आपण स्वतःला कसं चुकीचं समजून घेतो, हे पटवून देणारा लेख.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
सुमित लहानपणापासून तसा हळवा. कोणतीही गोष्ट लगेच त्याच्या मनाला लागतं असे. पण हळवा असला तरी कामाच्या बाबतीत, जबाबदारीच्या बाबतीत तो कधी मागे हटत नसे. सांगेल ती काम पटापट करणे, चांगल्या प्रकारे करणे त्याला आवडायचे. त्याच्या कामाचं लोक कौतुकही करायचे. अडल्या नडलेल्याला मदत करणे तो त्याचे कर्तव्यच मानायचा. पण आधी म्हटल तस हळवा स्वभाव. त्यात दुसऱ्याने काही बोललं तर वाईट वाटण आलच पण स्वतःकडूनही काही चूक झाली, कमी जास्त झालं तर पूर्ण दोष तो आपल्या अंगावर घेत असे.
जे काय झालं ते माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे असा ग्रह तो करून घ्यायचा आणि इतकी मेहनत करून स्वतः मात्र लगेच उदास व्ह्यायचा. त्याच्या घरातली लोक, त्याचे मित्र त्याला समजावयाचे “अरे! इतकं काय, चूक होते कोणाकडूनही, आमच्या कडून होत नाहीत का? त्यात काय मनाला लावून घेण्यासारख आहे. आणि प्रत्येक वेळी तू सर्व स्वतः वर घेण्याची काही गरज नाही.” तो सर्वांच ऐकायच म्हणून ऐकायचा. परत तस काही झालं ही याच आहे तेच पुन्हा सुरू व्हायचं.
असच एक प्रसंग घडला. सुमितच्या कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता व मैनेजमेंटची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. म्हणजेच सर्व प्रोग्राम अरेंज करण, कोणी भाग घेतला आहे त्यांची यादी काढून सिक्वेन्स लावणं तसच पाहुण्यांना वैगरे बोलवण. सर्व यानेच करायचं होत. त्याप्रमाणे तो सर्व काम करत होता. त्याने पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पत्रिका पण तयार करून घेतल्या व त्यानुसार वेळेवर पाठवल्यादेखील. प्रोग्राम चा दिवस उजाडला.
सकाळपासून घाई चालली होती. सुमित ला तर पाहुणे आले की त्यांची व्यवस्था, प्रोग्रमची सुरुवात करून घेणं हे सर्व पाहायचं होत. प्रोग्राम सकाळी १० ला सुरू होणार होता. पाहुण्यांना पण तेच सांगितलं गेले होत. पण दहा वाजून गेले तरी पाहुणे आले नव्हते. त्यामुळे सुरुवात करता येत नव्हती. सुमितला माहीत होत की त्याने पत्रिकेवर वेळ बरोबर घातली होती. तरी उशीर होत होता. या सगळ्या गोष्टींमुळे तो अस्वस्थ झाला. आपण इतकी मेहनत करून काहीतरी कमी पडलच अस त्याला वाटू लागलं व तो दुःखी होऊन एका बाजूला जाऊन बसला. इथे अस असू शकत होत की त्या पाहुण्यांची काही वैयक्तिक कारण असतील म्हणून त्यांना वेळ झाला असेल. पण हा विचार त्याने केला नाही. त्याचा स्वभाव झाडावरून फांदी तुटली तरी माझ्यामुळे तुटली असा होता. त्यामुळे आताही त्यांना उशीर होतोय याचा अर्थ आपणच काहीतरी गोंधळ घातला अस त्याला वाटलं.
काही वेळाने पाहुणे आले व प्रोग्राम सुरू झाला. पण त्याच मन दुःखीच राहिलं. कॉलेजच्या सरांनी त्याची ओळख पाहुण्यांशी करून दिली व त्याच कौतुक देखील केलं. पण तो उदासच दिसत होता जे पाहुण्यांना पण जाणवलं. जेव्हा त्यांनी याच कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला, “माफ करा सर, मी प्रयत्न केला होता सर्व नीट करण्याचा पण माझ्याकडून काहीतरी कमी जास्त झालं असणार म्हणून तुम्हाला यायला आज उशीर झाला. मलाच कदाचित वेळ नीट सांगता आली नसेल.” यावर ते हसले व म्हणाले, “अरे बाळा, तुझी काहीही चूक नाही. तू वेळ बरोबरच सांगितली होती आणि आम्ही त्याच वेळेत आलोही असतो. पण वाटेत गाडी बंद पडली. बरं जिथे होतो तिथे नेटवर्क नव्हत त्यामुळे तुम्हाला कोणाला कळवता आलं नाही.
तू हा प्रोग्राम खूप सुंदर अरेंज केला आहेस. आणि कमीजास्त हे सगळीकडे होतच असत. पण याचा अर्थ त्याचा पूर्ण दोष आपल्यावर घ्यायचा अस होत नाही. त्याला बाकीची पण कारण असतात तीही आपण पाहिली पाहिजेत.” त्यांचं हे बोलणं ऐकून सुमित पुन्हा ठीक झाला. त्याला त्याची चूकही समजली व त्याचा चेहेर्यावर जो उदासपणा होता तो जाऊन परत आधीची उत्साह आला.
सुमित प्रमाणे आपल्या आजूबाजूला अनेक अशी लोक असतात जी काहीही झालं तरी पूर्ण दोष स्वतःवर घेत असतात. जे काय झालं आहे ते माझ्यामुळे. पाणी आलं नाही माझी चूक, घरात भांडण झाली माझी चूक. हे असे विचारच एक वैचारिक चूक आहे. ज्याला personalization अस म्हणतात. यामध्ये व्यक्ती ज्या गोष्टीचा आपल्याशी संबंध नसतो अश्या गोष्टींचा पण दोष घेते आणि त्यातून वेगवेगळ्या भावना पण जाणवतात जसे की guilt. यात विनाकारण आपण स्वतःला चुकीचं समजायला लागतो. ज्याची काही गरज नसते. हा अस असू शकत की आपल्याकडून काहीतरी झालेले असेल ते आपण जबाददारी म्हणून स्वीकारलं देखील पाहिजे तर आपण चूक सुधारू शकतो.
पण पूर्णपणे दोष माझा आहे अस म्हणणं मात्र चुकीचं आहे. यातून आपण आपल्याला त्रास करून घेतो ज्याची काही गरज नसते. झाल्या प्रंसगांत आपण काहीतरी योगदान देत असतो. आणि आपल्याप्रमाणेच अश्या अनेक गोष्टी असतात ज्या ती चूक होण्याला कारणीभूत असतात. त्याही आपण पाहिल्या पाहिजेत. त्यांचाही विचार केला पाहिजे.
तेव्हाच आपल्याला समजेल की या गोष्टीत मी २०%चुकीचा असू शकतो पण १००%नाही. असा विचार केला तरच आपण ती चूक सुधारू शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Very good…. Inspirational.