Skip to content

मुलांच्या करिअर मार्गदर्शनासाठी महत्वाचे मुद्दे!

मुलांच्या करिअर मार्गदर्शनासाठी महत्वाचे मुद्दे!


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


७ वी ते १२ वीच्या च मुलांचं करीअर काऊंन्सिलिंग करण्याचा हा महत्वाचा आणि योग्य असा काळ असतो. तसेच करीअर याचा जर खराखुरा अर्थ आपण पाहीला, तर त्यासाठी अगोदर कोणतेतरी किमान एक आवडीचं क्षेत्र निवडावं लागतं आणि ते क्षेत्र निवडल्यापासून, शिक्षण घेतल्यापासून, त्यात नोकरी किंवा व्यवसाय करण्यापासून ज्या चढ-उताराला सुरुवात होते, त्याला शास्त्रीय भाषेत करीअर असं म्हणतात.

जसं सचिन तेंडुलकर यांचं क्षेत्र खेळ किंवा क्रिकेट, लता मंगेशकर यांचं क्षेत्र संगीत किंवा गायन, तसेच अमिताभ बच्चन यांचं क्षेत्र अभिनेता किंवा ऍक्टर, या तिनही असामान्य व्यक्तींनी केलेली अतुलनिय कामगिरी, पाहीलेले चढउतार म्हणजेच करीअर आणि ते त्या चढ-उत्तरात टिकले कारण त्यांनी निवडलेलं क्षेत्र हे त्यांच्या आवडीचं, जिव्हाळ्याचं, जिद्दीचं आणि चिकाटीचं होतं.

अशाच प्रकारे आपल्या मुलांमधील कला-कौशल्य ओळखून त्यांना ते क्षेत्र निवडण्यास प्रोत्साहीत केल्यास त्यांच्याकडूनही अशी असामान्य कामगिरी होऊ शकत नाही का ? तर याचे उत्तर नक्कीच होय असेच असेल.

नाहीतरी चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे शिक्षणाचा दुस्वास निर्माण होऊन केवळ उदरनिर्वाहासाठी नोकरी करणाऱ्या तरुणांचा टक्का काही कमी नाही.

आपण पुष्कळदा क्षेत्र आणि करीअर यामध्येच गल्लत करतो. मनापासून, मनासारखं करीअर करण्यासाठी बुद्धीमत्ता व उपजत गुणांनुसार क्षेत्र निवडणं किती महत्वाचं आहे, याची कल्पना आता आपल्याला आली असेलच !

पुष्कळ पालकांना यामधलं गांभीर्य लक्षात आलेलं असतं, परंतु त्याचा नेमका अर्थ मात्र कळालेला नसतो.

म्हणून आई म्हणते, “डॉक्टर हो”, बाबा म्हणतात, “इंजिनिअर हो”, यामध्येच मुलांचा गोंधळ होतो.

खरं तर अशावेळी मुलांचा कल समजून घेणं महत्वाचं असतं, शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांना समजून घेणं महत्वाचं असतं.

म्हणून मुलांनी योग्य क्षेत्र निवडून त्यात उत्तम करीअर करावे, यासाठी त्यांचं योग्य करीअर काऊंन्सिलिंग होणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे.

■ मुख्य चाचण्या ■

१. बुद्धिमत्ता चाचणी :-

यालाच इंग्रजीत IQ टेस्ट असे म्हणतात. वयाच्या १८ ते २० वर्षापर्यंत आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होत असतो. ज्याप्रकारे शारीरिक उंची किंवा वाढ ही या वयापर्यंतच विकसित होत असतात, अगदी त्याचप्रमाणे बौद्धिक वाढ सुद्धा इथपर्यंतच विकसित होते. त्यानंतर आपल्या मानसिक क्षमता वाढतात, ते ही अवलंबून असतं की १८ – २० वर्षापर्यंत आपला बौद्धिक विकास हा किती प्रमाणात झाला आहे. जर बौद्धिक विकास चांगला झाला असेल तर पुढे मानसिक क्षमता झपाट्याने वाढतात, उलट बौद्धिक विकास हा अत्यल्प प्रमाणात झाला असेल तर मानसिक क्षमता विकसित होण्यास तितकाच वेळ लागतो. म्हणून या चाचणीत आपल्या मुलांची बुद्धिमत्ता ही त्यांच्या वयाच्या सर्वसामान्य मुलांपेक्षा जास्त आहे, सर्वसामान्य आहे की त्यापेक्षा कमी आहे, हे आपल्याला समजतं. जेणेकरून एकदा का त्यांची बुद्धिमत्ता समजली की कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी अनुरूप आहे, याबद्दल स्पष्टता मिळण्यास मदत होते.

२. कलमापन चाचणी :-

या चाचणीत आपल्या मुलांचा कल हा Medical, Engineering, Commerce, Arts, Fine Arts आणि इतर यांपैकी नेमकं कोणत्या दिशेला सर्वाधिक आहे, जेणेकरून आलेली बुद्धिमत्तेची नेमकी ऊर्जा त्याठिकाणी वळवता येते.

३. क्षमतामापन चाचणी :-

यालाच इंग्रजीत Aptitude टेस्ट असे म्हणतात. आलेला कल लक्षात घेऊन त्या क्षेत्राशी संबंधित क्षमता मुलांमध्ये आहेत का, याचे मापन ही चाचणी करते. तसेच पालकांकडून मुलांच्या ठिकाणी आलेले उपजत गुण हे कोणत्या क्षेत्राला जास्त कनेक्ट होतात, हे समजते.

४. व्यक्तिमत्व मापन चाचणी :-

वाढत्या वयानुसार जसे सकारात्मक क्षमता मुलांमध्ये वाढत असतात, त्याचप्रमाणे काही नकारात्मक क्षमताही वाढत असतात. जसे चिडचिड करणे, मोबाईलवर टाईमपास करणे, अतिचंचलता ई नकारार्थी व्यक्तिमत्व घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, करीअर आणि व्यक्तीगत आयुष्यात अडथळे निर्माण करतात. या चाचणीत आपल्या मुलांमध्ये असा कोणता घटक वाढत्या वयानुसार वाढतोय, हे समजून त्यावर उपाय म्हणून उपचार तंत्रे मुलांना आणि पालकांना शिकविले जातात.

५. अभ्यास सवय शोधिका :-

ही चाचणी मुलांच्या ठिकाणी असणाऱ्या चुकीच्या अभ्यास सवयीचे मापन करते किंवा आणखीन अभ्यास सवयींमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी ही चाचणी फार फायदेशीर ठरते.

मुलांच्या योग्य करीअर काऊंन्सिलिंगसाठी वरीलप्रमाणे ५ मुख्य चाचण्यांचा समावेश असणे अनिवार्य आहे, त्याशिवाय करीअर काऊंन्सिलिंगची शास्त्रीय प्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाही.

म्हणून आपण जर आपल्या मुलांचे करीअर काऊंन्सिलिंग करण्याच्या विचारात असाल तर वरील पाचही चाचण्यांची शहानिशा करूनच निर्णय घेणे केव्हाही उत्तम !


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!