Skip to content

लादलेली नाती आणि आपली मानसिकता !!

नात्यांची घुसखोरी


मधुश्री देशपांडे गानू


काही नाती अगदी जवळची असतात. जन्मापासून… आपण जपायचा खूप कसोशीने प्रयत्न करतो. अनेकदा अपमान सहन करूनही पडतं घेतो. कारण ते नातं , ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची असते. पण नातं कोणतंही असो , एकानेच धरुन ठेवून नाही चालत.. तर दोन्ही कडून समान भावनिक गुंतवणूक हवीच.

नातं गृहीत धरु नये. शेवटी आपण थकून कायमचं दार बंद करतो..नात्याचा हा असा प्रवास खूप जीवघेणा असतो…..पण..नाईलाज.. ? कसं वागायचं नाही हे शिकवून जातो…

त्या नात्याशिवाय जगताना आपण धडपडतो , तगमग होते जीवाची.. तरीही हळूहळू आपण ते नातं मागे सोडून पुढे चालत रहातो..

अशी वर्षे लोटतात. आपलं आयुष्य आता त्या नात्या शिवाय सरावलेले , स्थिरावलेलं असतं..

अचानक ते नातं आपल्या समोर परत उभं राहतं.. आपल्या आयुष्यात घुसखोरी करू पाहतं.. जणू काही घडलंच नाही असा आव आणतं.. आपण परत धडपडतो. विश्वास तर बसत नाहीच.. आता नकोच असतं हे लादलेलं नातं.. आणि कहर म्हणजे परत खोटेपणा , दांभिकपणा करून ते नातं परत आपली जागा घेऊ पाहतं…

म्हणजे ती व्यक्ती बदललेली नसतेच. अशा वेळी आपण ठामपणे कायमस्वरूपी हे बेगडी नातं नाकारतो.. स्पष्टपणे नाही म्हणतो.

कोणत्याही नात्याची बूज , सन्मान दोन्ही कडून समान राखला गेला पाहिजे… प्रेम , विश्वास हा नात्याचा पाया आहे. गरजेपुरते नातं मानणारे जाणीवपूर्वक लांब ठेवायला हवे. ठामपणे नाही म्हणायला शिकाच.

कशाही पेक्षा आत्मसन्मान महत्वाचा आहे. माणसं ओळखता आली पाहिजे. नातं दोन्ही कडून सांभाळलं गेले तरच बहरते. लादलेलं नातं कसं टिकेल??

अशा स्वार्थी नात्यांना वेळीच पूर्णविराम द्या. तुम्हाला आनंदी असण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि ते सर्वस्वी आपल्या हातात असतं. आनंदी व्हा.. आनंदी रहा..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!