Skip to content

आपल्यानीच विश्वासघात केला, ही नकारात्मकता अशी काढून टाका.

आपल्यानीच विश्वासघात केला, ही नकारात्मकता अशी काढून टाका.


मयुरी महाजन


आयुष्याच्या जडणघडणीत व त्या रोजच्या प्रवासात परक्यांपेक्षा आपल्या माणसांकडूनच वेळो वेळी विश्वासघात होण्याचा धोका असतो, खरंतर विश्वासघात करणारा हा किती चालाख, आणि हुशार असला, तरी परमेश्वराच्या न्याय चक्रातून तो कधीही सुटणारा नसतो ,हे मात्र नाकारून चालतच नाही ,त्यामुळे आपल्यांनी आपल्या सोबत कितीही विश्वासघात केलेला असू द्या ,त्याच्यामुळे फक्त आपल्यात निर्माण झालेली नकारात्मकता झटकून आपण पुढे जायला हवे…

आपल्यांनी केलेला अपमान व परक्यांनी दिलेल्या मान, माणूस कधीही विसरत नाही, असं म्हणतात ,आणि त्यातल्या त्यात आपल्या माणसांकडूनच दुखावलेलं मन माणसाने त्याची आठवण जरी केली, तरी डोळ्यातून पाणी येतं, पण बघा ना गंमत अशी आहे, की आपल्यांनीचं पाठीमागून वार केले त्याचे दुःख पचवणं खूप अवघड जातं ,आणि त्यातल्या त्यात आपल्यात राग निर्माण होतो ,अशा माणसांविषयी ,काही जण तर अशांचा चेहरा पाहणे देखील पसंत करत नाही ,ती माणसे समोर आल्यावर त्या घटना प्रसंग डोळ्यासमोर येतातच, आणि त्यामुळे त्रास आपण आपल्यालाच करून घेतो, परंतु ते आपल्या लक्षात येत नाही,

आपल्यांनी केलेला विश्वासघाताचा याचा राग हा आपल्याला समोरच्या माणसांपेक्षा स्वतःवर जास्त राग असतो, कारण ज्या माणसांवरती आपण नि संकोचपणे विश्वास ठेवलेला असतो, त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं का??? माझ्यावर विश्वास ठेव म्हणून, नाही ….तो आपण ठेवलेला असतो ,त्यामुळे जेव्हा परिस्थिती विरुद्ध बाजूने घडते, तेव्हा आपल्या सर्वात जास्त राग हा स्वतःवरती असतो, कारण माणसं पारखण्यात आपण चुकलेलो असतो, कमी पडलेलो असतो ,आपल्यांनी केलेला विश्वासघात ,यामुळे आपल्यात निर्माण झालेली नकारात्मकता… आपल्याला जीवनाची कितीतरी धडे सकारात्मक पद्धतीने शिकून जाणारी असते ,त्यामुळे त्या नकारात्मकतेला आपण कशाप्रकारे काढू शकतो यावर थोडी नजर टाकूया. ….

माझी आई नेहमी म्हणते, जर आपल्या सोबत कोणी वाईट वागले असेल, आणि आपणही तसेच वागणार असू तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तरी काय??? म्हणून आपण आपलं अस्तित्व जोपासावं, कोणी फसवलं, म्हणून त्याला एकदा असेच फसवतो की नाही बघ ,असं म्हणून बदला घेण्याची भूमिका ठेवू नये,

झालेला विश्वासघात आपल्याला आपल्या आयुष्यात काय धडा शिकून गेला याचा विचार करायला हवा ,कारण विश्वास ही सर्वात महागडी गोष्ट आहे, प्रत्येकाकडून त्याची किंमत होईलच असे नाही, आपण कुठल्या घाईत, व कुठल्या भावनेत अडकून समोरच्या व्यक्तीच्या दिखाव्यात येऊन भूल पडली गेली ,आणि आता यापुढे आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे ,जेणेकरून आपली कुणाकडून फसवणूक तरी होणार नाही, हे तपासायला हवे..‌‌

आपल्याला आपली म्हणणारी माणसे, हे आपल्याजवळ कुठल्या लोभापोटी व कशा पद्धतीने जवळ आली होती, ते बघा, आपल्या विश्वासघात करण्याच्या पाठीमागे काय काय कारण असू शकतात, याचा शोध घ्या, कधी कधी गैरसमज, परक्यांनी आपल्यांचे भरवलेले कान, हे ऐका चांगल्या कुटुंबातील काटाने काटा काढण्याचे काम बरीच माणसं करताना दिसतात, जरी प्रत्यक्ष रोल त्यांचा नसला तरी अप्रत्यक्षरीत्या मात्र ते असतातच…

आपल्यांनी विश्वासघात केला म्हणून नाती तोडून द्यावी का? तर अशांपासून फक्त सावध राहावे, कारण नात्यांना जोडणारा दुवा म्हणजे विश्वास, आणि जेव्हा विश्वास मरतो, तेव्हा त्यात उरते ती फक्त रिकामी पोकळी, ती भरून काढण्यासारखी नसतेच…

माणूस म्हणून प्रत्येकाकडून काही ना काही गफलती ह्या होतच असतात, परफेक्ट असं कुणीच नाही, काही गुण काही दोष प्रत्येकात आहेत, आपण केलेल्या गोष्टीचा जर एखाद्याला खरंच मनापासून पश्चाताप होत असेल, व त्यासाठी तो आपल्याकडे माफी मागत असेल, तर मोठ्या मनाने माफ करायला सुद्धा शिकायला हवं, कारण की एक चूक असेल तर काही गोष्टी त्यात नक्कीच चांगल्या असतीलच ,इथे प्रत्येक क्षणाला जीवनाचा क्षण हातातून निसटून चाललेला आहे ,कुणाचा हात कधी सुटून जाईल सांगता येत नाही , वर्षोनुवर्षे माणसं एकमेकांच्या झालेल्या गोष्टी साठवून ठेवतात ,काय माहिती पुढच्या क्षणाला तो माणूसच राहिला नाही तर ,आपल्या मानसिक आरोग्यासाठी तरी आपण स्वतःच्या डोक्यातून काही ओझं जे बरेचकाळ आपण सोबत घेऊन जगत होतो, ते कुठेतरी रिकामं करून… एका सुंदर जगण्याकडे आपलं पाऊल टाकूया….

कारण तो तसा वागला हे त्याचं कर्म आहे, आपण आपल्यात बदल करायला हवा ,आपण स्वतःला बदलू शकत नाही, तर तशी अपेक्षा आपण इतरांकडून तरी काय ठेवावी, आपण कसं वागावं हे आपल्या वरतीच आहे…


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “आपल्यानीच विश्वासघात केला, ही नकारात्मकता अशी काढून टाका.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!