एखादा व्यक्ती आपल्या आवाजावरून आपल्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज बांधू शकतो का?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
जानकी नुकतच आपल्या नवऱ्यासोबत अमेरिकेत राहायला गेली होती. तो ज्या कंपनी मध्ये काम करत होता त्यांनीच त्याला तिथे पाठवलं होत. लग्नाला पुरत वर्ष होतय तोपर्यंत त्यांची बदली झाली होती. तस आनंदने याची कल्पना आधी देऊन ठेवली होती त्यामुळे या गोष्टीने फार कोणाला काही आश्चर्य किंवा त्रास झाला नाही. उलट सर्वांना आनंदच झाला की त्याची प्रगती होत आहे. पण जरी हे सर्व असल गरज नवीन देश, तिथल्या चाली रिती, नियम, वातावरण, खाणपिण सर्वच वेगळं. Adjust व्ह्यायला तसा थोडा वेळ लागणारच होता. तेच होत होत.
आनंद काय सकाळी कामाला लवकर निघून जाई, तो सरळ रात्रीच येत असे. घरात सर्व सुख सोयी होत्या. पण जानकी पहिल्यापासून भरलेल्या घरात राहिलेली. लग्न झाल्यावर पण घरात माणसं होती. त्यामुळे तिला कधी एकट अस वाटल नाही. पण इथे अगदीच बदल झाल्यासारखा झाला. दिवसभर एकट राहून घर खायला आल्यासारखं होई. बरं जास्त कुठे जायच म्हटल तर पत्ते नीट माहीत नव्हते.
एक दोनदा असच काहीतरी सामान आणायला ती गेली होती आणि पत्ता चुकली होती. कसातरी मग विचारत विचारत ती घरी आली. त्यामुळे एकटीने कुठे जायची तिला इच्छा पण होत नसे. आनंदला तर कामातून फार वेळ मिळत नसे. तरी तो कधी थोडाफार वेळ मिळाला तरी तिच्यासोबत घालवी. तीदेखील त्याला उगाच त्रास नको म्हणून जास्त की सांगत नसे. पण मनातून ती आधीच्या घराला, आपल्या माणसांना मिस करत होती.
एक दिवस ती अशीच कसलातरी विचार करत बसलेली असताना तिच्या आईचा फोन आला. इथे आल्यापासून तसे जास्त कोणाचे फोन आले नव्हते का फार बोलण झाल होत. त्यामुळे आईचा फोन पाहून जानकीला भरून आलं. तिने पटकन फोन उचलला व हॅलो म्हणाली. पलीकडून आई बोलू लागली, कशी आहेस जानू? काय म्हणत आहे अमेरिका? इतक्या दिवसांनी आईचा आवाज ऐकून खरतर जानकीला रडू आल्यासारखं झालं. तरी तिने तिचा आवाज स्थिर ठेवत बोलायला सुरू केलं. मी मस्त, छान आहे. तू कशी आहेस आई? आईला समजलं होत की तिचा आवाज नेहमीसारखा नाहीये. काहीतरी झालं आहे. म्हणून तिने विचारलं, काय झालं बाळा? नक्की ठीक आहेस ना तू? आनंद कसा आहे? काही झालं आहे का? तू खुश आहेस ना? हे सर्व ऐकून जानकी चा बांध फुटला व ती रडू लागली.
तिचं रडणं ऐकून तर तिची आई अजूनच काळजीत पडली. कारण नवीन देश होता त्यात ती दोघच होती. तिने परत सर्व विचारलं, जरा वेळाने शांत झाल्यावर जानकी बोलू लागली, काही नाही आई, सर्व ठीक आहे. आनंद पण माझी चांगली काळजी घेतात. पण हे सर्व नवीन आहे ना, त्यामुळे अजून adjust होता येत नाही. तुमची सर्वांची आठवण येत आहे. हे वाक्य बोलताना पण तिचा आवाज भरला होता. आईला पण जाणवत होत की तिला काय वाटत असेल. पण आता तीही खूप हळवी झाली असती तर कदाचित जानकी ल समजावणं अवघड गेलं असत. म्हणून ती हसून म्हणाली, अरे वेडाबई इतक्याश्या गोष्टीवरून का रडायला आल? आणि नवीन जागेत गेल्यावर रुळायला वेळ लागतो. तुझ मन पण रमेल हळूहळू तिथे.
आणि आम्ही पण लांब आहोत का? तू कधीही फोन लावून बोलू शकते आमच्याशी. चल आता डोळे पुस. अस करत आईने तिला पूर्ण शांत केल व त्यांनी खुप वेळ गप्पा मारल्या. जानकीने देखील नंतर तिथल्या काही नवीन गोष्टी, तिच्या सोबत झालेल्या गमती सांगितल्या. दोघी अगदी भरभरून बोलत होत्या. शेवटी फोन ठेवताना जानुने आईला विचारलं, आई मी काहीच न सांगता तू मघाशी कसं काय ओळखल की मी दुःखी आहे? मला काहीतरी त्रास होतोय?
यावर आई म्हणाली, अग मी आई आहे तुझी. तू माझ्यापासून कितीही लांब जा, तुझ्या न बोलण्यातूनही मला खूप गोष्टी समजतील. त्या शांततेमध्ये पण माणूस खूप बोलत असतो. आणि आवाजाच म्हणशील तर आपल्या माणसाला आपलं सुख दुःख समजणार नाही तर कोणाला समजणार? ते दर वेळी अस फोडून सांगावं लागतं नाही. जो खरच आपल्या मनाच्या जवळ असतो त्याला आपल्या बोलण्यातून समजत की आपण आनंदी आहोत की उदास. समजलं. आज खूप दिवसांनी जानकीने मन मोकळं केलं होत. आता ती तयार होती नवीन जागेतील या नवीन प्रवासाला.
जानकीच्या आईच ते म्हणणं खरच आहे. आपल्या सुख दुःखाचा अंदाज आपल्या बोलण्यातून, आवाजातून समोरच्याला जाणवू शकतो. नक्की जाणवू शकतो. पण कधी जर ती व्यक्ती आपल्याशी तितकी connected असेल. आता हे connection फक्त रक्ताच्या नात्यात असते अस नाही. तस असत तर घराघरांतून वाद, गैरसमज झाले नसते. हा अंदाज जी व्यक्ती मनाने आपल्या जवळ आहे तिला लगेच येतो. म्हणून तर आपल्या बऱ्याचश्या गोष्टी आपल्या घरातल्या माणसांच्या आधी आपल्या मित्रमैत्रिणींना समजतात. कारण तिथे आपल्या नुसत्या आवाजाने आपल्याला काय होतय याचा त्यांना अंदाज येतो आणि आपल्या साठी हि जाणीव समोरच्या व्यक्तीला होण हीच मोठी गोष्ट असते.
म्हणून आपल्या सर्वात जवळ आपली आई असते. थोडक्यात ज्या व्यक्तीकडे तदानुभुती आहे जी व्यक्ती समोरच्या माणसाच्या जागी राहून त्याच सुख दुःख अनुभवू शकते, तेवढी क्षमता जिच्याकडे असते तिला आवाजावरून पण समजत की काहीतरी झालेले आहे. आणि ही क्षमता सर्वांकडे असत नाही. ज्यांच्याकडे असते त्यांच्याशी आपण जास्त connected असतो. आणि माणुसकीचे संबंध टिकवायला, वाढवायला ही क्षमता मदत करते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
