Skip to content

आपल्याला स्वतः विषयी जितकी माहिती असते त्यापेक्षाही अधिक आपण मनाने मजबूत असतो.

आपल्याला स्वतः विषयी जितकी माहिती असते त्यापेक्षाही अधिक आपण मनाने मजबूत असतो.


टीम आपलं मानसशास्त्र


जो नसीब मैं है वो चलकर आयेगा , और जो नहीं है वो आकर भी चला जायेगा ! आयुष्याला एव्हढे serious घेणे गरजेचे नाही.

बरेचदा आपण म्हणतो की मला माहिती मी कसा / कशी आहे. माझ्यात काय capacity , क्षमता आहेत माहिती आहे. हे सकारात्मक बोलणे ही असते किंवा याउलट माझ्यात ती क्षमता नाही , मी ते करू शकत नाही असे म्हणणे नकारात्मक असते.

उदाहरण :अतुल अतिशय हुशार .पहिल्या पासून पहिल्या पाच क्रमांकात येणारा. इंजिनिअर होवून परदेशी जायचे पक्के ठरविले होते. आणि त्याने त्याचे ध्येय पूर्ण केले ही. आई बाबा यांचा परदेशी जाण्यास विरोध होता. दोन लहान मुले होती. बायको वर सगळी जबाबदारी सोडून हट्टाने परदेशी गेला. त्याला असे वाटत होते की परदेशात पगार ही भरपूर असतात. थोडी वर्ष तिकडे नोकरी करू. पैसे कमवू आणि मग saving करू. भारतात आल्यावर मोठे घर घेवू. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर मिळणारे पैसे आणि तिथले घरभाडे , महिन्याचा खर्च , तिथले टॅक्सेस हे सगळे खर्च टाळता न येणारे. मग अजून जास्त काळ परदेशात राहू आणि पैसे साठवू मग भारतात घर घेवू असे ठरविले. बायको मुले ही तिकडे गेली . सुरुवातीला भाड्याने घर होते. बायको मुले आल्यावर दोन तीन वर्षांनी स्वतचं छोटेसे घर घेतले. त्याचे हप्ते. आणि इतर खर्च यात saving होत नव्हते. आहेत ते खर्च कसे बसे भागत. थोडी फार शिल्लक ..

पण अचानक तिकडे देशात मंदी आली आणि याच्या कंपनी मधल्या बऱ्याच लोकांना कमी करण्यात आले. त्यात अतुल ला ही कमी करण्यात आले.

अतुल ला स्वतः ची हुशारी , त्याची स्किल त्याची क्षमता याची खात्री होती. स्वतः वर विश्वास होता. पण तरी अचानक कोसळलेले संकट आणि असे काही घडेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. परदेशात येणाऱ्या अडचणी , तिथली भाषा , तिथल्या लोकांच्या सोबत काम करताना त्यांचे येणारे विचार आणि अनुभव या सोबत आपल्या अनुभव , विचारांची देवाणघेवाण आणि जुळवणुक याची तयारी होती त्याची.

पण अचानक हे असे काही विचित्र प्रसंग घडले. काम गेले. अतुल ला त्याच्या स्वतः विषयी , शिक्षण ज्ञान याविषयी त्याला माहिती होती. जाण होती. पण या प्रसंगी परदेशात ही त्याला मनाने अजून जास्त खंबीर , मजबूत राहावे लागले. जसे परदेशात आपण एकटे असुंन असे प्रसंग कोसळले तरी खंबीर राहण्याचा प्रयत्न . किती ही वाईट वाटले असेल तरी मनावर नियंत्रण ठेवून त्या क्षणी भावनांच्या भरात काही चुकीचं घडू नये याची काळजी , दक्षता घेताना येणारे व्यवहारिक प्रश्न ही सतावत होते. प्रत्यक्षात नोकरी गेल्यावर थोड्या फार साठलेल्या पूंजी मधून घरखर्च , घराचा हप्ता भरणे सुरू होते.

पण साठलेला पैसा किती काळ टिकणार. त्यात परदेशात केवळ अतुलच्या भरोषावर आलेले त्याचे कुटुंब. त्यांना जपणे ही मोठी जबाबदारी होती अतुलवर. अतुल ला आपण कोणत्याही प्रसंगातून मार्ग काढू . काही ना काही करू याची आपल्या स्वतः विषयी जितकी माहिती असते त्यापेक्षाही अधिक आपण मनाने मजबूत असतो. याचे उदाहरण म्हणजे अतुल. स्वतः मनाने मजबूत राहिला. कुटुंबाला आधार दिला.मुलांना कोणत्याही प्रकारची जाणिव होवू दिली नाही. बायकोला विश्वासात घेऊन सांगितले आणि अतिशय शांतपणे तिला समजावले. सगळ्यातून मार्ग काढेन याची खात्री तिला दिली. दुसरी मिळेल ती नोकरी स्वीकारण्याची त्याने त्याच्या मनाची तयारी केली. आधी पेक्षा कमी पगार आणि त्याचा हुद्दा ही कमी तरी त्याने दुसरी नोकरी शोधली .स्वीकारली.

त्याकरिता त्याची एव्हढे वर्षाची स्वप्ने तुटली , आधीच्या नोकरीपेक्षा आता जे आहे ते स्वीकारणे यात मनाचा खंबीर स्वीकार दिसून आला. कुठेही कोणावर राग , चिडचिड नाही , भांडणे नाहीत. मग आधीच्या कंपनी मध्ये असो किंवा ताण सहन न झाल्याने मुले आणि बायको यांवर कधी चिडचिड , राग ,बडबड ही केली नाही. कुठेच काही बिघडले नाही अशी मनाची मजबूत अवस्था. नवीन मार्ग शोधण्याची मनाची तयारी केली त्याने. कुठेही आपली लोक साथ देण्यास किंवा आधार देण्यास ही आई बाबा नव्हते , नातेवाईक नाहीत ..कुठेही नकारात्मक विचार मनातून न करून आपले आणि कुटुंबाचे जीव घेणे देणे या मानसिक स्थिती मधून केवळ मनाने मजबूत असल्याने या त्रासातून , कात्रीत पडलेल्या संकटाला सामर्थ्याने एकट्याने तोंड देत बाहेर पडणे यात मन मजबूत होते म्हणून टिकला अतुल आणि त्याचे कुटुंबीय.

आपल्या ही सगळ्यांच्या आयुष्यात अनेक वेळा असे घडत असते.आपल्याला स्वतः विषयी जितकी माहिती असते त्यापेक्षाही अधिक आपण मनाने मजबूत राहावे लागते.

नवीन नोकरी मध्ये परत पहिल्यापासून सगळे सुरू करताना , काम समजून घेताना , त्याच्यापेक्षा ज्युनिअर असणारे ही तिथे senior असताना त्यांच्या सोबत हसत खेळत काम सुरू केले. मन किती हि भूतकाळात , त्याच्या आधीच्या अनुभवावर अजून चांगले मिळाले असते अशा भविष्य काळात ही भरकटू दिले नाहीं. मनाचा संयम आणि स्थैर्य प्रचंड मानसिक बळ लागते. ते अतू कड्डे आहे हे त्याने यातून सिद्ध केले.

खरे तर आपल्याला स्वतः विषयी जितकी माहिती असते त्यापेक्षाही अधिक आपण मनाने मजबूत असतो. आपल्या रोजच्या आयुष्यात बघा की आपल्याला खात्री असते की आपण एखादी गोष्ट नक्की करू शकतो. पण काही वेळेस ती गोष्ट actual करताना आपल्याला अपयश येते. ती गोष्ट आपण पूर्ण करू शकत नाही.

मिशन मंगल चित्रपट बहुतेक सगळ्यांनी बघितला. पहिल्यांदा त्यांचे मिशन abbort करावे लागते. तेव्हा साहजिकच सर्व जण मनाने खचून जातात. एव्हढे प्रयत्न करूनही आपण पुढे या मिशन मध्ये काहीच करू शकत नाही ही त्यांची हतबलता /helpless असते. Hopeless असतात. कोणतीच आशा त्याक्षणी पुढची दिसत नाही. पण तरी ही राकेश म्हणजे अक्षय कुमार काहीच घडले नाही असे. कारण परत नक्की आपण हे मिशन पूर्ण करणार याची खात्री होती त्याला पण मिशन abbort केल्यावर तो विद्या बालन ला म्हणतो की मिशन मंगल का failure मुबारक. . त्या प्रसंगी तो लाडू खातो तेव्हा प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याला रागाने विचारतात ही एव्हढे सगळे मिशन तुमच्यामुळे abbort केले एव्हढे मोठे नुकसान झाले तरी लाडू कसे खाता. तेव्हा तो उत्तर देतो की , कहा लिखा है नुकसान पे खाना मना है ?

Responsible कोण असे विचारल्यावर तो राकेश म्हणतो की मी responsible आहे decision माझा होता. खरे तर संपूर्ण टीम responsible असताना केवळ मी एकटा responsible आहे हे सांगताना तो मनातून आपल्या टीम ची किती काळजी घेत होता हे जाणविले. आणि सगळ्याला स्वतः तोंड देण्यास समर्थ आहे .. मनाने मजबूत आहे हेच जाणवून दिले त्याने.

आपल्याला स्वतः विषयी जितकी माहिती असते त्यापेक्षाही अधिक आपण मनाने मजबूत असतो. हे खूप कठीण प्रसंगी , आपल्यावर कोसळणाऱ्या संकटात. जास्त जाणवते. आपल्या मर्यादा माहिती असतात पण तरी ही त्यापलीकडे जावून कोणतेही भावनिक असंतुलन न होता आपण त्या प्रसंगात आहे त्यापेक्षा ही अधिक मनाने मजबूत असतो. जसे महेश खूप हळवी व्यक्ती जी आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करते , जपते त्यांच्या करिता सगळे त्याग करत असते. त्यांना आनंद मिळावा म्हणून धडपड करत असते. तेच विश्व असते . आणि अचानक वडील हृदयविकाराने कायमचे सोडून जातात. त्याला ही कल्पना ही त्रासदायक असताना , तो हे कधीच स्वीकारू शकणार नाही अशी ठाम समजूत असताना तेव्हा एक ना एक दिवस हे घडणार होते.. चिरंजीवी कोणी नाही असे मनाची समजूत घालून ते सगळे प्रसंग अतिशय खंबीरपणे , मजबूत मनाने महेश पार पाडतो.

निसर्ग नियम हा आहे की या जगातला कोणीही मनुष्य कायम स्वरुपी राहणार नाही. आयुष्य जर खरेच इतके सुंदर असते तर आपण जन्माला येताना रडत रडत आलो नसतो. आणि एक गोड सत्य हे सुधा आहे की, आपण जाता जाता लोकांना रडवून गेलो नसतो. त्यांच्या डोळ्यात आपल्या करिता अश्रू आले नसते.

असे प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रसंग घडत असतत. ते स्वतः ला जेवढे ओळखत असतात त्यापेक्षा ती situation अधिक खंबीरपणे हाताळतात.आणि अनेक मार्गातून सुटका करून नवे मार्ग ही शोधतात. यात मन स्थिर आणि मजबूत साथ देते म्हणून ते शक्य होते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!