Skip to content

किती पुरुष आपल्या बायकोला thank you म्हणतात?

किती पुरुष आपल्या बायकोला thank you म्हणतात?


अनिल वाघमारे


खरं सांगा.

तुम्ही कामावर जात असाल.
तुम्हाला आयता डबा हातात मिळत असेल!

तुमच्या मुलाबाळांना आपोआप शिस्त कशी लागत असेल?
तुमचं कदाचित लक्ष जास्त नसेल कामामुळे, पण ती मात्र लक्ष देत असेल..

तुमच्या घरात कचरा दिसत नसेल..
गोष्टी जिथल्या तिथे मिळत असतील!

रात्री आल्यावर तुमच्यासाठी स्वैपाक सुरू असेल!
चहाच्या वेळेला चहा, नाश्त्याच्या वेळेस हातात आयत्या बशी येत असतिल!

तुमचा संपर्क कदाचित असेलही कमी, पण नातेवाईकात संबंध ठेवण्यात तिची जबाबदारी किती असेल?

घरी गॅस संपला तर काय करायचं, सामान संपलं तर काय करायचं,
औषधं कुठे ठेवलीत, कागदपत्रं कुठे आहेत, तिलाच माहीत असेल!
वेळोवेळी ती देतही असेल!

घराकडे बघणं म्हणजे फक्त पैसे देणं असतं का हो?
पैसे हे जेव्हा लक्ष्मीच्या हातात पडतात तेव्हा त्याचीही लक्ष्मी होते!

अशा या घरच्या लक्ष्मीला तुम्ही गृहीत धरून चालता, की कधी तरी तिलाही Appreciation देता?

द्या!
वेळ निघून जायच्या आत तिलाही श्रेय देत जा.
Thank you म्हणत जा..

तुम्ही फक्त thank you म्हणा, ती आयुष्यभर तुम्हाला ‘welcome’ करेल!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


छंद जोपासण्यासाठी

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!