आयुष्याला कंटाळलेली माणसं पूर्ण घराला निराशावादी बनवतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपलं आयुष्य कितीही खडतर असल तरी आपण ते जगत असतो. ढकलत ढकलत का होईना आपल्याला आपलं आयुष्य हवं असत. वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपली कसली धडपड चालू असते तर जगायची. कारण सर्वांनाच माहीत असत की माणूस म्हणून आपल्याला हा जो जन्म मिळाला आहे तो काही सहजासहजी कोणाला मिळत नाही. तसच गेलेलं आयुष्य पण परत मागता येत नाही. म्हणूनच अगदी हलाखीत असणारा माणूस पण आपलं आयुष्य जगतो. कारण त्याच आपल्या आयुष्यावर प्रेम असत. आताची वेळ कशीही असुदे पण येणारी वेळ नक्कीच चांगली असेल असा विचार करून, अशी आशा तो मनात ठेवून असतो , त्यासाठी कष्ट करतो. ही आशाच माणसाला जगायला प्रेरित करते.
पण याउलट अशीही काही माणस असतात जी आपल्या आयुष्याला कंटाळलेली असतात. त्यांना त्यांचं आयुष्यच नकोस झालेलं असत. आयुष्यात संघर्ष पाहिले असतील, संकट आली असतील त्यांना सामोर जायची, त्यांच्याशी लढा देण्याची ताकद संपलेली असते. हे सर्व नको होत आणि म्हणूनच आयुष्य नकोस वाटत. याचा परिणाम अगदी रोजच्या जीवनावर पण होतोच. आपण आपल्या रोजच्या जीवनात ज्या काही गोष्टी करत असतो त्या कश्यासाठी? तर आपला आनंद अजून वाढण्यासाठी, जगण्याची इच्छा अजून वाढण्यासाठी, आयुष्य भरभरून जगण्यासाठी.
पण जर आयुष्यावर प्रेमच उरलं नसेल तर त्यात आनंद मिळणाऱ्या गोष्टी तरी कश्या केल्या जातील? साहजिकच कोणतीही गोष्ट करण्यातला रसच निघून जातो. पूर्ण आयुष्याचा कंटाळा आला असेल तर कश्यासाठी काही करायचं? ही माणसं स्वतःहूनच आपलं जगणं निरस करून टाकतात. वागण्या बोलण्यातून नकारात्मकता जाणवू लागते. आणि याची सर्वात आधी झळ लागते ती त्या माणसाच्या घरातल्या व्यक्तींना. कारण आपण जास्त वेळ कोणासोबत घालवत असतो तर आपल्या घरातल्या माणसांसोबत. त्यामुळे आपल्या कोणत्याही वागण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतोच. जेव्हा एखादी व्यक्ती अशी स्वतःच्याच आयुष्याला कंटाळते तेव्हा ते तिच्या नेहमीच्या वागण्यातून दिसून येत. कशातच रस न घेणे, एकसारखं मला हे आयुष्य नकोस झालय, का जगत आहे माहीत नाही.
अनेक जण तर एकदाच गेले तर सुटेन अस बोलतात. त्यांना स्वतःच्या आयुष्याकडून काही आशा नसतेच. पण त्यांच्या अशा वागण्याने घरातलं संपूर्ण वातावरण नकारात्मक, निराशावादी होऊन जात. कस काय? तर कोणाला आवडेल आपल्या घरातल्या माणसाला अस दुःखात पाहायला? स्वतःच्याच आयुष्याला अस कोसताना पाहायला? कुठल्याही घरातील माणसाला हे आवडणार नाही. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर घरात कोण आजारी असेल तर अख्ख घर आजारी पडल्यासारखं होत.
कारण त्या माणसाची काळजी असते. तो बरा झाल्याशिवाय बाकीच्या माणसांना बर वाटणार नसत. त्यामुळे घरात कोणी एक निरोगी असून चालत नाही. सर्व माणसं हसरी, निरोगी असली तर घर निरोगी आहे अस म्हणता येत. इथे आजारी असताना जर बाकीच्यांना इतका घोर लागत असेल तर आयुष्याचं नको झालं असताना इतरांना कसं वाटेल. दिवसभर निगेटिव्ह बोलण, एकाकी राहणं, चेहेऱ्यावर असलेला उदासपणा हे सर्व इतरांवर प्रभाव टाकतात.
अनेकदा घरातली लोक या व्यक्तीला त्याच्या दुःखातून बाहेर काढायचा प्रयत्न करतात, दिलासा देतात. पण त्याचा जर परिणाम होताना दिसत नसेल तर यांच्यामध्ये देखील hopelessness येऊ लागतो. का? तर आपलं माणूस अस दुःखात असताना आपण त्याची काहीच मदत करू शकत नाही. आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही. त्यांना त्यांचा आनंद पण नीट घेता येत नाही कारण एक माणूस दुःखात असताना आपण तरी कशी सगळ्या गोष्टींची मजा घ्यायची हा अपराधीपणा येतो. त्यामुळे जरी घरातल्या एका माणसाला आपलं आयुष्य नकोस झालं असल तरी हळू हळू त्याचा परिणाम पूर्ण घरावर दिसतो.
यासाठी त्या व्यक्तीने सर्वात आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकटे नाही. आपली जवळ आपली माणसं आहेत. जी आपल्याला मदत करू शकतात. इतकं चांगल आयुष्य आपण कंटाळत घालवू शकत नाही. मदत लागली तर घ्या, बोला पण त्यातून बाहेर पडा. त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींनी पण हे समजून घेतल पाहिजे की बऱ्याचदा व्यक्ती जे परक्या माणसाला नीट सांगू शकते ते घरातल्या माणसांना सांगू शकत नाही.
त्यामुळे आपण कितीही जवळचे असलो तरी मर्यादा पडतात. म्हणून आपणच त्याला बर करू असा अट्टाहास न करता तज्ज्ञाची मदत पण घेतली पाहिजे. आणि यात काही लाज वाटण्याची, घाबरण्याची गरज नाही. जसं शारीरिक असत तसच मानसिक आरोग्य पण असत. ते देखील आजारी पडू शकत. त्याला पण बर करता येत. कोण काय म्हणेल याहून जास्त आपल्याला आपलं माणूस बर व्हायला हवं असेल तर योग्य वेळी मदत घ्या. एक अख्खं कुटुंब यातून तरून जाऊ शकत.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
