Skip to content

आपण ‘Nonsense’ गोष्टींवर वेळ वाया घालवला, हे नंतर कळण सुद्धा महत्त्वाचं असतं.

आपण ‘Nonsense’ गोष्टींवर वेळ वाया घालवला, हे नंतर कळण सुद्धा महत्त्वाचं असतं.


अपर्णा कुलकर्णी


ऋषी, मीनल आणि अपूर्वा या तिघांची खूपच घट्ट मैत्री. इतकी घट्ट की मैत्रीसाठी काहीही करायला तिघे मागे पुढे बघणार नाहीत. कॉलेजमध्ये तिघेही ग्राजुयेशनच्या सेकांड इयरमध्ये शिकत होते. एकदा ऋषी जिन्यात मोबाईल बघत बसला होता, तेवढ्यात कोणाचीतरी काही पुस्तके खाली पडली आणि ऋषी उचलून देण्यासाठी वाकला. सोबत एक खूप सॉफ्ट आणि गोरापान हात त्याने पाहिला, त्याने कोण आहे बघण्यासाठी मान वर केली तर समोर एक खूप सुंदर मुलगी होती.

या आधी ऋषीने तिला कॉलेजमध्ये कधीच पहिले नव्हते. पुस्तकं घेताना नकळत दोघांचा स्पर्श एकमेकांना झाला, ऋषी तिच्या नाजुक स्पर्शाने खूप शहारला. दोघे उठून उभे राहिले ऋषी तिला काही बोलणार इतक्यात अपूर्वा आली आणि म्हणाली हाय नेहा. मला मीनल म्हणाली आज तू येणार आहेस. वेलकम इन अवर कॉलेज. या आधी तू कुठे होतीस ?? नेहा म्हणाली, मी सांगलीत होते पण बाबांची बदली झाली आणि इकडे शिफ्ट झालो आम्ही.

मला सरांना भेटायचे आहे काही डॉक्युमेंट द्यायचे आहेत प्लीज सरांची केबिन कुठे आहे सांगशील का ?? अपूर्वाने तिला केबिन दाखवली आणि ती गेली, ऋषी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच होता. अपूर्वाने त्याच्या पाठीत जोरात मारले तसा तो भानावर आला. काय ग आप्पे इतक्या जोरात मारत का कोणी ?? हो का रे लागलं का तुला ?? नाटकी आवाजात अपूर्वा विचारत म्हणाली, मूर्खा फिल्मी सीन झाल्यासारखं पहिल्याच भेटीत पुस्तकं पडली आणि ती उचलून देताना तू तिच्या प्रेमात पडला अस तर झालं नाही ना ?? थोडीफार तसच झालं आप्पे ऋषी लाजत म्हणाला तशी अपूर्वा त्याला चिडवायला लागली.

कॉलेजचे बरेच दिवस असेच निघून गेले. पण सुरुवातील आकर्षण वाटणारी गोष्ट ऋषिला आता प्रेम वाटू लागली. कॉलेजमध्ये रोजच नेहाचे समोर असणे, तिच्या सोबतचा सहवास सगळंच त्याला आता हव हवं वाटत होत. पण नेहा ग्रुपमध्ये असूनही ती फक्त मीनल आणि अपूर्वाशी बोलत असे. ती कधीच ऋषी सोबत बोलत नव्हती. ऋषी बोलेल तेवढेच ती त्याच्याशी बोलायची.

बघता बघता दिवस जात होते तसे तसे ऋषी जास्तच प्रेमात पडत चालला होता नेहाच्या. ही गोष्ट मीनल आणि अपूर्वाच्या लक्षात आली आणि अपुर्वाने सरळ हे सगळं नेहाला जाऊन सांगितले आणि म्हणाली ऋषी चांगला मुलगा आहे. त्याच्याशी बोल आणि मग ठरव काय ते मी तुझा नंबर ऋषाला देऊ का ?? तिला वाटले आता नेहा आपल्यावर चिडणार पण तसे काही झाले नाही. ती सरळ म्हणाली, दे तू त्याला माझा नंबर मी बोलेन त्याच्याशी. तिचे हे बोलणे ऐकून अपूर्वा धावतच ऋषाकडे आली आणि त्याला मिठी मारत नेहा काय बोलली ते सांगू लागली. ऋषी तर वेडाच झाला होता.

त्याने आपुचे आभार मानले आणि घरी येऊन लगेच नेहाला फोन केला. नेहा म्हणाली, मला अपूर्वा बोलली तुला माझ्या बद्दल काय वाटतं ते पण माझ्या मनात तसे काही नाही. मित्र म्हणून मी तुझ्याशी बोलू शकते. ऋषीला जरा वाईट वाटले पण मैत्रीचे रुपांतर प्रेमात होईल याची त्याला खात्री होती.

हळू हळू दिवस जात होते. ऋषी आणि नेहा कॉलेजमध्ये नाही पण घरी मात्र फोनवर सतत बोलत होते. लास्ट इयर सुरू झाले आणि नेहाच्या घरचे तिच्यासाठी मुलगा शोधू लागले. मग मात्र ऋषी काळजीत पडला आणि तिच्या भावना काय आहेत हे जाणून घेऊ लागला. पण नेहा मात्र काहीच बोलत नव्हती. बघता बघता लास्ट इयरची फायनल एक्साम आली आणि तिने तिच्या लग्नाची पत्रिका ऋषींच्या हातात ठेवली. अपूर्वा आणि मीनलला खूप वाईट वाटले. मी जर मध्ये पडून ऋषला नंबर दिला नसता तर बरं झालं असतं. आज ही वेळच त्याच्यावर आली नसती असे अपूर्वाला वाटू लागले आणि तिने ऋषाची माफी मागितली.

अरे आप्पे तू माझी माफी मागतेस ?? माझा तर विश्वासच बसत नाही. अग तू तर चांगल्या मनानेच करवयला गेली आणि नेहाने पण मैत्रीच्या नात्यानेच बोलत आहे हे सांगितले होते पण मला वाटलं की पुढे जाऊन ती पडेल माझ्या प्रेमात. पण तसे झाले नाही पण तुझ्यामुळे मैत्रीचे जे क्षण मी तिच्या सोबत जगलो ते तुझ्या मुळेच मला मिळाले. या सगळ्यात मला एक गोष्ट समजली की, मी ‘Nonsense’ गोष्टींवर वेळ वाया घालवला, हे उशिरा लक्षात आले पण नंतर कळण सुद्धा महत्त्वाचं असतं. हो ना ?? पुढच्या वेळी अनुभवाचा उपयोग च होईल मला. ऋषीच्या या बोलण्यावर मात्र आपु आणि मीनल त्याला मारायला धावले.

मित्रानो प्रेम ही नॉनसेन्स गोष्ट नक्कीच नाही. कधीच असू शकत नाही. पण इथे ऋषीचे प्रेम,भावना एकतर्फी होत्या. हे त्याने समजून न घेता भावनेच्या भरात तो वाहत गेला. पण वेळीच त्याला ही गोष्ट समजली आणि आपण कुठे चुकतो आहोत हे त्याच्या लक्षात आले. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेकदा असे बरेच प्रसंग येतात जिथे त्या गोष्टींना, त्या वागण्याला काहीच अर्थ नसतो. तरीही आपण त्या गोष्टी करतो आणि नंतर आपण किती बावळट पणा केला हे आपल्या लक्षात येऊन आपणच आपल्या वागण्यावर हसतो. अर्थहीन गोष्टी करणे चुकीचे नाही पण त्यातून समज न येणे चुकीचे आहे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!