आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो असं आपण म्हणतो, कारण त्यावेळी आपण तात्पुरते अपसेट असतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“इतकी वर्ष मी सहन केलं आणि यापुढे देखील माझ्या नशिबी सहन करणच लिहिलेले आहे. तुला सांगते, मी काहीही केलं तरी कोणाला पसंद पडत नाही. प्रत्येकाची त्यावर काही तरी टिप्पणी ही असते. आज हे अस झाल, उद्या तर काय हे कमी पडल. अरे मी देखील एक माणूस आहे. मी किती आणि काय म्हणून सहन कराव? आणि हे आता नेहमीच झालं आहे. मला नाही वाटत ही लोक कधी सुधारतील.” सुमित्रा एकसारखी बोलत होती आणि नंदा म्हणजेच नंदिनी तिचं ऐकून घेत होती.
सुमित्राला तिचं जवळच अस माणूस कोणतरी आहे अशी एक जी भावना होती ती नंदिनी बद्दलच होती. त्यामुळे जेव्हा कधी ती उदास असायची किंवा तिला वाटायचं आपण कोणालातरी भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे तेव्हा ती नंदिनीलाच भेटायची. याच अजून एक कारण होत, ते म्हणजे नंदिनी तिला ऐकून घ्यायची. मध्ये न थांबवता, टोकता. हेच सुमित्राला आवडायच. नाहीतर एरवी ती गोष्टींचा बाऊ करते अस तिला ऐकायला लागायचं. नंदिनी मात्र अस कधी बोलत नसे. तिचा स्वभाव समंजस होता. कोणाला काही समजवयाच जरी असल तरी देखील ती अश्या पद्धतीने समजावयाची जेणेकरून तो माणूस दुखावणार नाही.
आतापर्यंत जेव्हा जेव्हा सुमित्रा तिला भेटली होती तेव्हा तेव्हा तिने सुमित्राला समजावलं होत. तिच्या या बोलण्याने सुमित्राला देखील आधार मिळे. आपल्या बाजूने पण कोणी विचार करणार आहे हे पाहून तिला बर वाटे. आजही ती खूप उदास होती म्हणून नंदिनीला भेटली. ही गोष्ट खरी होती की सुमित्राच्या घरचे तिला काही प्रमाणात नीट वागवत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलण, एकप्रकारची असमाधानी वृत्ती ह्या गोष्टी होत्या.
पण सर्वच माणसं अशी नव्हती. तिचा नवरा, सासरे ही मंडळी चांगलीच होती. पण नवरा कामामुळे बाहेर आणि सासरा त्याच्या त्याच्या विश्वात. सासूचा स्वभाव असा होता की तिला काही केलेलं रुचत नसे. आणि मग ती एकसारखी सुमित्राला काहीतरी बोलत बसायची. सुमित्रा ने काहीही केल तरी तिला आवडत नसे. पण ती हिच्या एकटीच्या बाबतीतच अस वागत होती अस नाही. तिचा स्वभावच तसा होता. कधी चांगल बोलेल कधी उलट बोलेल.
सुमित्रा मात्र या गोष्टी मनाला लावून घ्यायची. तिला अस वाटायचं आपल्या कष्टाला काही किंमत नाही. पहिल्यापासून या मला बोलत आल्या आहेत आणि यापुढेही असच वागणार. फक्त एकटी सासू अशी वागते म्हणून सुमित्रा नकळतपणे सर्वांना त्यातच बसवत होती. नवरा तिला समजावून घेत होता, त्याच्या परीने ती त्याच्या आईशी बोलत देखील होता पण मुलगा म्हणून त्याला काही मर्यादा पडायच्या.
तरीही जेव्हा सुमित्रा उदास व्हायची तेव्हा तिला अस वाटायचं हे आता कायमच झालेले आहे. आपण यातून काही बाहेर पडू शकत नाही. याचा तिला खूप त्रास व्हायचा. कारण एकच गोष्ट आपल्यासोबत आयुष्यभर होणार हा विचारच त्रासदायक आहे. काही वेळाने हे दुःख, याचा भार कमी व्ह्यायचा तेव्हा ती आपोआप शांत व्ह्यायची. पण तोपर्यंत मात्र आपल्या नशिबी हे असच आहे अश्या पद्धतीने तिचे विचार असायचे.
हे अस होत याच कारण आपण दुःखात असतो त्यावेळी खूप जास्त emotionally charged असतो. एरवी जाणवणाऱ्या भावना देखील अधिक तीव्रतेने जाणवतात. ज्या खर तर त्या क्षण पुरत्याच असतात. पण त्यांची तीव्रता जास्त असल्याने आपण त्याच अती सामान्यिकरण करतो. हीच परिस्थिती आहे तशी राहणार अस वाटत. जेव्हा हे हळू हळू कमी होत, आपण दुःख कमी होत तेव्हा आपण मुळ पदावर येतो. आठवून पहा, जेव्हा आपण खूप जास्त दुःखात असतो किंवा upset असतो तेव्हा अश्या काही गोष्टी बोलतो ज्या खर तर आपल्या मनात नसतात. म्हणून तर आपण नंतर म्हणतो देखील मला अस म्हणायचं नव्हत. ते मी रागाच्या भरात किंवा दुःखात बोलून गेलो. जे की खर आहे. आपली मनस्थिती त्यावेळी तशी असते. म्हणून आपण अस वागतो. पण हेच खर मानून चाललो तर त्याचा त्याचा आपल्यालाच होणार.
कारण आपण कितीही म्हटल की मी याच परिस्थितीत अडकून राहणार किंवा मला हे आयुष्यभर सहन करावं लागणार तरी हे खर नाही. आपल्या आयुष्यात चांगले प्रसंग पण घडत असतात. चांगली माणसं पण आपल्याला भेटतात. या गोष्टी आपण आठवून पाहायला पाहिजे. तिथे पण लक्ष दिलं पाहिजे. कोणतीही गोष्ट पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट असत नाही. मग ती माणसं असुदे किंवा परिस्थिती. त्याच्या मधे पण काहीतरी असत. ते आपल्याला पाहायचं आहे. आपण दुःखात असताना निराश असताना आपल्याला अस वाटू शकत. पण हे एवढ्या पुरतच आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे तात्पुरतं आहे कायम नाही हे एकदा आपल्याला समजलं की आपला त्रास कमी होतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

