Skip to content

आपला सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्यामुळे इतर आनंदी आहेत.

आपला सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्यामुळे इतर आनंदी आहेत.


मयुरी महाजन


“किसी के मुस्कुराहटों पें हो निसार,

किसी का दर्द लें सके तो लें उधार…जिना ईसी का नाम है……”

आपल्या आनंदाचे भागीदार अनेक जण असतात, तसेच आपणही इतरांच्या आनंदाचे भागीदार होण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, आणि आपल्यामुळे इतर आनंदी आहेत, यातच आपला सर्वात मोठा आनंद आहे, इतरांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू येतं तेव्हा ते आसुखचं आपल्या चेहऱ्यावरही झळकतचं….

आनंद हा कधीच एकट्याचा नसतोच ,मुळातच तो सर्वांमध्ये दडलेला असतो, जेव्हा आपण इतरांच्या आनंदासाठी काहीतरी करतो ,त्यावेळेस आपल्या आयुष्यात आनंदाची भरभराट होते ,जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत भेटत असतं असं म्हणतात ,म्हणून वाटताना आनंदाची फुले वाटा आपल्याही वाटेवर आनंद येईलच, दुःख तर प्रत्येकाकडे आहेच पण दुःखी आणि निराश असलेल्या चेहऱ्यावर जर हसू आणण्याचे भाग्य आपल्याला लाभलं ,तर ती संधी सोडू नये,

आपल्या सुखात आपल्याजवळ किती जण होते ,हे आपण कदाचित लक्षात ठेवणार नाही, पण आपल्या दुःखाच्या वेळेस आपल्या चेहऱ्यावर हसू यावं, यासाठी ज्यांनी आपल्याला आपला आनंद वाटलेला असतो, त्यांना मात्र विसरणार नाही हे नक्की, आनंद महाग गोष्ट नाही, परंतु आजकालच्या आपल्या जनरेशनला बघितलं तर वाईट वाटतं, की महागातली महाग वस्तू घेऊन देखील आपल्या चेहऱ्यावर आनंद झडकत नाही, मुळात वस्तूंची किंमत कमी जास्त असू शकते, परंतु ती वस्तू मिळाली याचा तरी आनंदा असायला हवा, आणि तसं पाहिलं तर आनंद हा वस्तूंवर किंवा व्यक्तींवर अवलंबून तरी का असावा???

जर कुणाच्या आनंदाचे कारण आपण असणारं, तर यापेक्षा जास्त दुसरा आनंद तो काय असणारं, जीवनात आनंद हा मोठमोठ्या गोष्टींमध्ये नाही, तो खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो, गरज असते ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद अनुभवण्याची,

जसं की आपलं बालपण बालपणात साधी कुणी एक चॉकलेट दिली, तरी आभाळभर आनंद असायचा, कुणाची खेळणी खेळायला भेटली तरी आभाळ ठेंगणं वाटायचं, इतकं निरागस हसू ,आनंद ,प्रेम आणि जिव्हाळा कुठल्याही स्वार्था विना मनमोकळेपणाने आपण आनंद लुटायचो…

ती निरागसता वयाच्या वाढत्या टप्प्याटप्प्याने कुठेतरी हरवत जाते, आणि आनंद हा फुकट मिळालेला असून सुद्धा जीवनाच्या कारकिर्दीत आपण त्याला महाग करून सोडलेयं, मला तर वाटतं लोकांनी वेड म्हटलं तरी चालेल ,इतकं मनमुराद हसावं,

आजची आपली परिस्थिती अशी आहे, की आपलेच चेहरे कधीतरी हसतात, कारण ते अडकलेत भविष्याच्या चिंतेत, करिअरच्या मागे, कुटुंबाच्या आर्थिक अडचणीत ,सतत कुठलातरी गोष्टीच्या प्रेशरमध्ये, आपल्या चेहऱ्यावर उसनं अवसानं आणलेलं हसू असतं, आपण इतरांना तरी ते कसे देणार, कारण की आपण इतरांना तेच देऊ शकतो , जे आपल्याकडे आहे, त्यामुळे आधी आपण आपल्या आनंदाची जबाबदारी घेऊया ,आणि ती सर्वस्वी आपल्या स्वतःची आहे, जी व्यक्ती इतरांना आनंद वाटत राहते, त्यांच्या आजूबाजूला लोकांची दरवळ नेहमी असते,

बघा आयुष्यात काही व्यक्ती अश्या असतात, की आपण त्यांना अगदी पाचच मिनिटं भेटलो, तरी आपला निराशेचा मूड अगदी आनंदात बदलून जातो, व आपण ते व्यक्ती सोबत इतके खडखडून हसतो, जसे की आनंदाच्या सागरात न्हाऊन आलोय असे वाटते ,

आपल्याला आपले दुःख नेहमी मोठे वाटत असते, तसे तर आपला आनंद नेहमी मोठा असतो, पण आपले त्यावर लक्ष नसते, दुःख ही खूप छोटी गोष्ट असते आयुष्यातली, व आनंदी ही मोठी पर्वणी असते ,कुणाच्यातरी आयुष्याला सजवण्याची, त्यामुळे आपल्या वाटेला जर संधी आली तर आपण इतरांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करूया, व स्वतःही आपल्या आनंदाला भरभरून जगूया ,कारण की आनंदाचे क्षण जिथे जिथे मिळतील, ते वेचत चला ,कारण ते अनमोल असतात….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!