आपल्या रागाचा सकारात्मक वापर करा, वाचा या टीप्स!!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
जय एका कंपनीत काम करत होता. त्याला जवळपास तिथे आता सहा वर्ष होत आली होती. कामाच्या बाबतीत तो अगदी प्रामाणिक होता. त्याला दिलेल काम तो अगदी नीट पार पाडत असे. त्यामुळे कंपनीतील लोकांशी तसेच वरिष्ठांशी त्यांचे चांगले संबंध होते. फक्त एकच गोष्ट त्याच्या मध्ये होती जी खटकण्यासारखी होती ती म्हणजे त्याचा राग. जयला पटकन राग येत असे त्याला कोणी काही विनाकारण बोलले होते व कामात ढवळाढवळ केली की राग येत असे व तो रागात समोरच्याला नकळत काहीतरी असे बोलून जाई ज्याचा नंतर त्याला पश्चाताप होत असे.
अगदी घरात असतानाही कधी राग अनावर झाला तर गोष्टीकडे तिकडे फेकणे, आरडाओरडा करणे होत असे. या गोष्टी त्याला नंतर खूप अस्वस्थ करत होत्या कारण त्यातून त्याचे संबंध बिघडायचे, त्याच्या शरीरावर, मनावर परिणाम व्हायचा आणि कामाच्या ठिकाणी तर आपण कितीही चांगले असू एखादी चूक पुरेशी ठरत असते माणसाला वाईट ठरवायला.
म्हणूनच रागावर ताबा मिळवणे, तो योग्य मार्गाने बाहेर काढणे गरजेचे आहे. जय प्रमाणे सर्वानाच कमी-जास्त प्रमाणात राग जाणवतो कारण ही युनिव्हर्सल इमोशन आहे. आपले अस्तित्व टिकवण्याची संबंधित आहे. पण त्याचे व्यक्त करण्याचे मार्ग मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. काहीजण अरदा ओरड करतात, आदळ आपट करतात, रागवतात तर काहीजण राग अात दाबून ठेवतात. मनातच ठेवतात, तर काही जण दुर्लक्ष करतात.
यातून तात्पुरतं बरं वाटत असल तरी त्याचे नंतर परिणाम चांगले होत नाहीत. कारण जरी राग दाबून टाकला तरी त्याचे परिणाम शरीरावर होतात. कार्डियाक अरेस्ट होण्याचे सर्वात जास्त प्रमाण ज्यांच्यामध्ये राग जास्त असतो त्यांच्यामध्ये दिसून येत. म्हणून राग कशाही पद्धतीने व्यक्त करणे किंवा आत दाबून टाकने दोन्ही चुकीचे आहे.
म्हणून ज्या गोष्टीमुळे म्हणजे ज्या विचारांमधून राग निर्माण होतो ते आधी बदलले पाहिजेत. रागामध्ये आपल्या नियमाविरुद्ध, मनाविरुद्ध कोणी अगदी आपण स्वतःही वागू नये असा अट्टाहास असतो तो आधी कमी केला पाहिजे. याची दोन कारण आहेत ती म्हणजे पाहिलं आपलं कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही आपण फक्त गोष्टी नीट व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू शकतो आणि दुसर अश्या अट्टहासातून फक्त आपल्याला आणि दुसऱ्याला त्रास होतो म्हणून तो कमी करायचा. आता हा वैचारिक बदल करायला सराव पाहिजे, प्रयत्न पाहिजेत. या सगळ्यात जेव्हा राग येईल तेव्हा तो सकारात्मक पद्धतीने कसा घ्यायचा ते पाहू.
१. ऊर्जा योग्य मार्गाने बाहेर पडेल अशा ऍक्टिव्हिटी करणे: रागामध्ये आपल्या अंगात जास्त ऊर्जा निर्माण होत असते. हृदयाची स्पंदन वाढणे, शरीरात ताकत आल्यासारखं वाटणे अश्या गोष्टी होतात. अश्या वेळी ही ऊर्जा जर योग्य ठिकाणी नाही वापरली ते नुकसान होऊ शकत. म्हणून अशी लोक ज्यांचा स्वभाव आक्रमक आहे, अगदी काही लहान मुलं देखील असतात ज्यांच्या वागण्यातून आक्रमकपणा दिसून येतो त्यांना अश्या खेळामध्ये गुंतवणे किंवा अश्या अक्टिविटी देणे जिथे ही ऊर्जा उपयोगी पडेल. जसे की मैदानी खेळ, बॉक्सिंग, उशा घेऊन फाईटिंग करणे यातून ही अतिरिक्त ऊर्जा बाहेर पडते.
२. ठामपणे बोलणे (assertiveness): याचा अर्थच असा आहे की मनात राग न ठेवता आपल्याला जे काही सांगायचे आहे ते स्पष्टपणे पोहोचवणे. रागात बऱ्याच व्यक्ती गप्प बसतात. अस वाटत की आपण कोणाला काही बोललो नाही त्यामुळे हे बरोबर आहे. पण याचा आपल्याला शरीरावर परिणाम होतो. कारण तो राग मनात तसाच असतो. म्हणून समोरच्या व्यक्तीच्या ज्या वर्तनाचा आपल्याला त्रास होत आहे ते नीट शब्दात त्याला सांगणे, त्याची कारणं जाणून घेणे तसेच असे पुन्हा होऊ नये यासाठी काय करता येईल यावर बोलणे यातून आपल्या मनात काही राहतं नाही समोरच्या व्यक्तीला ल देखील त्याची चूक समजण्याची शक्यता वाढते.
३. व्यायाम: श्वासाचे व्यायाम, योगासन केल्याने आपल्या आपल्या शरीरावर ताबा राहतो आणि राग आल्यावर श्वास फुलणे किंवा शरीरावरचा ताबा सुटणे अश्या गोष्टी कमी होतात.
४. राग एक strategy म्हणून वापरा: रागावर काम करायला किंवा कमी करायला कोणी यासाठी जास्त प्रयत्न करत नाही कारण ते ताकतीच प्रती मानलं जातं तसंच त्याने हव ते होईल असं वाटतं. पण या गोष्टी क्षणिक असतात. म्हणून राग एक स्ट्रॅटजी म्हणून वापरायचे असेल तर मनात कोणताही अट्टाहास आग्रह न ठेवता तो फक्त वर दाखवत आला पाहिजे जेणेकरून शिस्त राहिल. असा राग दाखवा ज्यातून आपल्याला आंतरिक त्रास होणार नाही.
बऱ्याच लहान मुले ऐकत नसले की आई खोटखोट रागवून दाखवते. अगदी तशाच पद्धतीने फक्त वर राग दाखवणे. कंपनीमध्ये hr म्हणून काम करताना किंवा एखाद्या गोष्टीत lead करताना अगदी शांत राहिल तर कुणी ऐकणार नाही. म्हणून येथे राग एक strategy म्हणून वापरावा लागतो. ठामपणे बोलावं लागतं.
अशा पद्धतीने राग देणारे विचार बदलणे, त्याच पद्धतीने राग आला तर तो योग्य सकारात्मक पद्धतीने बाहेर काढला ज्याला आरोग्यदायी राग असे म्हणतात तर त्याने आपल्याला दीर्घकालीन फायदे होतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
