आयुष्यात कधी कधी आलेला एकटेपणा हा वाईट नसतो.
सोनाली जे.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे तो एकटा राहू शकत नाही. त्याला दैनंदिन व्यवहारात कोणाची ना कोणाची गरज ही पडतेच.
बरेचवेळा असे होते physically आपण सगळ्या लोकांच्या सोबत असतो, ग्रुप मध्ये असतो, पण या सगळ्या लोकांच्यात असूनही , राहूनही वेगळे राहण्याची भावना बराच वेळ टिकून असते. गर्दीत असूनही कोणीच आपले नाही ही भावना असते. एकटे एकटे वाटते. . तर हा एकटेपणा अनेक कारणांनी असू शकतो.
१. स्वतः ला इतरांच्या पेक्षा कमी समजणे. :
सतत मनात तुलना होत राहते आणि आपण इतरांच्या पेक्षा कमी आहोत ही भावना मनात खूप strong होत जाते. त्यातून व्यक्ती हताश, निराश होत असते. डिप्रेशन ची भावना वाढीस लागते.
अगदी साधे अभ्यासात मित्र मैत्रिणी पुढे असतील, शिक्षण पूर्ण झाल्यावर इतर बरोबरीच्या सगळ्यांना नोकरी मिळाली असेल आणि तुम्हाला मिळाली नसेल, तसेच आहे की शिक्षणं, नोकरी मिळाल्यावर अनेकांची लग्न योग्य वयात होतात. तर काहींची लग्न ठरत नाहीत.
त्यातून चारचौघात जाण्याची भीती , लाज वाटते तर काही वेळेस चिंता वाटते की कोणी आपल्याला काही म्हणेल आणि अशा वेळी जो एकटेपणा जाणवत असतो तो विकासाशी , स्वत:च्या डेव्हलपमेंट मधून आलेला एकटेपणा असतो.
२. Energy लेव्हल कमी असणे. ऊर्जेची कमतरता जाणवत असते. एखादी क्रिया होण्यासाठी जी प्रेरणा लागते त्याचा अभाव असतो.
३. काही वेळेस तात्पुरता , वेळ , परिस्थिती, व्यक्ती नुसार आलेला एकटेपणा असतो. जसे आपली प्रिय व्यक्ती काही काळासाठी आपल्या पासून दूर गेली . परदेशी गेली. किंवा आपली व्यक्ती जी परदेशी गेली तिलाही एकटेपणा येतो कारण ती काही काळासाठी आपल्या व्यक्तींच्या पासून दुरावते. आणि परदेशी सगळी नवीन माणसे, तेही कोणी कोणाशी उगीच बोलत नाहीत , भेटत नाहीत त्यातून ही एकटेपणा येतो.
शिवाय तिकडे सगळी कामे आपली आपल्यालाच करावी लागतात. सामान आणण्यापासून ते स्वैपाक , भांडी घासणे , कपडे धुणे, आजारी असलो तरी डॉक्टर लगेच उपलब्ध नसतात appointment शिवाय. त्यातून आपल्या माणसांची उणीव खूप जाणवते आणि एकटेपणा जाणवतो.
तिकडे दिवस तेव्हा इकडे रात्र त्यामुळे इच्छा असूनही बोलणे ही होवू शकत नाही बरेचदा.तिकडच्या कामाच्या वेळा. यातून कामात असताना व्यस्त असतो. पण घरी आल्यावर जास्त एकटेपणा वाटतो. बोलायला , समोर ही कोणी व्यक्ती नसते. त्यातून एकटेपणा वाढतो.
पण हा तात्पुरता, परिस्थितीजन्य , वेळ, काळ यानुसार एकटेपणा असतो. भौगोलिक समस्या , सांस्कृतिक समस्या , भाषेच्या समस्या यातून ही बरेचवेळा एकटेपणा जाणवत असतो.
४. प्रेमभंग , एखादी जवळची व्यक्ती, मित्र मैत्रीण काही वेळेस दुरावतात. काही काळासाठी किंवा कायमचे दुरावतात. तर काही कुटुंबीय काही काळ किंवा कायमचे दुरावतात.
आपण कायमचे गमावतो. कधी दुसऱ्या जागी जातात. कधी इतर कामे , नवीन मित्र यात व्यस्त होतात. तर कधी इतर काही कारणे, अशावेळी जी नेहमीची जवळची व्यक्ती आपले बोलणे ऐकून घेते, सल्ला देते, संवाद साधते , मार्ग सुचविते तिची उणीव आपल्याला जाणवते आणि एकटेपणा ची भावना वाढीस लागते.
पण आयुष्यात कधी कधी आलेला एकटेपणा हा वाईट नसतो.
१. निर्णय क्षमता सुधारते :
सतत इतरांच्या सुरक्षा कवचात असल्याने आपल्याला स्वतः ला सिद्ध करण्याची किंवा काही करण्याची संधी मिळत नाही : –
पण व्यक्तीला जेव्हा एकटेपणाची भावना जाणवते तेव्हा सोबत कोणीच नसते.
ती व्यक्ती जी एकटेपणा ला सामोरी जाते ती स्वतः चे निर्णय स्वतः घेण्यास समर्थ होवू लागते. मग काही वेळेस ते निर्णय चुकीचे असतील पण त्यातून अनुभव येत जातो. तर काही वेळेस त्यने घेतलेले निर्णय योग्य असतात. थोडक्यात यातून जबाबदारीची आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता वाढते. एकला चलो रे …सारखे..
२. आपल्या क्षमतांची जाणिव होवून एक सुखद भावना निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढतो.
बरेचवेळा आपण इतरांवर अवलंबून , dependant असतो. तेच जेव्हा आयुष्यात कधी तरी एकटेपणा येतो तेव्हा त्याला आपल्यातल्या क्षमतांची जाणीव होते. आणि एक सुखद भावना निर्माण होते. जेव्हा त्या क्षमतांची जाणीव होते तेव्हा साहजिकच स्वतः चे आत्मबल आणि आत्मविश्वास ही वाढतो. स्वतः ची कामे स्वतः करण्याची सवय लागते, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
३. जेव्हा परिस्थितीजन्य , काळ , वेळ , व्यक्ती नुसार एकटेपणा येतो तेव्हां परदेशी असेल तर तिथल्या नवीन लोकांच्या सोबत संवाद साधला जातो. नवनवीन गोष्टी अनुकरण केल्या जातील किंवा आत्मसात केल्या जातात.
४. आपले छंद ,आवडी निवडी जपल्या जातात.
एकटेपणा कमी करण्यासाठी व्यक्ती आपल्या आवडत्या गोष्टी करण्या मध्ये मन रमवते. संगीत ऐकणे असेल, गाणी म्हणणे , वाद्य वादन , चित्रकला , हस्तकला , painting, swimming करणे , आवडत्या गोष्टी जसे travelling आवडत असेल तर ते , मस्त लाँग ड्राईव्ह,vनवीन नवीन ठिकाणीं भेट देवून तिथले वैशिष्ट्य समजून घेणे असेल, निसर्ग सौंदर्य बघणे त्यात मन रमाविणे.
extrovert असेल व्यक्ती तर नव नवीन मित्र मैत्रिणी शोधणे , त्यांची ओळख मग त्यातून मैत्री करणे. एकत्र वेळ घालविणे ही केले जाते.
तर कधी नवनवीन खाद्य पदार्थ करणे, ज्या ठिकाणी असू तिथले खाद्य पदार्थ खाणे असा ही आपला छान वेळ आणि एकटेपणा असल्याने इतर कोणाची जबाबदारी ही नाही .. जसे आर्थिक नाही. किंवा कोणाची अरेरावी नाही. मानसिक बंधने नाही असे मुक्त जीवन जगता येवू शकते.
आयुष्यात कधी कधी आलेला एकटेपणा हा वाईट नसतो. तर आपल्याला स्वतः ला शोधण्याची , explore करण्याची संधी मिळालेली असते. स्वतः ला prove करण्याची संधी मिळालेली असते.तर कधी कधी आपले काय चूक , काय बरोबर , आपल्या आणि इतरांच्या वर्तनाचे विचार करण्याची संधी मिळते. सगळ्यात महत्वाचे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते. आणि स्वतः मध्ये सुधारणा , improvement करण्याची संधी मिळते.
आयुष्य सुंदर आहे. तुम्ही सकारात्मक राहिले पाहिजे. आणि सगळ्यात मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे केवळ स्वतः पुरता विचार न करता कधी कधी इतरांचा विचार करणे ही गरजेचे असतें. आपण त्यांच्या सतत मध्ये मध्ये तर करत नाही ना ? त्यांची स्पेस त्यांना देतो ना ? आपली स्पेस आपण ठेवतो ना ? या गोष्टींचे विचार हे एकटेपणात च केले जातात. शिवाय जर इतरांच्या मुळे एकटेपणा आला असेल ते सोडून गेले असतील , टाळत असतील तर ते असे का वागतात ? असे वर्तन का करतात ? याची कारणे शोधता येतात आणि आपल्यात सकारात्मक बदल घडविले जातात.
काही वेळेस नकारात्मक गोष्टी मधून च सकारात्मकता येत जाते.
मानसिकता समजून घेणे , विचारांची सखोलता , वर्तन बदल, आत्मविश्वास, अनुभव या गोष्टींचे आपल्या व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी , प्रगल्भ करण्यासाठी मोलाचे योगदान ठरते.
आयुष्यात कधी कधी आलेला एकटेपणा हा वाईट नसतो.तर काही चांगल्या गोष्टींची सुरुवात असते.
एक लक्षात ठेवा , हेही दिवस जातील. कायमस्वरूपी कोणती ही परिस्थिती नाही. ती बदलणार आहे. आणि जे समोर आले ते धैर्याने त्याला तोंड देण्यास शिका. मी च का असे न विचार करता अरे वाह मला संधी मिळाली आहे हा सकारात्मक भाव ठेवा. आणि मी या सगळ्यातून बाहेर पडेन हा आशावाद ठेवा. आणि आपली energy वाढवण्यासाठी आवडत्या गोष्टी करा. छंद जपा. योगा , ध्यान , व्यायाम करा. कधी कधी स्वतः ला आरशात बघून मनसोक्त आणि मोकळेपणाने बोला. भरभरून bola. मोकळे व्हा.
All the best.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

