
जगायला शिकले पाहिजे ,,,,,,
राहुल शेंडगे
श्रीपुर
जगप्रसिद्ध क्रिकेट पट्टू , फिटनेस बॉय ,, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली ला वीच्यारले की
तुला अवघड काय वाटते फिटनेस संभाळणे की डाएट वर लक्ष देणे की मानसिकता संभाळणे ,, तर विराट कोहली
बोलला की नक्कीच याच उत्तर मला मानसिकता संभाळणे वाटते , मानसिकता ठीक असेल तरच तुम्ही
फिटनेस करू शकता डाएट करू शकता ,,
म्हणजे इथे एक गोष्ट समोर येथे की सगळ्या गोष्टी
मानसिकतेवर आहेत ,,,,
आपण पॉझिटिव ज्यास्त जगत नाही ,, आपण एक शिल्लक गोष्टीवरून लगेच डिप्रेशन मध्ये जातो नर्वस होतो , काळजी , चिंता , भीती ,, या गोष्टी आपण ज्यास्त स्वीकारतो ,, या तीन गोष्टी असल्या ही पाहिजेत आणि नको म्हंटल तरी ते येतातच पण आपण एवढी सवय लावून घेतो की हे आपले चांगले मित्र होऊन बसतात
ते आपल्याला सोडायला तयार होत नाहीत आणि आपण त्यांना सोडत नाही , ,,
एक सोपी आणि साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की कोरोना सारखा भयंकर वायरस सर्व जगात आहे, याच्यावर लस अजून उपलब्ध नाही हे ही खर आहे आणि याच्यावर संशोधन चालू आहे हे ही खरं आहे
आणि खर सांगायचं झालं तर हा खूपच भयानक वायरस आहे ,, तर आपल्या राजकीय नेत्यांनी काय केलं याच्यावर माहिती का कोरोना वर लस नाही ती येण्यास ही वेळ लागणार आहेच किती मरणार आहेत किती जगणार आहेत हे भारतात जर कोणाला अगोदर माहिती असेल तर ते आपल्या राजकीय नेत्यांना ,,
मग या आपल्या राजकीय नेत्यांनी याच्यावर उपाय काय केलं तर तो म्हणजे लॉकडाऊन वाढवणे मधून एकदम काही ठिकाणी सूट देणे काही जिल्ह्यात गावात एकदम बिनधास्त फ्री वातावरण करणे ,, काही ठिकाणी दारू दुकाने चालू करा ही परवानगी देणे ,,
आणि उगीच काही कारण नसताना कश्याच तरी निमित्त करून आपापसात भांडण करणे मीडिया मध्ये काहीतरी खोटी बातमी पसरवणे पुन्हा सांगायला ही लावायचे की ही बातमी खोटी आहे ,,
असं करत करत माणसाची मानसिकता बदलवत राहणे
अधून मधून भीती दूर करण्यासाठी कोरोना वर लस अली अशी अफवा पसरवून भीती दूर करणे , हा उपाय आपल्या राजकारणी नेत्यांनी नक्की केला हे एक माझं वेक्तीगत मत आहे ,,
यात एक अशी गोष्ट म्हणजे काही लोकांना ब्लडफेशर शुगर हर्ट प्रॉब्लेम किंवा शारीरिक काही आजार होते त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आणि फक्त डोक्यात एकच येते की मला कोरोना होतो की काय ,, याच्या अगोदर साधी ब्लडफेशर ची गोळी चुकली तर दिवसभर झोप लागत न्हवती एवढं भीत होतो आपण त्याला पण आता त्या ब्लडफेशर शुगर च काही डोक्यात नाहीच एड्स कॅन्सर हे तर कुठे गेले खूप भीत होती याला तर या दोन रोगांना पण याचं ही काहीच नाही वाटतं याच ही कोरोना ने
क्रीडेट मारून टाकले ,,
तसेच आपल्यालाही जगायचं आहे ,, पण ते ही स्वताची काळजी घेऊन जगायचं आहे पॉझिटिव जगायचं पण ओहर कॉन्फिन्ड्स ने जगायचं नाही ,, फक्त अंगात रोगप्रतिकार शक्ती आहे म्हणून मला काही होणार नाही हा विषय सोडून द्या प्रत्येकाच्या अंगामध्ये रोगप्रतिकार शक्ती असतेच ,,, या कोरोना वायरस च्या लढाई मध्ये तोच टिकणार आहे त्याची मानसिकता एकदम फिट आहे. भित्री किंवा डगमगनारी नसली पाहिजे नाही तर काही उपयोग होणार नाही ,,,,
नाहीतर आपण बरेच संकट दुःख झेलून जगतोच की
त्याच्यावर मात करतोच की तसेच या कोरोना बाबतीत आहे ,, आणि आपण त्याला हरवाच आहे तो हरणार.
हे ही नक्कीच ,, फक्त जगायला शिका काळजी घ्या
आणि आनंदित रहा ,,,
आपण बऱ्याच द आपल्या जवळच आनंद असतो पण त्याच्याकडे लक्ष देत नाही , आपण सोशल मीडिया वापरतो आपण एखादी पोष्ट टाकली की त्याला लाइक कमेंट खूप करतात लोक वाचतात लोक पण आपण तरी ही नर्वस होतो नर्वस का होतो तर आपण खूप खालचा विचार करतो खूप ,, तो म्हणजे त्यानेच का लाइक कमेंट केली नाही तिनेच का लाइक केली नाही , इथेच आपण नर्वस होतो अरे आपली कोणावर बळजबरी नाही कोणी आपल्याला लाइक करेल कमेंट करेल , सोशल मीडिया फक्त वेक्त होण्यासाठी आहे वेक्त होणं ना मान्य आहे की त्या वेक्तीची लाइक कमेंट यायला हवी होती पण अली नाही अरे ती वेक्ती कामात असेल किंवा आवडली नसेल पण तुझी पोष्ट तरी वाचली असेल ना आणि इतर लोकांनी लाइक कमेंट केली त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो ,,
जो वेक्ती आपल्या बाबतीत सतत चांगला विचार करतो आपल्या सुखदुःखात सामील होतो आपली विचारपूस करतो अश्या लोकांना कधीच विग्नोर किंवा दुरावा देऊ नका त्या वेक्ती शिवाय तुम्हाला दुसर कोणीच आनंदी ठेऊ शकत नसते पण आपण काय करतो अश्या लोकांना विग्नोर करतो दुरावा देतो ,, तर अस नाही केलं पाहिजे
सतत आनंदी राहणारे मित्र मैत्रिणी जोडा त्याच्याकडे पाहिले की मन कस प्रसन्न झाल पाहिजे असे रहा.
निस्वार्थी जगा ,, ज्यांच्याकडे ज्यास्त मित्र असतात ना तो जीवनात कधीच दुखी राहत नाही सतत फ्रेश राहतो ,,
जे खाऊ वाटते ते बिनधास्त खा जे कपडे घालू वाटतात ते बिनधास्त घाला , फिरू वाटते बिनधास्त फिरा ,, उगीच आमच्या धर्मात हे घालत नाहीत हे खात नाहीत हे असं बोलू नका धर्माला फ्याशन बनवा आणि आनंदी जगा.
आपण कसे वागतो आपल्याला लोक नावे ठेवतात हा विचार मनातून काढून टाका ज्या गोष्टीतून आनंद भेटतो ती गोष्ट करा ,, आणि आजच करा उद्याचा चंद्र तुम्ही पाहणार का नाही हे तुम्हाला आणि मला ही माहीत नाही त्यामुळे आजचा दिवस तुझा आहे खाऊन घे फिरून घे बोलून घे बिनधास्त जगा आनंदी रहा आणि आनंदी
जगायला शिका ,
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



