
मुलांना बहरू द्या……
संगीता वाईकर
नागपूर
जन्माला येणारा प्रत्येक नवा जीव म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. मुळात संपूर्ण निसर्गच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
एका सारखे दुसरे काहीच नाही.प्रत्येक झाड,प्राणी, पशू, पक्षी, फुलं, पानं सगळं अगदी वेगळं असतं.
असं असताना पालक म्हणून विचार करताना आपलं मुल याच्या सारखं असावं, त्याच्या सारखं असावं असा विचार का केला जातो.
प्रत्येक मूल त्याचा स्वभाव,त्याची कार्यक्षमता,त्याची आवड ही भिन्न भिन्न असणारच.त्याप्रमाणे तो वागणार,यशस्वी होणार आणि आपल्या क्षेत्रात नाव पैसा कमावणार !
पण आज मात्र प्रत्येक पालक मुलांनी शंभर टक्के गुण मिळवावे ,सगळ्याच क्षेत्रात अव्वल असावं,प्रत्येक कला त्याने आत्मसात करावी ,हा अट्टाहास का आणि कशासाठी ?
प्रत्येक मूल ,त्याची कार्यक्षमता ,आजूबाजूची परिस्थिती,मार्गदर्शन हे जर वेगवेगळे असेल तर ते मुल वेगळेच होणार !
आपण सर्व मुलांना एकाच तराजूत तोलू शकत नाही.मुलांना मुक्तपणे बहरू द्या.त्यांचे पंख छाटू नका.त्यांच्या मनातील प्रश्न सोडवा,त्यांचा संभ्रम दूर करा.
आपल्याला प्रत्येक मूल हे खुरड्यातील पक्षाप्रमाणे डांबून ठेवायचे नाही तर त्यांना ज्यात रस असेल त्यात मुक्त संचार करू द्यायचा आहे.
आज प्रत्येक पालक आपल्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
याचे कारण म्हणजे भरपूर पैसा मिळवून संपन्न जीवन जगता येईल.पण त्यामुळे या मुलांचे बालपणच हरवले आहे.
मुलांचे व्यक्तिमत्व खुरटे झाले आहे.
सकाळ पासून रात्री पर्यंत अनेक विषयांच्या शिकवण्या,अभ्यास आणि सतत परीक्षा याच चक्रात अनेक वर्षे निघून जातात.
अगदी बालवाडी पासून ते पदवीधर होईपर्यंत हेच सुरू असते.
पालक हे सर्व करण्याकरता पैसा लागतो म्हणून पैशांमागे तर मुले त्यांच्या हट्टा खातर अभ्यासात पार गाडले जातात.
मुळात मुलांना त्या विषयात आवड आहे का याचा विचार न करता आणि आपल्याला जे करता आले नाही ते मुलांनी करावे म्हणून आग्रह करतात.
मुलांना आपले विचार व्यक्त न करता आल्याने ती अस्वस्थ होतात,निराश होतात आणि त्यातून निर्माण होणारे विचार त्यांना खुरटे बनवतात.
हसत खेळत शिक्षण,मनोरंजन,निसर्गाच्या सान्निध्यात मुले बरच काही अवगत करतात.पण आज मात्र मोबाईल ,संगणक याच्या संपर्कात राहून ही मुले मेंदूचा वापर करेनासे झाले आहे.
शाळेतील प्रचंड स्पर्धा,नंतर महाविद्यालयीन परीक्षा,यात त्यांचे जगणेच हरवून जाते.
जगणं कसं मन मोकळं असावं.त्यातून आनंद मिळतो आणि खूप काही सहज शिकता येतं.
संघर्ष हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.त्यातून अनेक प्रश्नांची उकल होत जाते.
लहानपणापासून मुलांना लहान मोठे निर्णय घेऊ द्यावेत. चुकलं तर चूक दुरुस्त करता येते पण त्यातून मिळणारा अनुभव खूप अनमोल असतो .
यश आणि अपयश याची जाणीव तसेच यशाचा आनंद आणि अपयशाचा सामना करता यायला हवा.
यश अपयश या दोन्ही परिस्थितीत मुलांच्या सोबत असणे आवश्यक आहे.
आत्मविश्वास ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.लहान मुलांनी केलेले एखादे काम आणि त्याचे कौतुक त्यालाही समजते आणि त्यातूनच ते खूप काही शिकत असते.हा आनंद पैशात मोजता येत नाही.
जी मुले सर्व सुख सोयी उपलब्ध असताना घडत असतात त्यापेक्षा जेव्हा काही मिळत नाही त्यातून घडणारी मुले अधिक प्रगल्भ असतात आणि चांगल्या प्रकारे यशस्वी देखील होतात.
सर्व काही उपलब्ध असताना मिळवलेल्या आनंदा पेक्षा शून्यातून मिळवलेला यश खूप मोलाचे असते.
आज शाळेचा खर्च,भरमसाठ शुल्क,महागडे गणवेश,मोबाईल ,दुचाकी वाहने हे सर्व मुलांना देताना पालकांनी त्याची खरोखरचं गरज आहे का याचा विचार करायला हवा.
आज पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊनही नोकरी ,व्यवसायात पाहिजे तसे यश मिळत नाही.मग ही निराश मुले आत्मघातकी निर्णय घेतात.या मानसिकतेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
मुलांना एक एक पायरी पुढे जाता यायला हवे .इथे लिफ्ट काही कामाची नाही याची जाणीव झाली पाहिजे .
आज पद मोठे पाहिजे पण काम काही नको अशी मानसिकता झाली आहे .पण आज जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांनी सुरुवात करताना आणि आताच्या टप्प्यावर येईपर्यंत किती अथक प्रयत्न केले याची जाणीव असणे आवश्यक आहे.
मुलांचा स्वभिमान ही जपायला हवा.कोणतेही कार्य लहान नाही आणि प्रत्येक क्षेत्र तेवढेच महत्त्वाचे आहे.त्यात उत्तम काम करायचे तर त्यांच्या पंखात बळ निर्माण करणे पालकांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे.
संस्कार करताना अगदी लहान लहान गोष्टी शिकवणे गरजेचे आहे.त्यासाठी पालकांनी देखील काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
एकमेकांशी संवाद,सुसंगत वागणूक,मदत करणे,निसर्गाला जपणे,बचत करणे,लहान लहान गोष्टीत आनंद शोधणे,हे सर्व अत्यंत आवश्यक आहे.
पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यापेक्षा “कमवा आणि शिका “हे देखील मुलांना अवगत करून द्यायला हवे.
छंद जोपासणे ही माहिती आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
मुलांनी गरुड भरारी घ्यायची तर त्यासाठी परिश्रम,विश्वास ,चिकाटी या त्रिसूत्री ची नितांत गरज आहे.
पालक म्हणून मुलांना मार्गदर्शन करताना विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??

