Skip to content

उद्या सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं होतं, पण मध्येच पाळी आली..

“निसर्गनियम”


जयश्री हाडवळे-कुलकर्णी


प्रिया, अगं आवाज येत नाहीये तुझा, नेटवर्क मध्ये ये यार. सानिका वैतागुनच बोलत होती फोनवर. काय झालंय नेटवर्कला सुद्धा आधीच आमचा उद्याचा प्लॅन काही फिक्स होईना. त्यात हिचा आवाज येत नाहीये. आजचा शनिवार तर गेला घरातच, उद्या तरी बाहेर घालवला तर मंडे ला फ्रेश होतो ऑफिस साठी. तिची ही तणतण आराम खुर्चीत माळ जपत बसलेली आजी पाहतच होती, पण ती चिडलेली असताना आजी स्वतःहून संवाद करायची नाही. कारण, तिचे आई बाबा नेमकं हेच करायचे आणि तिची चिडचिड आणखी वाढायची. बरे आज दोघेही घरात नाहीत. तेव्हड्यात तिनेच विचारलं आजी चहा घेशील का? मी माझ्यासाठी करतीये. आजीने मानेनेच होकार सांगितला. १० मिनिटांनी माळेचा एक फेराही झाला आणि चहाही तयार होता. चहा बिस्कीट होताना सानिकाचा मूड बरा वाटला मग विचारणारच आजी.

काय ग सानू काय झालं होत फोन वर इतकं वैतागायला. अग नाही येत कधी कधी नेटवर्क का काय ते. तुझ्या आत्याला फोन केल्यावर आवाज स्पष्ट नाही आला की तुझा बाबा असचं म्हणतो. तशा मॅडम म्हणाल्या ते माहिते गं मला, चिडायचा विषय तो नाहीये. दोन्ही भुवया उडवत मला माहिते तू माळ जपताना सुद्धा सगळीकडे लक्ष असत तुझं. आजी म्हणाली, हो मग उगाच होय आजी झाले.आणि दोघीही खळखळून हसल्या.

आजी:- बरं सांग काय म्हणत होतीस डेट/पिरिएड्स???काही लक्षात नाही आलं गं माझ्या.

सानिका:- अग तुला माहिते ना मी प्रत्येक रविवारी बाहेर फिरायला जाते. गेले एक महिना सिद्धिविनाय मंदिरात जायचंय गं आम्हाला. पण ते काही जमेना. कुणाचे पिरिएड्स च्या डेटस् येतात, तर कुणाच्या मित्रांच्या डेटस् येतात, तर कधी वेगळे प्लॅन होतायत. आणि आता ही प्रिया म्हणते उद्याच जाऊ . अगं आणि आता माझी आजची डेट आहे तर आज उद्या कधी ही बॉम्ब फुटू शकतो.

आजी:- पदर तोंडाला लावून हसत म्हणते, अगं बॉम्ब काय वेडे अंड असत ना ते.

सानिका:- ये आजी गप्प ग आधीच मला दुसरा प्लॅनसाठी लोकेशन सुचत नाहीये तुझं काय बॉम्ब की अंड?

आजी पुढे म्हणाली, अगं बाळा नको करुस दुसरा प्लॅन प्रिय म्हणते तस करा की असही जुळून येत नव्हतं म्हणतीयेस.

सानिका:- वा छान म्हणजे तिथे पोहचल्यावर पिरिएड्स आले की मी गरीबा सारखी बाहेर उभी राहते आणि मैत्रिणींना जाऊन येउदे.

आजी:- अगं मी कुठे म्हटलं की तू बाहेर थांब. जा की आत, देवाच दर्शन घेऊन ये. हे बघ तुझी इच्छा आहे ना दर्शन घ्यायची तर देव बघून घेईल की ग सगळं आणि आले जरी अडचण तरी ती त्याच्या इच्छेने. त्याची इच्छा होती म्हणायचं आणि हात जोडायचे.

सानिका:- अग आईने मला कधी नको म्हटलं नाही पण ती तिची रोजची देवपूजा थांबवतेच की ग त्या ५ दिवसात.

आजी:- अग तीने सुद्धा तिच्या आईला हेच करताना पाहिलं. म्हणून. पण, तुला कधीही असच कर म्हणणार नाही ओ ती.

मग तू नाही का पाळलेस का ग हे दिवस. तुमच्या काळी तर खूप कडक नियम होते ना ग?? सानिकाने आश्चर्याने विचारले.

तशी पुढे आजी म्हणाली अग बाळा कडक म्हणजे अति कडक होते ग नियम. दारात चप्पल काढायच्या ठिकाणी बसवत ग आम्हाला. ५ दिवस वेगळी भांडी, वेगळी अंथरूण पांघरूण सारच वेगळं ठेवायचं. अगदी कशाला म्हणजे कशाला शिवायच नाही. केरसुणीला जरी सवयीप्रमाने हात लावला तरी तिच्यावर पाणी शिंपडून तिला शुद्ध करायचे.

अगं पण त्यावेळी वाडा मोठा होता की, मग दारात का??आणि आराम मिळावा म्हणून बाजूला बसवायचे ना ग.?तसही त्याशिवाय आराम मिळायचा नाही ना बायकांना.? सानिकाचे प्रश्न.?

आजी:- अग वाडा जितका मोठा तितके लोकही खूप होती ना कुटुंबात. त्यात बायका आणि लहान मुल जास्त. लहान लेकरू जरी आईकडे आलं तरी त्याला पाणी शिंपडल्याशिवाय जवळ घेत नसत. पाणी शिंपडून शुद्ध करायचे गं लेकरू का तर त्याला जन्म दिलेल्या आईला शिवायचा तो किंवा मग आमचे सासरे डाफरायचे मुलांवर, ४ दिवस नाही गेलास आईकडे तर जीव जातोय होय. त्यात काम जीव जाईपर्यंत असायची. स्वयंपाक घरात शिरकाव नसायचा पण शेतात आणि गोठयात खूप काम असायची. त्या गोठयातल्या गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत अस ही म्हणायचे बर का. कुठं दुखतंय आणि कुठं कळ येतीये कुणी कुणी विचारायचं नाही. अडचणीच्या दिवसात तर जास्त राबाव लागायचं.

एकदा अशीच अडचणीत असताना अंगण सारवत होते पावसाचे दिवस असल्यामुळे सारीच शेतातली काम उरकायला तिकडे गेली होती. मी सुद्धा जाणार होते हातातल काम संपवून. आणि घरातली सगळी मुलं झोपाळ्यावर खेळत होती. तिथं आमचे सासरे पोथी वाचन करायचे हो. ह्या ४ दिवसात तिथं सावली सुद्धा पडू द्यायची नाही आणि तुझा बाबा ६ वर्षाचा होता, जसा उभा राहिला झोपाळ्यावर मी नको ओरडे पर्यंत तसा खाली कोसळला. तसे शेणाचे हात पदराला पुसून धावले. लेकरू छातीशी धरलं तर लक्षात आलं डोक्यात रक्ताची धार वाहतीये, ते पाहून काही सुचेनाच गं मला. कुणाला बोलवावं?? की, लेकरु घेऊन डॉक्टरच घर गाठाव. तशी त्याला कुशीत घेऊन धावत गेले ७/८ घर आणि २ वाडे एव्हढ अंतरावर होत डॉक्टरच घर.

धावतपळत घर गाठलं त्यांनी आमची अवस्था बघूनच म्हटले, बाळाला दवाखान्यात न्ह्याव लागलं किरकोळ आजार घरी तपासाता येतात. त्यांनी त्यांची गाडी काढली आणि दवाखाना गाठला. लय रक्त गेलं होत गं माझ्या लेकराच, बेशुद्ध झालतं घाबरून. ७ टाके पडले होते, माझ्या लेकराच्या डोक्याला अजून पण वण आहेत बघ. जोवर तो शुद्धीवर आला नाही तोवर पोटातला गोळा काही जाईना. तोवर घरातली ४ मंडळी तिथं हजर, त्यात एक माझ्या जाउबाई होत्या. आणि मग लेकरू कसं आहे विचारायच्या आधी माझी अक्कल निघाली तिथं.आम्हाला बोलवायला पाठवायचं एखाद्या पोराला तर स्वतः पुढं होऊन आलीस होय.

त्यात जाउबाई म्हणाल्या शुध्द आहे का ग तुला? पुढून मागून मखालीयेस रक्तानं? आणि तेव्हा मी खरचं भानावर आले आणि मागचं रक्त कसलं लक्षात आलं. पदर ओढून घ्यावा तर तो लेकराच्या रक्तानं माखलाय. तसा दाराचा कोपरा पकडून उभी राहिले. तसे बाळ बाहेर आणायला सांगताना डॉक्टर बाहेर येऊन म्हटले, त्यांनी पोराला वेळेत माझ्यापर्यंत आणलं नसतं तर तुमच्यापैकी एकाच्या रक्ताची गरज पडली असती आत्ता. आणि त्यांच्या साडीवरच्या पुढच्या पदारमुळे आज बाळाला दुसरा जन्म मिळालाय आणि मागच्या रक्तामुळे पहिला जन्म. तर मग उगाच का त्या माउलीला दूषण देताय. असं सगळं ऐकून मला तर रडू कोसळलं.

सगळ्यांचे चेहरे पडले खरं. पण, तुझा बाबा शुध्दीवर आला म्हटल्यावर मला घरी जा म्हटले. माझा जीव काही होईना जायला.परत एकदा डॉक्टर म्हटले, आजच्या दिवस बाळाला इथेच ठेवावं लागेल त्याच्या सोबत त्याची आई असंण खूप गरजेचं आहे. तशा जाऊबाई म्हणाल्या आवो पण तिची अवस्था लईच बेकार हाय. आमच्या इथल्या मावशी त्यांची आजची सोय करतील तुम्ही काही काळजी करू नका डॉक्टर म्हटले.

आणि मग बाळा, तिथून पुढे मी मन मारूनच सगळे कडक नियम पाळत होते जोपर्यंत तुझ्या आजोबांनी त्यांच्या सोबत मुंबईत नाही आणलं. तसं देवपूजा मी सुद्धा नाही केली कधी अडचण असताना, पण देवदर्शन करायचीच. डोळे झाकून मनोभावे हात जोडले की देवाला नामस्कर पोहचतो. आता माझ्यावर आणि माझ्या मनावर खूप वर्ष त्या नियमावलीचे संस्कार झालेले होते. म्ह्णून असेल कदाचित. पण मग त्यावेळी १० वर्षाची असलेली तुझ्या आत्याकडून स्वयंपाक करून घ्यायचं बंद केलं अडचणीच्या दिवसात. मी स्वतः शिजवायची आणि स्वतः खाऊ घालायची.

त्यावेळी लेकरू कुशीत घ्यायची हिंम्मत केली नसती तर एव्हढ शहाणपण आलं नसतही मला. तेव्हापासून ठरवलं आपल्या मुलीला आणि सुनेला ह्यात अडकवायच नाही मग नातीला तरी का अडकवू.
सगळं चालू असताना आजीने दोनदा पदराने डोळे पुसले, पण त्यांच्या सानूच्या डोळ्यातून अजूनही धारा वाहातच होत्या.

आजीने तिचे डोळे पुसले आणि जवळ घेऊन विचारलं मग उद्याचा काय प्लॅन? आणि हो तुमचं ते पॅड का कायते ठेव हो सोबत. तस सानिकाने हातातल्या मोबाईल वर Done टाईप केलं आणि ही माझी आजी असल्याच्या अभिमानाने आजीची मिठी आणखी घट्ट केली. हे आजीच्या ही लक्षात आलं.

श्रद्धा की अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.आता जी पिढी ४०च्या पुढची आहे तिची मतं बदलायची नाहीच कारण त्यांची इतकी वर्ष ह्याच संस्कारात गेलीयेत पण ४०च्या आधीच्या लोकांनी थोडेफार बदल करायला हरकतच नाही त्याशिवाय आता ४ वर्षाची असलेली पिढी योग्य दिशेने कशी घडेल.

मान्य आहे त्या दिवसात शरीरातल्या इतर टाकाऊ गोष्टींप्रमाणे ती ही टाकाऊच गोष्ट आहे, पण ती कधी? जेव्हा, त्यात गर्भधारना नसते. जेव्हा त्यात गर्भ तेव्हा ती जगातली सगळ्यात स्वच्छ आणि उबदार गोष्ट असते एका जीवासाठी.

आता तुम्ही म्हणाल, आमचे विचार बुरसटलेले नाहीत, हे सगळं जुनं झालंय, आपण खूप पुढे आलोय वैगेरे पण मी अजूनही कित्येक ठिकाणी गणपती उत्सवात किंवा दिवाळी सणात बायकांना मासिक पाळी पुढे ढकलण्याचा गोळ्या खाताना पहातीये, किंवा खायला सांगितलेल्या पहातीये, निसर्गाचा मार्गात अडथळा आणलेला पहातीये. त्या गोळ्यांचा तिच्यावर शारीरिकरीत्या/मानसिकरीत्या वाईट परिणाम होतात. ते वेगळंच. जे की अत्यंत चुकीचं आहे. ते कस पुन्हा एकदा एका नव्या गोष्टी सोबत नव्या लेखात लिहिलंच मी.

पण सध्या काही गैरसमज मिटायला हवेत, एव्हढाच प्रयत्न.


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!