Skip to content

आत्महत्येचे विचार येणाऱ्या, अन येऊन गेलेल्या अशा सर्वांना ही कविता अर्पण !

आत्महत्येचे विचार येणाऱ्या, अन येऊन गेलेल्या अशा सर्वांना ही कविता अर्पण !


योगेश तावडे


खूळ लागलं बापाला,
स्वतः कानफटात मारून घेतोय
फोटो कड बघून माझ्या,
स्वतःलाच फार शिव्या देतोय

केस सोडून फिरते आई,
वेडी झाली म्हणते गाव
ती कोण विचारलं की,
माझंच सांगते म्हणे नाव

तस कारण मोठं न्हवत,
माझ्या त्या मरण्याच
मलाच न्हवत भान तेंव्हा,
असं काही करण्याचं

रेल्वे खाली झोपलो,
तुकडे झाले क्षणाला
घरचे म्हणतात गोळा करून,
आणलं तरी कुणाला

पाहून हे सार,
पुन्हा मी मरत आहे
चिमुकली बहीण माझी,
हल्ली फार झुरत आहे

आत्मा नुसता भरकटतोय,
परत येता हि येत नाही
त्या बापाची माफी घ्यायला,
पुन्हा संधी हि देव देत नाही

मी एकदाच मेलो,
पण घरचे रोज मरत आहेत
माझ्या फोटो समोर,
बसून विनवण्या करत आहे

चुकला माझा निर्णय
देवा माफी एकदा देशील का ?
पुन्हा एक शरीर देऊन,
माझ्या घरी मला नेशील का ?

बापाला बिलगून रडावं म्हणतो
आईच्या पायात पडाव म्हणतो
आयुष्याला न घाबरता

देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतो
देवा पुन्हा एकदा घडावं म्हणतो


मानसिक समस्येवर शास्त्रीय उपाय हवाय ???

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!