आपण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगतो कि दुसऱ्याने बनवलेली पद्धतच आपलं आयुष्य आहे?
रोहिणी राधाकीसान
तनू एक वर्ग सहावीतील मुलगी जीच स्वप्न आहे नृतीका बनण्याच , तिला अभ्यासामद्धे थोडाही रस नाही. पण तिच्या आई-बाबांना हे समजतच नाही, जेव्हा-जेव्हा तनू त्यांना समजावण्याचा
प्रयत्न करायची तेव्हा तिला फक्त एकच उत्तर मिळायच आम्ही तुला एवढे पैसे खर्च करून शिकवतोय ते या असल्या गोष्टींसाठी नव्हे . तिचे परीक्षेत मार्क्स पण काही चांगले येत नसत,
ज्यामुळे तिला फक्त ओरडाच मिळे पण तिच्या आई -बाबांनी तिला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. पण या गोष्टीमागे ,तिच्या आई-बाबांच्या तिला न समजण्यामागे काय कारण असेल
बर, त्यांना ही कळत होतं की आपल्या मुलीचा अभ्यासामध्ये थोडाही रस नाही. ते तिला नृत्यामद्धे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहण देऊ शकत होते , ज्याने ती बरोबरीने अभ्यासाकडेही लक्ष देऊ
शकली असती . पण, त्यांनी असे केले नाही उलट तिच्या अभ्यासावरच भर देऊ लागले. एक पद्धत जीच्यानुसार फक्त शालेय अभ्यासच खूप महत्वाचा आहे बरोबर ना !
अशी खूप उदाहरणं आहेत आपल्या समोर ज्यानि कला क्षेत्रामध्ये , क्रीडा क्षेत्रामध्ये व इतर क्षेत्रांमध्ये खूप नाव कमावले आहे आणि ज्यांनी अगदी कॉलेजही पूर्ण केले नसतानाही
आज उच्च पदावर , मोठ्या-मोठ्या क्षेत्रात नावं मोठी केली आहेत . उदा. स्मृति ईराणी , ऐश्वर्या राय , सचिन तेंडुलकर ,धिरूभाई अंबानी ,आमीर खान ,विराट कोहली आणि
आणखीनही बरेच ज्यांनी अगदी कॉलेजही पूर्ण नाही केलं . मग आपण आपल्या मुलांना का त्यांच्या मनाविरुद्ध काही करण्यासाठी जबरदस्ती करतो, कारण आपल्यासोबतही असचं
झालेल आहे म्हणून त्यांनी ही हेच करायच .
अगदी ही एक पद्धत बनवली आहे आपण, की मी सोसल आहे मग तुला पण हेच सोसाव लागणार पण का ! अगदी सासू-सुनेमध्ये ही घ्या माझ्या सासूने मला अस वागवलं ,तस केल मग माझ्या
सुनेनेही तसंच राहायला हवं . मग एका सासूने सासुपणाच्या पद्धतीला सोडून , मी जे सोसलं ते माझ्या सुनेने का सोसावे असा विचार करून आपण जे सोसलं त्याचा आपल्याला जो त्रास झाला,
तो सुनेला न देता तिला समजून घेतल तर . अशी खूप उदाहरनं आहेत जी आपल्याला अश्या परिस्थितीची जाणीव करून देतात जी फक्त अश्या काही ठरवून ठेवलेल्या पद्धतीमुळे उद्भवतात.
आजच्या या टेक्नॉलॉजीच्या ,पळापळिच्या युगामद्धे माणूस हा एवढा स्मार्ट होऊनही आपण मेंढयांच्या शर्यतीत पळतो ,आपण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने नाही जगत, त्यांचा मुलगा
इंजीनीयरिंगला गेला मग माझा पण मुलगा इंजिनियरिंगलाच जाणार , तो सरकारी परीक्षेची तयारी करतोय मग मीही तेच करणार, कारण हेच चालतं , यालाच स्कोप आहे आजकाल आणि
ते पूर्ण करेपर्यंत अगदी त्या क्षेत्रात काम मिळणंही मुश्किल होऊन जात कारण सर्वजन एकाच शर्यतीत धावली तर हेच होणार बरोबर ना ! मग आपण आपलं नाही ठरवू शकत का
की आपल्याला काय करायचे आहे ते आपण अनेकदा पहिलं आहे जो एकटा धावतो अगदी सातत्याने तो नक्की जिंकतो होना, मग का आपण या पद्धतींमध्ये अडकतो .
आपण आपल्यासाठी योग्य ते निवडू शकतो , आपल्या पद्धती ठरवू शकतो त्यानुसार आपलं आयुष्य जगू शकतो. आपल्यातला प्रत्येक जन हा वेगळा आहे , प्रत्येकाला देवाने काही तरी खास
दिलेल आहे गरज आहे फक्त स्वतःला ओळखण्याची ,स्वतःकडे काय वेगळं आहे ते शोधण्याची ,स्वतःची आवड जपण्याची ,आणि स्वतःसाठी स्वतः निर्णय घेण्याची.
आयुष्य एकदाच मिळत मग आनंदाने,आवडी जपत ,स्वतःच्या पद्धतीने जगूयां की ,का नाही करून तर बघा स्वतःसाठी कधी काही खूप छान ,समाधानी वाटेल !
आयुष्य तेच आहे ,हलके फुलकेच आहे
आठवणी राहिल्या मागे ,समाधान इतुकेच आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

मस्त आहे
Khup chan👏👏👏
Khup chan 👌🏻👌🏻
हा लेख खुपच छान वाटला तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹👍