , सोशल मीडिया, शाळा कॉलेज मधून मिळणारे शिक्षण , अनुभव या सगळ्यांवर आपली सकारात्मकता अवलंबून असते.
सुरुवातीला पहिल्यांदा येणारा जो अनुभव असतो तो कटू असेल मग तो घरातला असेल ..एखादे कोणी बोलले ..ओरडले , मारले असे असेल, मैत्री मधला कटू अनुभव , वास्तवाशी जुळवून घेताना चां अनुभव , या सगळ्यांवर आपली सकारात्मकता किंवा नकारात्मकता अवलंबून असते.
एखादी व्यक्ती किती ही सकारात्मक असेल तरी प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात स्वतःला पॉझिटिव ठेवू शकत नाही.
याची कारणे काय ?
१. अचानक होणारे अनपेक्षित बदल. : – व्यवस्थित रूटीन सुरू असते. Comfort zone मध्ये व्यक्ती अतिशय स्थैर्य , आनंद असेल किंवा जे असेल त्यात सेट होवून जगत असतो. अचानक आणि आणि अनपेक्षित बदल घडले की मात्र माणूस स्वतःला पॉझिटिव ठेवू शकत नाही.
जसे कुटुंबात कोणाचे अचानक निधन , आर्थिक नुकसान , हुशार असून ही पेपर अवघड जाणे , नापास होणे कारण अभ्यासक्रम खूप अवघड आणि आपेक्षे पेक्षा वेगळे प्रश्न येणे. तर कधी प्रेमभंग , नोकरी जाणे , आर्थिक नुकसान , दीर्घ आजारपण , एखादा मोठा अपघात ..शारीरिक व्यंग निर्माण होणे , असे काही ही कारणे असू शकतात.
२. काही प्रसंग असे क्लिष्ट येतात किंवा अवघड असतात अशा प्रसंगात स्वतःला पॉझिटिव ठेवू शकत नाही. माझीच मुलगी भाव्या NCC camp करिता गेली . दहा दिवसांचा कॅम्प ..जाताना प्रचंड उत्साहाने गेल्या .. सासवड , दौंड पुण्याच्या आसपास हुंन ४०० मुली कॅम्प करिता आल्या. त्यात ज्युनिअर या. Senior होत्याच शिवाय..
दहा दिवसांचा NCC camp .पहिल्या दोन दिवस खरेच खूप अवघड गेले . कारण एव्हढे दिवस घर सोडून जाण्याचा पहिला अनुभव , तिथली कडक शिस्त, पहाटे ३.३० पासून होणारी दिवसाची सुरुवात. आवरून पहाटे ४.३० वाजता ग्राउंड वर सगळ्यांची हजेरी, ग्राउंड ला पाच round पळत मारायचे . मग exercise, breakfast तो ही ठराविक वेळेत च. त्यानंतर experts कडून मिळणारी लेक्चर्स ती ही कुठे छान सावली , रूम मध्ये पंख्याखाली नाहीत तर भर उन्हात ग्राउंड वर..
Breakfast ठराविक वेळेतच मिळणार. जेवण ठराविक वेळेतच .त्यानंतर कॅन्टीन बंद. दिवसभर एव्हढे कष्ट आणि दमणूक त्यात हे आवडत नाही ते नाही ..असल्या आवडी निवडी राहिल्याचं नाहीत. जे मिळेल ते खायच.
पहिल्या दोन दिवसात अक्षरशः रडलेल्या या सगळ्या मुली, घरातल्या सर्वांच्या पासून लांब , कडक शिस्त , पहाटे ३.३० ला उठायचे. ४.३० ला reporting. त्यात मोबाईल घेवून गेल्या तरी मोबाईल ही काढून घेतले. त्यातून आलेली insecurity. ग्राउंड वर दिसणारे मोठे साप , फिरणारी झुरळे .. या सगळ्याची भीती च बसली. या चारशे मुलींमध्ये आधी पूर्ण सकारात्मकता होती. पण हे जे अनपेक्षित वागणे होते. किंवा तिथल्या कडक शिस्तीच्या वातावरणात टिकणे अवघड वाटणाऱ्या या मुली.
कॅम्प करिता येण्यापूर्वी आणि इतर वेळी कायम positive असणाऱ्या , कायम सकारात्मक विचार करणाऱ्या या मुली पहिल्या दोन दिवसात मनातून खूप खचल्या , नकारात्मक विचार वाढले. इथे कडक शिस्त , particular असणे गरजेचे . खूप अवघड आहे हा कॅम्प. त्यातून काही मुली कॅम्प सोडून गेल्या. काही डोकेदुखी आणि ताप येवून आजारी पडल्या . याचे कारण मन खंबीर राहू शकले नाही. मनातून आपल्याला हे जमणार नाही हेच विचार येत होते आणि त्याचा परिणाम शरीरावर ही झाला. मन आणि शरीराने खचल्या त्या.
त्यातून त्यांनी कॅम्प मधून माघार घेतली.त्या घरी परत गेल्या.
माझी मुलगी भाव्या ही दुसरे दिवशी खूप रडली. फोन काढून घेतले. तिलाही insecure वाटले. दुसरे दिवशी बरेच पालक भेटायला गेले. मी गेले नाही पण तिला भरपूर खावू पाठवला. आणि एक पत्र लिहून पाठविले. त्यात तिला केवळ एकच आठवण करून दिली . तू ठरविलेले स्वप्न तुला साकारण्याची संधी मिळाली आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये हार मानू नकोस. जेव्हा असे वाटेल हा शेवट तेव्हा तीच सुरुवात समज आणि परत जिद्दीने प्रयत्न कर. तुझ्यात त्या क्षमता आहेत. त्याचा योग्य वापर कर. Patience ठेव. हा अनुभव तुला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. खात्री आहे तुझ्याबद्दल की तू पूर्ण प्रयत्न करणार.
ती आणि बाकी मुली टिकल्या कारण त्यांनी त्याही कठीण प्रसंगात मन आणि शरीराने खंबीर राहायचे ठरविले. त्यांनी कॅम्प पूर्ण करणारच .. किती ही कष्ट पडो, त्रास होवो पण कॅम्प पूर्ण करणार हा निश्चय केलेला त्यावर ठाम राहिल्या. चार पाच दिवसांनी जेव्हा भेटायला गेले तेव्हा तिचं मुळूमुळू रडणारी माझी मुलगी भाव्या आणि तिच्या मैत्रिणी एकदम confident दिसत होत्या. सगळ्या गोष्टी आनंदाने आणि उत्साहाने करत होत्या. यातून जाणविले की आता पुढे कोणतेही कॅम्प त्या निश्चित पूर्ण करतील. आणि हेच नाही तर आयुष्यात कितीही खडतर प्रसंग आले तरी त्या धैर्याने तोंड देतील याचा विश्वास निर्माण झाला. आपण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात स्वतःला पॉझिटिव ठेवू शकत नाही. हेच यावरून दिसून येते.
आणि प्रत्येक प्रसंगात स्वतः ला positive ठेवायचे असेल तर भविष्यात काय होईल याचा विचार करू नका. आजचा दिवस मी किती सामर्थ्याने आणि प्रयत्नपूर्वक पार पाडला.प्रचंड मेहनत, शिस्त , कष्ट आणि सातत्य प्रयत्न हे जिद्दीने सुरू ठेवून तो दिवस पार पाडला . त्यातून किती आनंद मिळविला..हे विचार करा. लक्षात घ्या.
आज अनेक मुलींना कॅम्प मध्ये येण्याची संधी ही मिळाली नाही. त्यांचे selection झाले नाही. तर हा विचार करा की आम्ही किती नशीबवान आहोत. आणि स्वत:टार्गेट ठरवून त्याकरिता प्रेरणा मिळवत रहा.
मग तो कॅम्प असेल किंवा इतर काही ही. जसे एखाद्या ठिकाणी काम करण्याची संधी, एखाद्या कॉलेज मध्ये मिळालेली admission , एकमेकांवर जडलेले प्रेम , घरातली नाती. यात कुठे ही अविश्वास ठेवू नका. स्वतः वर किंवा इतरांवर. गैरसमज करून घेवू नका. आणि जे मिळाले ते टिकविण्याचे प्रयत्न आणि सातत्य ठेवा.
आयुष्य सुंदर आहे. आपण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात स्वतःला पॉझिटिव ठेवू शकत नाही. पण याचा अर्थ आपण सगळ्याच ठिकाणी नकारात्मक आहोत असे नाही. तुमच्यातल्या सकारात्मक गोष्टी , विचार आणि तुमच्यातल्या गुणांचा विचार करून ते कसे वाढतील याचा विचार करा. प्रत्येक गोष्टीत कशी प्रेरणा मिळेल याकरिता प्रयत्न करत रहा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”
