Skip to content

आपल्या अंतर्मनातल्या गोष्टी कश्या काम करतात बघा !!!

आपल्या अंतर्मनातल्या गोष्टी कश्या काम करतात बघा !!!


अनघा विनायक निमगांवकर


अलीकडेच Psychology आणि अध्यात्म याविषयी ची बरीच पुस्तके वाचनात आली. त्यांचा एकमेकांशी संबंध आहे हे तर सर्व श्रुत आहेच पण शरीर शास्त्राशी ही त्याचा संबंध आहेच.

लहानपणापासून बर्याचदा ऐकलं होतं, नेहमी होकारार्थी बोला. नकारार्थी बोलु नका. वास्तुपुरुष ” तथास्तु ” म्हणत असतो.

कोण असतो हा “वास्तुपुरुष”?

वास्तु म्हणजे ती जागा जिथे आपण राहतो आणि वास्तुपुरुष म्हणजे त्या जागेला सांभाळणारा. तिचा अंतरात्मा…

आपण राहतो ती जागा म्हणजेच आपलं शरीर आणि त्यातील वास्तुपुरुष म्हणजेच आपल्या वास्तुला सांभाळणारा, चालवणारा….. आपलं Subconscious Mind .. आपलं अंतर्मन!!!

आपल्या अंतर्मनाला चांगल्या भावना, वाईट भावना असं निराळं करता येत नाही. त्याला ते माहीत नसते. त्याला Commitment समजते. ठरवलेल्या किती गोष्टी आपण करतो एवढच त्याला समजतं. ते Criticize नाही करत, ते Follow करतं. आपण ठरवलेल्या गोष्टींची आपल्याला आठवण करून देतं.

उदाहरणार्थ सकाळी ५ वाजता उठायचं असं जर आपण पक्कं ठरवलं ते आपल्याला ५ वाजता उठवतं. पण जर जाग येऊनही आपण पुन्हा झोपलो तर ती सवय लागण्यात अडथळा येतो.

आपली Commitment नसेल तर आपल्या अंतर्मनाला ही ती सवय जडत नाही. अर्थात कुठलीही सवय ही हळूहळू सवयीची करुन घ्यावी लागते.

८ वाजता उठणारी मंडळी अचानक पणे ५ वाजता उठण्याची.. सातत्याने उठण्याची शक्यता तशी कमीच. त्याऐवजी आधी ७.३० ची सवय, ७, नंतर ६.३० वगैरे पायरया चढल्या तर सवयी अधिकाधिक पक्क्या होत जातील.

तशीच दुसरी सवय.. तक्रार करण्याची. एखाद्या गोष्टी कडे सतत नकारात्मक पद्धतीने बघण्याची. आणि त्याविषयी सतत नकारात्मक बोलण्याची. तशाच पद्धतीने बघण्याची, बोलतो आपण पण विचार करण्याची सवय अंतर्मनाला लागते… नकारात्मक!!!

त्याऐवजी घडलेल्या गोष्टीतून, अपयशातून शिकण्याची सवय आपण आपल्या मनाला लावू शकतो. हळूहळू शिकत शिकत आपल्या सवयी, चुका सुधारून तिथे नवीन गोष्टी पेरू शकतो. नवीन अनुभव घेऊन शकतो.

एखाद्या माणसाची खरी ताकद ही त्याच्या मनात असते. आणि मनाची खरी ताकद ही त्याच्या अंतर्मनात, त्याच्या Subconscious Mind मध्ये असते.

Subconscious Mind अर्थात आपल्या अंतर्मनात अनेक वर्षांपासून चे संस्कार अर्थात Believes असतात. या Believes च्या आधारावर अंतर्मन आपल्या प्रतिक्रिया देत असते.

आपण एखादी गोष्ट का करतो आणि का करत नाही या मागे हे संस्कार ..Believes असतात. त्यात भितीचे, rejection चे आणि इतर अनेक संस्कार असतात. त्यावर आधारित प्रतिक्रिया येतात.

भिती वाटल्यावर ही दोन प्रतिक्रिया येतात. .. Fight OR Flight. हे ही त्या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते. आणि हा स्वभाव पुन्हा अंतर्मनात दडलेल्या अनुभवांवर, क्रिया. प्रतिक्रियांवर आणि Believes वर अवलंबून असतो. सगळा खेळ अंतर्मनात दडलेल्या Believes चा आहे.

पण GOOD NEWS ही आहे की हे Believes, हे संस्कार आपण बदलु शकतो. Negativity ला Positivity कडे नेऊ शकतो. आपला बघण्याचा द्रुष्टीकोण बदलु शकतो. बाह्यमन.. बहिर्मन म्हणजे आपल्या मनाचा १/८ भाग. तर अंतर्मन म्हणजे त्याच मनाचा ७/८ भाग.

थोडक्यात Back office ला ७ जण काम करत आहेत. मुख्य माल बनवत आहेत. आणि तो माल घेऊन बाहेर Show room मध्ये १ जण कार्यरत आहे. आत बनवलेला माल बाहेर विकत आहे. आपलं सगळं लक्ष त्या show room मध्यल्या एका जणावर असतं.

आपला सगळा Focus हा बाह्य मनाचे गुण, त्याच्या Abilieties वाढवण्यावर, त्याच्या Capabilities enhance करण्यावर असतो. जेव्हा की मनाच्या कारखान्याचे बाकीचे ७ कामगार मागे back office ला असतात. कारखान्याची Productivity वाढवायची असेल तर सगळ्या कामगारांच्या Abilieties , capabilities वर काम करावे लागेल न की एकाच्या. परंतु आपल्याला ही सवय लागलेली आहे की आपण फक्त बाह्यमनावर लक्ष केंद्रित करतो. कच्चा माल तर आतमध्ये असतो.

त्याच्यावर Processing करणं, त्याचे दोष काढून टाकून त्याला चांगलं संस्कारीत करणं गरजेचं असतं.

आधी सांगितल्याप्रमाणे अंतर्मनाची ताकद त्याच्या Believes मध्ये असते. आणि हे Believes किंवा संस्कार हे आपल्या कर्माचे फलीत असते.. अर्थात आपल्या Commitments चे फलीत.

आपण आपल्या comittents किती पाळतो याचा या संस्कारांवर खूप पगडा असतो.

” ठरवा आणि करा ” . या ब्रीदावर हे संस्कार खुपसे अवलंबून असतात. उदाहरणार्थ.. उद्या पासून मी ६ वाजता उठेन. ही commitment आपण स्वतः ला दिली तर ती पाळणे आवश्यक असते. अंतर्मन या commitment कडे आणि ती पाळली जाण्याकडे लक्ष ठेवून असते. Commitment पाळली गेली की स्वतःवर चा विश्वास वाढणार हे नक्की.

अंतर्मनात आधी पासुनच अनेक शंका कुशंका असतात. त्याला Neutralize करून नवीन Believes त्या जागी पेरणी करणं हे आपल्या हातात असतं. ठरवलेलं पार पाडले की विश्वास वाढत जातो. आपल्याच शंका कुशंकांना Challenge करत जातो…

बाह्य मनाला चांगलं वाईट कळतं. त्या गोष्टी ते ठरवु शकते आणि त्या प्रमाणे अंतर्मनाला शिकवते, निरोप पाठवते. अंतर्मन त्या प्रमाणे वागते.. तथास्तु म्हणते. तसेच घडवते. अंतर्मन शिकवल्या प्रमाणे वागते, ते आज्ञाधारक असते.

आपल्या शरीराच्या वास्तुच्या कोंदणात हा अंतर्मनाचा पुरुष ठामपणे बसलेला असतो. आपल्या साठी वाटेल ते करतो, करण्यास तयार असतो.

तो शक्तिशाली असतो पण निरागस असतो, आज्ञाधारक असतो. आपली आज्ञा त्याला शिरसावंद्य असते. आपल्या प्रत्येक म्हणण्याला तो त्याची आज्ञा समजतो…. ” तथास्तु ” म्हणतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!