Skip to content

पती- पत्नी मधील लैंगिक जीवन !

वेगवेगळ्या शोधांमधून हे स्पष्ट झालं आहे की, आनंदी वैवाहीक जीवन जगणारे लोक जास्त निरोगी आणि फिट राहतात. पण याच्या मागचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का?
वेगवेगळ्या शोधांमधून हे स्पष्ट झालं आहे की, आनंदी वैवाहीक जीवन जगणारे लोक जास्त निरोगी आणि फिट राहतात. पण याच्या मागचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे नियमीत शारीरिक संबंधातून जे हार्मोन शरीरात निर्माण होतात, ते अॅंटी-एजिंगचं काम करतात. आणि यामुळे वेगवेगळ्या आजारांपासूनही तुम्हाला दूर राहण्यास मदत होते.

सौंदर्य वाढतं.
पती-पत्नी यांच्यात दर आठवड्यात नियमीत शारीरिक संबंध झाल्यास आरोग्य आणि मेंदूवर सकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा शारीरिक संबंध ठेवले जातात तेव्हा शरीरात एंडॉर्फिन हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि हे हार्मोन शरीराची त्वचा चमकदार, सुंदर आणि मुलायम करण्यास मदत करतात. एका जर्मन शोधातून हे आढळून आलं आहे की, जेव्हा एखाद्या महिलेमध्ये एस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं तेव्हा ती महिला वयापेक्षाही लहान दिसते.
तणावमुक्ती
एस्ट्रोजन हार्मोन शरीरात एका रिपेअरींग एजंटप्रमाणे काम करतं. जे वेगवेगळा आनंद आणि आराम देतं. शोधातून हे समोर आले आहे की, नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवणारे पती-पत्नी इतरांच्या तुलनेत अधिक निरोगी राहतात. याचं मुख्य कारण म्हणजे नियमीत शारीरिक संबंध ठेवल्याने तणाव कमी होतो आणि तणाव कमी झाल्याने व्यक्ती आणखी तरुण दिसायला लागतो. याने उत्साह, उत्तेजना आणि आत्मविश्वासही वाढतो. तेच शारीरिक संबंध न ठेवणारे लोक संकोच, अपराध आणि मानसिक तणावाने वेढले गेलेले असतात.
बेस्ट एक्सरसाइज
तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंध ठेवणे ही परफेक्ट एक्सरसाइज आहे. शारीरिक संबंधामुळे शरीराच्या मांसपेशींमधील ताण आणि हाता-पायांची ताठरता दूर होते. तसेच शरीर आधीच्या तुलनेत अधिक लवचिक होतं. परमोच्च आनंद देणाऱ्या लैंगिक क्रियेतून येणारा थकवा एक्सरसाइज किंवा स्विमिंग वा रनिंगपेक्षा अधिक असतो. काही तज्ज्ञांनुसार, जाडेपणा दूर करण्यासाठीही शारीरिक संबंध फार फायदेशीर आहे.
हाडे होतात मजबूत
एस्ट्रोजनमुळे महिलांमधील हाडांची होणारी झीज कमी होते. याने शरीरातून निघणाऱ्या कॅल्शिअमचं प्रमाण कमी होतं आणि हाडे कमजोर होण्यापासून वाचतात. असे झाल्याने ओस्टियोपोरोसिस आणि कमजोर हाडांची समस्या दूर होते. 
चांगली झोप येते
जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर कोणत्याही झोपेच्या गोळीऐवजी शारीरिक संबंध चांगला पर्याय ठरतो. शारीरिक संबंध पूर्ण झाल्यावर ऑक्सिटोसिन हा हार्मोन रिलीज होतो, हा एकप्रकारचा फिल गुड हार्मोन आहे. हा हार्मोन रिलीज झाल्यावर शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर लगेच चांगली झोप लागते. याने तुमचं आरोग्यहीचांगलं राहतं.
————————————————————————–
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत फेसबुक समूहाला भेट द्या आणि सामील व्हा !
https://www.facebook.com/groups/aapall.manasshastra

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “पती- पत्नी मधील लैंगिक जीवन !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!