आपण लोकांचं वागणं बदलू शकत नाही पण त्यांच्या वागण्यावर आपली reaction बदलू शकतो.
रिया माझी मैत्रीण…नेहमी बघावं तेव्हा अगदी उत्साही दिसायची.. तिच्याकडे पाहिलं की अस वाटायचं अरे हिला काही दुःख काही टेन्शन वैगेरे आहे की नाही… बघावं तेव्हा एक सुंदर हास्य तिच्या चेहऱ्यावर नेहमी असायचे…
तिच्या लग्नाला दोन वर्ष झालेले आणि ती नेहमीच मला घरी बोलवायची.. एकदा तर तिचा अड्रेस सुद्धा घेतला.. पण मला काही वेळ मिळाला नाही.. त्यादिवशी मी नेमकी ऑफिस च्या कामानिमित्त तिच्या गावी गेली होती.. मग माझ्या लक्षात आले की रिया याच गावी राहतेय.. म्हणून काम आवरलं की अचानक जाऊन रियाला भेटायचं अस मी ठरवलं..
अचानक मला पाहिल्यावर रिया किती खुश होईल.. तिला वेगळाच आनंद मिळेल.. माझं surprise तिला खूप आवडेल म्हणून मी तिच्या आवडीचे पदार्थ घेऊन तिच्या घरी गेली..
घरी जाताच मला पाहिल्यावर रियाचे डोळे एकदम पाण्याने भरलेले.. पण हलकीशी Smile देत तिने मला घरात बोलवलं.. नेहमी हसणाऱ्या रियाचा उदास चेहरा आणि पाणावलेले डोळे पाहून मलाच आश्चर्य वाटलं…पण घरात सर्व असताना मी तिला काहीच विचारलं नाही..
नंतर जेवण झाल्यावर आम्ही दोघीच बोलत बसलो.. सगळे आपापल्या रूम मध्ये गेले.. तेव्हा मी तिला विचारलं.. अग काय झालं तू अशी शांत कधीपासून झाली..?? नक्की काय झालंय मला सांगशील का..?? त्यावर तिला खूप दाटून आल..
अग लग्नाला दोन वर्ष झाली तरी मला अजून काहीच मूलबाळ होत नाही… रियाच ऐकल्यावर मी तिला विचारलं .. मग काय झालं.. यात रडण्यासारखं काय आहे सांग मला…ते नैसर्गिक आहे.. तुमचे प्रयत्न चालू असतील.. पण ते आपल्या हातात नाहीना.. आणि दोनच वर्ष तर झाले आहेत.. काहींना तर अगदी दहा बारा वर्षांनी पण मूल होते…
माझा ऐकून ती म्हणाली अग तू म्हणतेस ते अगदीच बरोबर आहे.. पण हे मला माहीत आहे.. तुला कळतेय पण त्यांचं काय जे या गोष्टी समजू शकत नाही..
यावर मी विचारलं कोण.. तर रिया म्हणाली आमचे नातेवाईक.. शेजारी किंवा कोणीही ओळखीचं भेटलं घरी आले तरी नेहमी नेहमी तेच विचारतात.. कधी कधी तर घरातले सुद्धा माझ्याशी नीट वागत बोलत नाही.. कोणी येऊन गेलं की त्यांचं वागणं बदलत..
आणि तुला तर माहीतच असेल ज्या स्त्रीला मूलबाळ होत नाही तिला कोणत्या नजरेने पाहिले जाते.. काय काय ऐकावं लागते.. आज घर नातेवाईक इथवर नाही तर अगदी ऑफिस मध्ये सुद्धा कोणी मुद्दाम मला प्रश्न विचारतात…. मी खूप वैतागली आहे ग.. आज बर वाटल तुला भेटून .. मोकळं बोलता तरी येतेय..
यावर मी तिला इतकंच बोलली.. की रिया मला सांग आपली ओळख आहे तेव्हापासून मी नेहमी बघते की तू नेहमीच हसरी होतीस..का बरं..तुला कधीच काही दुःख नव्हतं का….यावर ती बोलली नाही पण मला माझं दुःख कोणाला दाखवायला नाही आवडलं..
अग रिया तुझा हसरा चेहरा बघून तर मलासुद्धा वाटायचं की तुला काहीच टेन्शन नाही.. आणि म्हणून मी कधी तुला काही विचारत सुद्धा नव्हती.. आजमात्र मी तुला स्वतःच तुझ टेन्शन काय हे विचारलं.. बरोबर ना..
एक साधा विचार कर बर.. तुला माहित आहे की जे आहे ते नैसर्गिक.. यात तुझा काही दोष नाही ना तुझ्या नवऱ्याचा.. म्हणजे बाळ आज नाही तर उद्या येईल म्हणून तुला काही टेन्शन नाही.. तू त्या बाबतीत पूर्ण सकारात्मक आहेस..
तुला सगळे प्रश्न विचारतात..काहीपण ऐकवतात.. बहुतेकांची तुझ्याशी वागण्या बोलण्याची पद्धत वेगळी झाली आहे.. तर मग तू जाऊन त्यांचे स्वभाव.. त्यांचं वागणं बदलू शकतेस का..
आज एकाला गप्प करशील तर दुसरा आहेच त्रास द्यायला.. आणि अस किती जणांची तोंड आपण बंद करू शकतो .. किती जणांना आपण उत्तर देऊ शकतो.. आज तू कितीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न केलास आणि त्यांनी समजून घ्यावं अशी अपेक्षा केली तरी किती लोक तुला समजून घेतील सांग मला.. कोणीतरी येऊन त्रास देईलच..
मग अशावेळी त्यांच्याकडून समजून घेण्याची.. त्यांचा स्वभाव बदलण्याची अपेक्षा न करता.. तूच स्वतःमध्ये बदल कर.. त्यांच्या वागण्यावर तुझी reaction बदल..
आज कोणी काही बोललं की तू रडतेस.. विचार करतेस.. टेन्शन घेतेस आणि म्हणून तुला जास्त त्रास देतात आणि तुला अजुन जास्त त्रास होतो..पण तेच जर तू मला काहीच फरक पडत नाही अस त्यांना दाखवलं आणि तसच वागलीस तर त्यामुळे सर्वांचे तोंड आपोआप बंद होतील आणि जरी नाही झाले तरी तू स्वतःला कसलाच फरक पडू न देता तुझ रूटीन चालूच ठेव…
कारण समोरचा त्रास देणारा व्यक्ती पहिले आपली reaction ओळखतो आणि मग आपल्याला तसच गृहीत धरतो त्यावेळी आपण जाऊन त्याच वागणं नाही बदलू शकत पण आपली reaction मात्र बदलून त्याला दुर्लक्षित करू शकतो..
तिला समजावून मी परतीच्या प्रवासाला निघाले. आणि काही महिन्यातच रियाचा फोन आला.
म्हणाली तू दिलेला उपाय आज मला आनंदी राहायला कामी येतोय…
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

