आपल्या डोक्यात एखाद्या व्यक्तीविषयी येणारे वारंवार विचार कसे घालवावे?
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
मनोज खूप अस्वस्थ झाला होता. त्याच्या डोक्यातून तो प्रसंग आणि त्याबद्दल येणारे विचार जातच नव्हते. सारखे तेच तेच विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. त्यातून त्याच लक्ष पण लागेना. त्याची बायको मनीषा तो घरी आल्यावर त्याच्याशी बोलायला आली, त्याला चहा विचारला पण त्याने कोणत्याच गोष्टीचं नीट उत्तर दिलं नाही. उलट तिच्यावरच ओरडला व मला जरावेळ एकट बसू दे, मला शांतता हवी अस बोलला. मनिषाला पण समजेना नेमके काय झालं असेल. एरवी तो घरी आल्यावर मस्त बोलायचा, दिवसभरात काय काय झालं सांगायचा, तिला काय केलं, दिवस कसा गेला याबद्दल विचारायचा.
पण आज तो खूप अस्वस्थ झाला होता. अस वाटत होत की कोणत्यातरी विचारात गुंग आहे. बर सांगितलं काहीच नव्हत. त्यामुळे तिला पण समजत नव्हत. त्याला विचारू पण शकत नव्हती. कारण तो वैतागत होता. म्हणून तिने ठरवलं त्याला त्याचा वेळ घेऊदेत. शांत झाल्यावर स्वतःहून सांगेल अस म्हणून ती निघून गेली.
इथे मनोज त्याच विचारात होता. झालं असं होत आज ऑफिस मध्ये बॉसने मीटिंग घेतली होती ज्यात त्यांना दिलेले टार्गेट कुठ पर्यंत आले हे सांगायचे होते. ज्यामध्ये मनोजचा ग्रुप पण होता. त्यांचं टार्गेट बऱ्यापैकी पूर्ण व्हायच्या मार्गावर होत. पण त्याच शेवटचं जे काय काम आहे ते त्याने आपल्या ग्रुप मधल्या एका मेंबर वर सोपवल होत. ते करून एकदा चेक करून ते बॉसला सबमिट करणार होते. पण तेच नेमके झालं नव्हत.
आणि जेव्हा बॉसने कामाबद्दल विचारल तेव्हा मनोज ने काही सांगायच्या आधीच ग्रुपमधल्या त्या माणसाने सरळ सरळ अस सांगून टाकलं की सर्व झालं आहे आणि जे काही शेवटचं काम आहे ते सर करत आहेत. यामुळे गोंधळ असा झाला की बॉस ने जेव्हा मनोजला याबद्द्ल विचारल तेव्हा त्याला काहीच सांगता आलं नाही. कारण प्रोजेक्ट पूर्ण झाला नव्हता आणि त्याचा मेंबर पण खोटं बोलला होता. सर्व ऑफिस समोर त्याला अपमानित व्हावं लागलं. जेव्हा सर्व जण निघून गेले त्यावेळी त्याने त्या ग्रुप मेंबरशी, संकेतशी बोलायचा प्रयत्न केला पण तो मात्र टाळाटाळ करत निघून गेला. तेव्हापासून हे विचारांचं चक्र मनोज च्या डोक्यात सुरू झालं.
तो अस का वागला? त्याने अस का केलं? मला सांगायला हवं होत. त्याच्यामुळे मला अपमानित व्हावं लागलं. एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते. त्याच्याशी प्रत्यक्ष काही बोलणंच झालं नव्हत. पण याचे विचार मात्र परकोटीला जात होते. त्याने मुद्दाम तस केलं. त्याला तेच हवं होतं. बॉस समोर मला वाईट ठरवून त्याला चांगलं बनायचं होत. विचारांना काही अंत नव्हता. बर हे विचार करून त्याला काही फायदा होत होता का ? नाही. त्याने त्याला अजूनच त्रास होत होता. कारण गोष्ट होऊन गेली होती. त्याच्यावर वेगेवगळे निष्कर्ष काढून काहीच होत नव्हत. तो स्वतःचा वेळ आणि मूड दोन्ही खराब करत होता. आता हे कुठ पर्यंत होणार होत? तर जोपर्यंत त्याच संकेतशी नीट बोलण होत नाही तोपर्यंत.
एखाद्या प्रसंगावर अशाप्रकारे अति विचार करण्याची सवय बरेच जणांना असते. यातून ते आपला वेळ तर घालवतात पण त्याचसोबत ते वर्तमानात न राहता घडून गेलेल्या घटनेत किंवा पुढे होणाऱ्या घटनेत अडकून पडतात. आता काय चालू आहे, आपण आता काय केलं पाहिजे याकडे त्यांचं लक्षच नसत. एखादी व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही, अस काही केलं जे आपल्याला नको होत तर आपण त्याचाच विचार करत बसतो. पण याने काय फायदा होतो?
आता ती व्यक्ती अस का वागली याच उत्तर तिच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला मिळणार का? तर नाही. कारण आपण कोणाचंही मन वाचू शकत नाही. पण म्हणून तोपर्यंत आपण त्याच गोष्टीचा विचार करून गुंतून राहायचं असा होत नाही. आपण इथे स्वतःला सांगितलं पाहिजे की, वाईट असुदेत की चांगलं काहीतरी कारण असेल म्हणून ती व्यक्ती तस वागली. त्याचबरोबर मी ज्या गोष्टीचा विचार करत आहे, किंवा ज्या माणसाचा विचार करत आहे ती गोष्ट होऊन गेली आहे.
त्या माणसाला जे काय करायचे आहे ते त्याने करून झाले आहे. त्यामुळे तो असा वागलाच कसा? अस करायलाच नको होत या प्रश्नांना, अश्या डिमांडला अर्थच उरत नाही. जे व्हायचं ते झालं. आता आपण काय करू शकतो? असा विचार आपण केला पाहिजे. सतत त्या माणसाबद्दल विचार न करता जे काय झालं आहे, जी समस्या आहे ती सोडवता कशी येईल, ती सोडवण मला आता शक्य आहे का? नसेल तर कधी शक्य आहे? त्यासाठी मी काय केलं पाहिजे असा आपला अॅप्रोच असला पाहिजे.
असा विचार केला तरच आपली ती समस्या सुटू शकते आणि आपल्या डोक्यात जे त्या माणसाबद्दल विचार भरून राहिलेले असतात ते कमी होऊ शकतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
