Skip to content

खूप नाती केवळ गैरसमजामुळे उध्वस्त होतात.

“आंबट _गोड”


Sonal Kolhe – Patare


मला जर नात्यांचे वर्णन करायला सांगितले तर दोन च शब्दात मी व्याख्या मांडेल ती म्हणजे..

“आंबट _गोड”

….खरंच असच तर असतं आयुष्य आणि नाती आंबट तरी गोड ही, अगदी आंब्या सारखी …

नाती ही नाजूक धाग्या प्रमाणे असतात मग ते कोणतेही असोत योग्य प्रमाणात पकडला तर तो धागा जोडणारा दुवा बनतो आणि तोच खेचला तर एका झटक्यात तुटतो.

मग कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी गाठ ही पडतेच!!!! तीच गाठ पडू नये यासाठी चे मूलमंत्र मी तुमच्या सोबत share करणार आहे…..

√ व्यक्ती महत्वाची की ego ???

माझ प्रमाणिक मत आहे की खूप नाती ही इगो मुळे तुटतात!! मग ते नात कितीही भक्कम आणि खंबीर असोत ego नावाच्या किडी मध्ये ते पोखरण्याची ताकत असते. तेव्हा नात्या मध्ये असे अनेक प्रसंग येतील …कधी कधी खूप अटीतटीचा प्रसंग येईल … अशा वेळी स्वतः ला फक्त एक प्रश्न विचारा नात महत्वाचं की ego????

जर नात हे उत्तर असेल तर पुढाकार घ्या….! आणि तुटे पर्यंत ताणू नका….स्वतः ची चूक नसताना ही माफी मागून बघा .. माफ करून बघा शेवटी नात महत्वाचं आहे ego nahi!!!

✓व्यक्ती चुकीची नसते प्रसंग चुकीचा असतो!!

खूपदा फक्त गैर समजामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो…आपली जवळची व्यक्ती जिला आपण कधी कधी समजू शकत नाही. कधी कधी आपली व्यक्ती ही आपल्याला समजू शकत नाही…..पण अशा स्थितीत ही राग हा आपल्या व्यक्ती वर न धरता परिस्थितीच याला कारणीभूत आहे हे आपल्याला समजलं पाहिजे…

कारण..

कदाचित वेळे नुसार आपल्या मनातील राग जाईल पण गेलेली व्यक्ती कदाचित परत येणार नाही किंवा आपल्याला परत तीच जागा मनात देऊ शकणार नाही याची जाणीव ठेवा.

✓ सुटलेला बाण जसा परत येत नाही तसाच बोललेला शब्द परत घेता येत नाही…

कधी कधी रागात आपण जवळच्या व्यक्तीला खूप काही बोलून जातो…लक्षात ठेवा .. तुम्ही बोलून विसाराल ही पण तुमचे शब्द समोरच्याला खोल जखम देऊ शकते. .म्हणून रागात आणि विचार केल्या शिवाय बोलणे टाळा…

✓ शेवटी प्रत्येक नात हे महत्वाचं आहे आणि ते जोपासणे ही स्वतः ची जबाबदारी आहे असे समजून प्रत्येक नात जपण्यासाठी आणि अजून घट्ट करण्यासाठी पुढाकार घ्या ….आणि नात्यांमधील आंबट गोड चवीचा आनंद चाखा…..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *