Skip to content

आनंदी राहण्याचे दोनच पर्याय : परिस्थिती बदला नाहीतर मनस्थिती बदला.

आनंदी राहण्याचे दोनच पर्याय : परिस्थिती बदला नाहीतर मनस्थिती बदला.


रोहिणी राधाकिसन


जीवनात प्रत्येक व्यक्ति हा त्याच्या विचारांनी जसा लहान-मोठा असतो तसेच त्याचं आनंदी राहणं हा सुद्धा त्याचा विचारांचाच खेळ आहे. आपण सर्वांनीच बघितलेल आहे आपल्या घरी आपली आजी, आपली आई यांच स्वतःच काही अस्तित्व नव्हतं तरीही आपण त्यांना कधी उदास नाही पहिलं.

कुटुंबाच्या खुशीत त्यांची खुशी त्या शोधायच्या कधी माझं अस देखील त्यांनी बोललेल नसावं,’माझं कुटुंब’ या व्यतिरिक्त. आपण फक्त जे आपल्याकडे नाही त्याच्या शोधात असतो पण कधी जे आहे त्याच्याकडे लक्ष नाही देत. या जगात येतानाच देवाने आपल्याला खूप श्रीमंत बनवून पाठवलेलं आहे. आणि आजच्या घडीला जर तुम्ही एक निरोगी आयुष्य जगत असाल तर मला नाही वाटत तुमच्या एवढ आनंदी कोणी या जगात असेल म्हणून.

मला सांगा प्रत्येक प्रसंगात आपल्याला दु:ख मिळण्याचं कारण एकच असत . ते म्हणजे आपण वाट बघत बसलेले असतो की कधी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सुख सुविधा मिळतील. आणि इतरांशी स्वतःची तुलना करतो. कधी कधी आपण फक्त स्वप्न बघत असतो की मी असं हे करेन तस ते करेन आणि फक्त स्वप्नच बघत असतो. स्वप्न बघून ती कधी सत्यात नाहीत उतरत. त्यासाठी आपल्यालाच मेहनत करावी लागते, हालचाल करावी लागते.

एखादा आपल्याला ताट भरून देईल. जास्तीत जास्त तो आपल्याला घास भरवेल पण आपण जर तोंडच उघडल नाही तर तो भरवेल कसा आपल्याला तेवढ तरी करावच लगेल, हो ना !

IF YOU CAN’T PREDICT THE FUTURE, CREATE IT.

जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला झिरो फीगर / सिक्स पॅक बनवायचेत पण ना तुम्हाला डायट करायच, ना तुम्हाला योगा करायचाय, ना तुम्हाला व्यायाम करायचाय आणि नाही तुम्हाला बाहेरच्या जंक फूडस ना बाय बाय म्हणायचंय. मग तुम्ही तुमची इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही, जर तुम्ही हे नाही केल तर.

पण तुम्हाला तुमचं सुटलेल पोट बघून खूप लाज वाटते. समोर एखाद्या फीट व्यक्तिला पाहून तुमचा आत्मविश्वास खालावतो. आरश्यात स्वतःला पाहून खूप वाईट वाटत. पण मला सांगा जर तुम्ही काही मेहनत न घेता फक्त दु:खी वाटून घेताय तर याचा काहीच उपयोग नाही. या उलट त्याचे आणखी गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

परिणामी तुम्हाला याची किंमत तुमच्या कामतही मोजावी लागेल. जेथे तुम्ही अगदी आत्मविश्वासाने बोलायचात तेच तुम्हाला क्लायंटस् शी बोलताना स्वतःचा विश्वास खालवलेला जाणवेल. याच कारण अस की human tendency च अशी आहे की आपण एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागलो की आपल्या वागणुकीत त्याची झलक दिसते.

तुम्ही देखील हे बऱ्याचदा अनुभवले असेल की तुम्ही खुश असाल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये खुशी अनुभवता आणि त्या मोमेंट ला तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडलेले फक्त खुशीचे क्षण आठवायला लागतात. आणि या उलट दुखा:मध्येही होते.

मग आता रडत बसून तर आपल ध्येय साध्य नाही होणार, त्यासाठी तुम्हाला हालचाल करावी लागणारच. तब्बेत कमी करण्यासाठी मन मारून डायट हा करावाच लागणार. व्यायाम हा न कंटाळा करता करावाच लागणार. तरच तुमचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल.
आणि जर तुम्ही आणि तुमच मन दोघेही म्हणतायत की नाही आम्ही हे नाही करू शकत तर मग रडणं कशासाठी आणि का?

तुम्ही तुमची परिस्थिती बदलण्यासाठी सक्षम नाही आहात तर मग तुमची मनस्थिती बदला आणि जसे आहात तसे स्वतःचा स्वीकार करा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःची कोणाशी तुलना करू नका. लोकांना तुमच्या संपत्तीवरून तुमच्या आनंदाची गणना करुदया. तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःच्या skillset ओळखून त्या दिशेला वाटचाल करा. तुमचा आनंद ज्या गोष्टींमध्ये आहे ते करा.

परिस्थिति आपल्या हातात नसते पण आपण स्वतः असतो. आपण आपल्यावर काम करून प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो. फक्त विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवर. आणि लक्षात ठेवा फक्त एका गोष्टीवर जग संपत नाही मग ती कुठलीही असो. आनंदी रहा. जे कराल एकतर यश मिळेल, नाहीतर अनुभव मिळेल. प्रयत्न करत रहा. आनंदी रहा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “आनंदी राहण्याचे दोनच पर्याय : परिस्थिती बदला नाहीतर मनस्थिती बदला.”

  1. मान स चा विद्यार्थी असल्याने जीवन गाणे गात्ताच रहने योग्य.. छान 👌 लेख mam.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!