आपण स्वतःसोबतही चांगला वेळ घालवू शकतो, हे पार विसरलोय.
रोहिणी राधाकिसन
आपण आपल्या आनंदी राहण्याची व्याख्याच बदलवली आहे. आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगतो, परंतु आपला आनंद कश्यात आहे हेच आपण ठरवू शकलो नाहीत. जसा प्रत्येकाचा मूड बदलतो तस आपल्या priority बदलत असतात.
त्याने माझ्या सोबत अस केलं म्हणून माझ्या मूड ऑफ झाला आहे. त्याने मला असं बोलल म्हणून मला खूप दु:ख झालंय. त्यांनी मला कार्यक्रमाच आमंत्रण नाही दिले म्हणून मी जेवले नाही. आणि याउलट त्याने मला गिफ्ट दिलं म्हणून मी खूप खुश आहे. मला आज त्याने मूवीला नेल मला खूप मज्जा आली.
माझ्या मुलांनी मला सर्प्राइज दिल मला खूप खुशी वाटली. आणि असच आपला आनंद आपण दुसऱ्यांच्या वागणुकीवर ठरवतो. ज्यांच्यावर आपल नियंत्रणच नाही त्याच्यामुळे आपण आपली वेळ आणि आनंद दोन्ही गमावतोय.
गृहिणी स्वतःच पूर्ण आयुष्य कुटुंबाच्या सुखासाठी अर्पण करतात. आणि हे विसरतात की त्यांचही स्वतःच असं आयुष्य आहे जे त्यांनी स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्यासोबत जे काही चांगल वाईट घटत असत ते आपल्यामुळे नाही तर समोरच्याच्या वागणुकीचा आपल्यावर पडणारा प्रभाव असतो.
एवढ असूनही आपण स्वतःसाठी का नाही जगत आपला वेळ आपला आहे मग तरीही आपण ती वेळ आपल्यासाठी चांगली का नाही बनवू शकत. पहिले घरात तीन लोक जरी राहत असले तरी घर नेहमी भरलेल असायचं. पण सध्याची स्थिति अशी आहे की घरात नाही लोक आहेत नाही घरं भरलेली आहेत. प्रत्येक जण हा मोबाईल च्या जाळ्यात अडकलेला आहे. नाही कोणाचं कोणाकडे लक्ष आहे ना कोणाची जाणीव आहे.
मुलं असून घरात आई एकटी आहे. नवरा असून बायकोला एकट वाटतंय. आई असूनही लहान मुल आवाज देऊन देऊन थकते पण आईला मोबाईल पुढे त्या बाळाचा आवाज ऐकू नाही येत.
पण खरंच एवढच आहे का आपल्या आयुष्यात आपलं स्वतःच अस्तित्व नाही आहे का काही? हे सगळं विसरून आपण फक्त या वेढ्यांमध्ये अडकत चाललोय.
आपला वेळ आपण आपल्या स्वतःसोबत, स्वतःसाठी खर्ची करू शकतो हे पार विसरलो आहोत.
कारणं खूप आहेत, खूप गोष्टींची टाळाटाळ चालली आहे, खूप सवयी ज्या ना आपल्यासाठी चांगल्यात ना आपल्या शरीरासाठी, आणि सर्वात महत्वाच म्हणजे अपेक्षा वाढलेल्या आहेत. पण त्या अपेक्षा इतरांकडून नाही तर स्वतःकडून वाढल्या पाहिजेत.
या सगळ्या मधून तुम्ही बाहेर पडू शकता, पण तुम्हाला स्वतःला काही गोष्टींमध्ये बदलाव लागेल.
*प्रत्येक वेळी तुम्हाला कोणी येऊन बोलण्याची गरज नाही तुम्ही पुस्तकांशी मैत्री करू शकता.
*एकट वाटतंय स्वतःला ट्रीट देऊ शकता, मस्त एक कप चहाची. नेहमी चहा हा सर्वांसोबतच का प्यायचा. कधी स्वतः सोबतही पिऊन बघा.
*नेहमी कोणी येऊन काही बोलावं आणि आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा. का आपण दुसऱ्याच्या चूकीची शिक्षा स्वतःला द्यावी.
*प्रत्येकवेळी दुसऱ्यासाठी नाही तर कधी स्वतःचेही छंद स्वतःच्या आनंदासाठी जोपासावे. काही तरी नवीन शिका. काही नवीन आवडी बनवा स्वतःला त्यामध्ये गुंतवून ठेवा. एखादी जुनी आवड , छंद जो मागे पडलाय त्याला जोपासा.
आपल्या प्रत्येकाच काही वेगळं नाही, एकतर कुटुंबासाठी नाही तर इतरांसाठी पण, कधी स्वतःसाठी आपण काही वेगळ करण्याचा प्रयत्न नाहीत करत. आणि जे स्वतःचा विचार करतात त्यांचा विचार म्हणजे फक्त आणि फक्त इतरांकडून असलेल्या अपेक्षा.
एक स्त्री तीचं घर सांभाळून स्वतःच्याही इच्छा पूर्ण करू शकते. पण कुठेना कुठे आपण हे मान्यच करत नाही की आपण आपल्यासाठी आपल्या वेळेचा उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकतो.
परिस्थिति कशीही असो कुठे ना कुठे ती आपल्याला घडवत असते. जर काम नाही आहे तर काम नाही म्हणून रडत न बसता आपण त्या वेळेच्या उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो आणि काही नवीन कला, ज्ञान अवगत करून स्वत:ची किंमत वाढवू शकतो नक्कीच नाही का?.
दुसऱ्यांकडे त्यांच्या वेळेची भीक मागत बसण्यापेक्षा आपला वेळ त्यांच्यामागे वाया न घालवता, आपण त्यावेळेला स्वत:साठी खर्ची करून त्याचं मोल करू शकतो. स्वतःला सक्षम बनवू शकतो. स्वतःच्या चांगल्यावेळेचा चांगला फायदा नक्कीच करून घेऊ शकतो.

Mi kityek varsh he asach aayushya njoy karat aahe mala khup mast vatt
खरच खुप सुंदर लेख आहे माझ्यासाठीच आहे अस वाटल.thank you so much
Kharch chan watla wachun… Thod antarmukh whayla zala
Khup chan watat ani ek motivation milt tya mdhun ani mla ya lekh mule khup khi shikayala milale thank you so much