Skip to content

रोग घेतोय औषधाचाच बळी……..

रोग घेतोय औषधाचाच बळी……..


आरती बनसोडे
(शैक्षणिक प्रशिक्षक आणि समुपदेशक, मुंबई.)


एक काळ असा होता जेव्हा लोकांकडे भरपूर वेळ होता, लोक खुप समाधानी आयुष्य जगत होते. त्यामुळे लोकांचे एकमेकांकडे भरपूर येणे जाणे होते. लग्न सणावाराची महिन्या अगोदर एकत्रितपणे मिळून जय्यत तयारी चालायची. दिवस कसे भराभर आणि आनंदात जायचे. पण हल्ली सगळं चित्रच पालटलय. लोकांना आपापसात बोलायला वेळ नाही नातेवाईक तर लांबच राहीलेत. त्यामुळे ताण – तणाव रूपी राक्षस महाभयंकर रूप धारण करत आहे .आताच मागच्या महिन्यात हिमांशू राॅय सारख्या तडफदार आणि हुशार IPS अधिकार्याने आत्महत्या केली होती तर त्याच मानसिक तणावाने आज त्याने त्याला आजपर्यंत मारक असलेल्या आध्यात्माचाही बळी घेतला आहे . लोक निराशा पदरी पडली की अध्यात्माचा आधार घेतात पण भय्यू महाराज हे एक अध्यात्मिक गुरू असून देखील त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ का यावी ?

आत्महत्या करणारे अनेक विद्यार्थी , पिडीत लोक, अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाणारे भय्यू महाराज, I.P.S. अधिकारी हिमांशू रॉय, अमृत कंपनीचे संचालक जोशी, I.A.S. अधिकारी दांपत्याचा मुलगा , अनेक सिने अभिनेते , उद्योजक या मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्यांमुळे माणूस समाजात पदाने अधिकाराने कितीहि मोठा असला तरी मानसिक रित्या किती एकटा पडत चाललाय आणि स्वतःला संपवण्यापर्यंत कृती करु लागलाय हे भीषण वास्तव उघडे होतेय.

आज आपण व्यवसाय, नौकरी, शिक्षण, मुलांचे संगोपन, वाढती महागाई, सर्वच क्षेत्रात स्पर्धा आणि चढाओढ यांना सामोरे जात आहोत . त्यात टिकाव धरण्यासाठी जिवाची पराकाष्टा करत आहोत पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. त्याला आपले शरीर आणि मन अपवाद नाहीत. हे दोन्ही मर्यादेच्या वर ताण सहन करू शकत नाहीत.
जसजसे दिवस जात आहेत, तसतसा समाजाच्या व्यक्तींकडूनच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. अधिकाधिक माणसं स्पर्धात्मक जीवनाला सामोरी जात आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशासाठी, जास्त मार्क मिळविण्यासाठी जीवाची पराकाष्टा करावी लागत आहे. पालकांना कुटूंबाच्या वाढत्या गरजा पुरविण्यासाठी जास्त पैसे मिळविणे अपरिहार्य ठरत आहे व त्यामुळे वेळ कमी पडतो आहे आणि नाती दुरावली जात आहेत . साहजिकच जीवनात आनंदी होण्यासाठी फार मोठी झुंज द्यावी लागत आहे.

जी व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असते ती, घरी, कामावर, शाळेत, कॉलेजमध्ये कोणत्या ना कोणत्या समस्येला तोंड देत असते, ती व्यक्ती स्वत:ची समस्या, स्वत:चे प्रश्न समजू शकते व आपल्या कुवतीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्‍नही करते. पण दुर्दैवानं त्या प्रयत्‍नात ती यशस्वी होत नाही. मग ती समस्या, त्या व्यक्तीला निराश बनवते, मग पुन्हा ती व्यक्ती स्वत:ची समस्या दुसऱ्या मार्गानं सोडविण्याचा प्रयत्‍न करते. पुन्हा त्यात अयशस्वी होते. मग ती व्यक्ती हताश, निराश बनते. जसजसा काळ जातो तसतशी ती व्यक्ती असह्य मानसिक तणावात सतत रहाते. हा तणाव कोंडमारा यातून आपली सुटका करून घेण्यास पुर्णपणे असमर्थ बनते.

हा मानसिक गुंता वाढत जाऊन मन सैरभैर होते व पुन्हा आत्महत्या करण्याच्या विचारा मनात येत राहतो. ताण असह्य होतो तेव्हा तणाव आपोआप निर्माण होतो आणि ताण तणाव एकत्र आले की नैराश्य येते ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो. जेव्हा माणूस नैराश्येत जातो तेव्हा त्याची समज कमी होऊन त्याचा विवेक नाहीसा होतो आणि, विवेक गेला की अशा अवस्थेत माणूस खूप घातकी होतो, मग तो काय करतोआहे हे त्याचे त्यालाच समजत नाही. मग तो एकतर दुसऱ्याला मारतो किंवा मग स्वतःला संपवतो. जर यापैकी नाही झाले तर त्याला व्यसन जडते किंवा तो मानसिक रोगी बनतो.

मानसिक आजार झाला कि मग शारीरिक आजार जसे शुगर , बी.पी. आपोआपच होतात. त्यामुळं मानसिक व शारीरीक खच्चीकरण व्हायला लागते व आयुष्य संपवणं हा एकच पर्याय तिच्यासमोर उरतो. त्यामुळे आत्महत्या करून जीवनातून सुटका करून घ्यावी, की दु:खी जीवन कंठावे याबद्दल द्विधा मनस्थिती होते.

आज समाजात असे मानसिक रोगी आणि व्यसनी यांचे प्रमाण ९०% आहे . याचा अर्थ ९०% माणसे रोज थोडी थोडी मरत आहेत किंवा जगायचे तरी विसरलेली आहेत. जेव्हा निराश, हतबल व्यक्तीला त्याच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताही मार्ग पुढे दिसत नाही तेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात .

पूर्वी लोक खाऊन पिऊन सुखी होती. पण हल्ली पद , पैसा, प्रतिष्ठा, मान-सन्मान, आणि प्रसिद्धी ह्या गोष्टी अन्न ,पाणी आणि हवा या मुलभूत गरजांपेक्षा जास्त महत्वाच्या झालेल्या आहेत . आज ह्याच गोष्टी ताण तणावाचे प्रमुख कारण बनल्या आहेत .

माणूस ताणतणावात असला की अध्यात्माला शरण जातो. आध्यात्म(spirituality) सर्वांना समतेच्या पातळीवर आणत असते. शुध्द आध्यात्म सर्वांना आकर्षित करणारे असते आणिअसा शुध्द आध्यात्मिक माणूस चारचौघात उठून दिसतो ,समाज त्याला वेगळी वागणूक देतो आणि त्याच्या गळ्यात हे प्रतिष्ठेचे आणि प्रसिद्धीचे फास आडकतात . भय्यू महाराज त्याचेच एक उदाहरण आहेत.

प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी जेवढी मोठी तेवढे हे फास जास्त बळकट असतात आणि यात अडकलेला कोणीही , कितीही मोठा असलेला सुटू शकत नाही , हेच आज सिध्द होताना दिसत आहे. अध्यात्म हे मानसिक रोगावर इलाज असताना आज आध्यात्मिक माणसाची आत्महत्या ही फार मोठी सामाजिक हानी आहे .

रोज ताण तणावाने मरणारांची संख्या जगात कमी नाही . पण ज्या औषधाने रोग बरा होतोय असा समाजाचा विश्वास असतो , त्या औषधालाच रोगाने संपवले तर समाजाचा औषधावरचा विश्वास उडतो आणि हा फार मोठा सामाजिक आणि मानसिक धक्का असतो, जो सहजासहजी भरून निघत नाही .

आज प्रत्येक व्यक्ती एकाच गोष्टीमागे धावतोय आणि ती म्हणजे पैसा. ह्या पैसे कमावण्याच्या नादात माणसाने जगण्याचा दृष्टीकोन बदलून टाकलाय. आपल्या अवतीभवती असलेल्या अनेकांना आपण पैसे कमावण्याच्या शर्यतीत धावताना पाहतो. काही वर्षांपूर्वी एक वाक्य फेमस झालं होतं, “पैसा खुदा तो नहीं है.. पर खुदाकी कसम, खुदासे कम भी नही है.” हे बरोबर आहे की प्रत्येक ठिकाणी पैशाची गरज लागतेय.शिक्षण, आरोग्य, मुलभुत गरजा , यासाठी पैसा नक्कीच हवा.. पण तो कमावण्यासाठी आपण कुटुंबियांना , मुलांना वेळ देऊ शकत नाही ,तब्येतीची हेळसांड करतो आणि ताणतणाव वाढवून मानसिक आजाराला बळी पडतो.

असा समज आहे की सामान्य लोकांनी जर असामान्य काम केलं की तो ग्रेट अचिव्हर . पण प्राॅब्लेम असा आहे कि सामान्य माणुस स्वतःला असामान्य दाखवायचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठीचा आटापिटा करण्यात नैराश्यैला बळी पडतीय. आणि शेवट होतोय त्याच्या आत्महत्येने. आपली योग्यता सिद्ध करण्यामागे आणि मी पणाच्या अहंकारात एकटे पडत चाललोय ह्याचे भान हरपलोय.

भरातभर घातली आहे आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मिडीया यांनी. आपली तरूण पिढी पूर्णपणे मोबाईल आणि इंटरनेटला आहारी जात आहे. मैदानी खेळ, मित्रांशी गप्पा गोष्टी संपुष्टात येत आहेत. एखादी गोष्ट सोशल मिडीया वर अपलोड केली व त्याला जर योग्य प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया मिळाल्या नाही तर आपण कोणाला आवडत नाही या भावनेने ही तरूण मंडळी नैराश्येला बळी पडून आत्महत्या करतात. काही विद्यार्थी इतरांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखून आपण पूढे टिकाव धरणार नाही या भावनेने आधीच आत्महत्या करतात. या सगळ्याला देखील कारणीभूत आहे आईवडीलआणि मुलांमध्ये वेळेअभावी निर्माण झालेला दुरावा आणि संवाद.

आत्महत्या हा तातडीने घेतलेला निर्णय नसून तो अनेक कारणांमुळे आणि अनेक दिवसांपासून मनात घर करून असतो. खरंतर अशा व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात भरपूर फरक होतो पण तो आपण लक्षात घेतोच असे नाही. एखादी व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचं कसं ऒळखावं ?आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या व्यक्तीच्या वागणुकीतून इतरांना काय इशारे मिळतात ? प्रवृत्त करणारी कारणे, नैराश्येने ग्रासून आत्महत्येचा विचार करणारी माणसे आणि त्यांच्या आचरणात कोणकोणते बदल होताना जाणवतात ह्या विषयी बोलायला गेलो तर बरंच काही लिहण्यासारखं आहे. अशा व्यक्तीच्या निकटवर्तियांनी हे सगळं ध्यानांत ठेवावयास हवं व त्या व्यक्तीला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करावयास हवं.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!