Skip to content

‘Stress’ घालवायचा म्हणजे नेमकं काय करायचं?

STRESS BUSTER म्हणजे काय … STRESS घालवायचा म्हणजे काय करायचं …


Adv. Shahin Shinde
Pre Marriage / Post Marriage Counselling
Mediator in Family Court Pune
shahins.shinde@gmail.com


MENTAL HYGIENE ह्या विषयाशी निगडित ‘MIND@PEACE’ ह्या सदरा खाली आजचा (सहावा) लेख. धन्यवाद.

STRESS कधी येतो आपल्याला…? सध्याच्या धका धकीच्या जीवनात असे कितीतरी प्रसंग येतात जेंव्हा आपल्याला STRESS येतो म्हणजे ताण येतो.

ताण किंवा STRESS कुठला हि असू शकतो शारीरिक, मानसिक, किंवा भावनिक…

साधी उदाहरण द्यायची झाली तर …

सकाळी उठायला उशीर झाला तर आता मुलांचा शाळेचा डबा वेळेत होईल का..? शाळेची van आली तर…काका हॉर्न वाजवतील…मुलांना उशीर होईल मग ते बड बड करतील..मग आपण घाई घाई ने काम करू लागतो, त्या गडबडीत काही तरी सांडते, पडते …इथे येतो पहिला ताण, जो शारीरिक आणि मानसिक दोन्ही असतो. नंतर कामावर जाण्यासाठी उशीर झाला तर …पुन्हा स्ट्रेस कि आता आधीच उशीर झालाय त्यात ट्रॅफिक जॅम…ओह असं वाटतं, उडत जावे.

अजून अशे कित्त्येक उदाहरण आहेत जिथे आपल्याला मानसिक, भावनिक आणि शारीरिक ताण किंवा स्ट्रेस येतो. अचानक घरी पाहुणे येणार असे कळले कि हा विचार येतो कि त्यांना खायला काय करायचे, घरी काय Available आहे, दुकानातून काही आणावे का…blah blah blah… कि आलाच लगेच ताण. कुठले ऑफिस चे काम पूर्ण करायला रात्री उशिरा पर्यंत जागे राहावे लागले तरी स्ट्रेस येतो. किंवा एखाद्या बाई चा नवरा खूप रागिट असेल, तरी तो कामावरून यायची वेळ झाली तरी त्या बाई ला स्ट्रेस येतो ह्या विचाराने कि काही झाले तरी त्यांचा मूड सांभाळायचा आणि हे करत असतांना तिची खूप घाल मेल होते आणि मग तिला येतो भावनिक आणि मानसिक ताण. स्ट्रेस फक्त प्रौढांनाच नाही तर मुलांना पण येतो. पण मुलं लगेच स्वतः चे मन खेळात किंवा कशात तरी रमवतात आणि पटकन त्यातून बाहेर येतात पण मोठ्यांच्या बाबतीत हे इतक्या सहज पणे घडत नाही.
खूप झालं Stress….Stress….Stress…..

आता बोलूयात कि हे Stress घालवायचे कसे म्हणजे ह्या स्ट्रेस च्या फुग्याला बस्ट कसा करायचा !

So let us see or know some of the Stress Busters !

Stress Buster म्हणून खूप गोष्टी करता येतात…

सकाळ ची सुरवात करतांना, अंघोळी ला जातांना आपले Android Phone घेऊन जा…..मस्त Gaana Aap वर आपले आवडते एखादे रोमँटिक गाणे लावा …”अब के सावन में जी डरे…रिम झिम तन पे पानी गिरे…. मन में लगे आग सी …हो हो हो ..” आणि शॉवर च्या खाली उभे रहा…. बघाच काय मूड चांगला होतो आणि एकदम नवीन जोमाने तुम्ही कामाला लागाल. सुरवातच भन्नाट झाली तर मग दिवस छान जाणारच !

घरी असाल तर दिवस भर रेडिओ ऐका किंवा आपली आवडती Save केलेली गाणी ऐका..

सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जा… योगा करा, मेडिटेशन करा, प्राणायाम करा …ह्यांच्या मुळे पण आपल्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपण प्रसन्न चित्त राहातो.

कुठल्या हि Joke वर मनसोक्त हसा जोरात हसा …हसतांना कंजुषी करू नका.

कुठले तरी आवडीचे Class Join करा Gym, Swimming, Singing, Dancing जे आवडेल ते…ह्या सगळ्या मुळे माणसाचा Stress Level खूप कमी होतो आणि त्याला आनंदी, स्फूर्तिदायी राहायला मदत होते.

अजून काही Stress Buster म्हणजे Painting, ceramics, Scrap booking, photography , काहीही जे आवडते ते करा. बाग काम करा. कुंड्यांची मातीत हात घाला, लहान मुलां सारखे चिखलात खेळा, पावसात भिजा….कुठे तरी Long Drive वर जा…

एखादे Facial किंवा Massage घेऊन या …एखादी छोटीशी झोप काढा ….आणि सगळ्यात गम्मत म्हणजे आपल्या जोडीदार बरोबर थोडे रोमँटिक क्षण घालवा …Romance, Hug, Kiss… all these are Stress Busters !

अजून एक खूप Effective Stress Buster म्हणजे एखादे पाळीव प्राणी पाळणे, विशेष करून कुत्रा आणि त्याच्या सोबत छान वेळ घालवणे, खेळणे, त्याला कुरवाळणे …

And Last but not the Least….सगळ्यात उत्तम Stress Buster म्हणजे, आपले जवळचे मित्र किंवा मैत्रिणी … So if you are stressed…just pick up the phone, dial to your nearest friend and talk…talk…talk….

“ऐ खुदा आईना साफ किया तो ‘मैं’ नजर आया ‘मैं’ को साफ किया तो ‘तू’ नजर आया”



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!