
आपण चाळिशीपर्यंत जगणार का ?
कार्पोरेट लाईफ मध्ये असल्यामुळे जवळजवळ सर्व बँका, फायनान्स कंपनी, इन्शुरन्स कंपनी आणि वेगवेगळ्या कार्पोरेट कंपनीमध्ये ओळख तर असणारच..! परंतु या बऱ्याच कंपन्यांमध्ये जवळचे हक्काचे बरेच मित्र आहेत, त्यातील कधी चहा, कधी कॉफी यानिमित्तानं भेटत राहतात.
काल एका मोठ्या कंपनीतील एक मित्र किंवा ज्याला आपण ओळखीच्या व्यक्ती असे म्हणू शकतो, अशा व्यक्तीच्या दुःखद निधनाची बातमी आली वय ३६ परंतु हार्ट अटॅक ने गेला बिचारा..! ३६ व्या वर्षी हार्ट अटॅक ?
गेल्या काही महिन्याभरात अशाच जवळजवळ पाच न्यूज मिळाल्या होत्या, लोकेशन थोडी वेगळी कोण सांगलीचं, कोण बेळगावचा, कोण साताऱ्यातील, तर एकदोन कोल्हापूरचे देखील..! परंतु प्रश्न हा पडतोय की, वयाच्या चाळिशीच्या आत या लोकांना हार्ट अटॅक, लो बीपी असल्या आजारांनी ग्रासलेले आहे आणि हे लोक हे जग सोडून गेले ?
मन सुन्न करणारा प्रश्न आहे हा..! कारण की यांच्या घरात यांचे सर्व कुटुंब यांच्यावर अवलंबून होतं, मुलं लहान होती, अगदी तीन-चार वर्षाचे मग आता इथून पुढे कुटुंबाचा काय होणार ? या प्रश्नाने स्तब्ध झालो. पण एक मुद्दा मनात घोळत राहिला आणि कालपासून झोपच लागली नाही. तो म्हणजे हा वयाच्या चाळीशी वर्षापर्यंत ही लोक जगू शकत नाहीत असं का काय झालं होतं त्यांना ?
कार्पोरेट लाईफ मध्ये आलेले प्रेशर.. मनाची घालमेल, जॉब्स इन सिक्युरिटी, प्रचंड धावपळ आणि मानसिक तान, गरजेपेक्षा जास्त असणाऱ्या जबाबदाऱ्या, शारीरिक कपॅसिटी चा लागलेला कस, अवेळी खाणं, शरीराला पोषक अन्न न पोहोचू देण, (एखाद्याला जर असेल तर कदाचित व्यसन असू शकत) व्यायाम न करणे, स्वतःच्या शरीराची काळजी न घेणे, प्रचंड धावपळ..! या गोष्टीत आपण जगणं विसरूनच गेलो, आपण जगणार कधी ? का फक्त पैसा कमावणार आणि हप्ते फेडणार ?
जवळजवळ संपूर्ण आयुष्य हप्ते फेडण्यात गेले, एक वस्तू घेतली की त्याचा हप्ता, तो संपतोय तोपर्यंत दुसऱ्या, तो संपतोय तोपर्यंत तिसऱ्या वस्तू चा हप्ता
या हप्ता, मोबाईल, गाडी आणि ऑफिस मधला कॉम्प्युटर यामध्येच संपूर्ण आयुष्य वाया चालले असं वाटत नाही का तुम्हाला ?
जगात किती घडामोडी चालू आहे किती चांगल्या गोष्टी आहेत, निसर्ग आहे मनाला आनंद देणारे कित्येक गोष्टी जगभरात पसरलेले आहेत, त्याचा आनंद घेता फक्त आणि फक्त घर ते ऑफिस ऑफिस ते घर करणारी बरेच लोक नजरेने पाहतोय.
ना आपल्या छंदाला वेळ देतात, ना कधी गाणी गुणगुणतात, ना कधी शांत जाऊन कुठला वैचारिक चित्रपट पाहतात, ना स्वतःचे फॅमिलीला घेऊन कधी फिरायला जातात, स्वतःच्या हौस मौज किंवा स्वतःचे छंद तर स्वतःच्या मनातून ते कोसोदूर काढून ठेवलेली आहे या लोकांनी..! आणि एक ही यांत्रिक पद्धतीने मशीनचा व तसेच दररोज पळत आहेत पळताहेत पडत आहेत पैसा कमावण्यात आणि हा आजार मागे लागतो कदाचित एखाद्याला त्याचा प्रेशर्स होतो तो ४० क्रॉस करतो परंतु तो देखील संपून जातो.
वयाच्या पन्नाशीच्या आतच मग कधीकधी वाटतं सुरुवातीची किती सुंदर होते चार हजार पगार पण मन शांत असायचं स्वतःसाठी वेळ द्यायचं नोकरीचा उत्साह असायचा घरातील सर्वजण आनंदात असायची कारण त्यांना यायला वेळ होता. स्वतः आनंदात असायचे कारण स्वतःच्या आवडीनिवडी, छंद, व्यायाम, निसर्ग यासाठी प्रचंड भरपूर वेळ शिल्लक होता.
पैसा वाढू लागला आणि वेळ कमी होऊ लागला असल्या जगणं खरंच गरजेचा आहे का ?
प्रत्येकासाठी आयुष्यात काय कमावलं त्यापेक्षा किती चांगलं जगलो हे महत्त्वाचं वाटत नाही का लोकांना ?
धकाधकीच्या जीवनात या प्रदुषणात प्रत्येकजण भरडला जातोय. परंतु एका साचेबद्ध चाकोरीत अडकून कित्येक करोड लोक दररोज मरत आहेत याकडे कोणाचेही लक्ष नाही.
स्वतःच्या फिटनेस कडे थोडं फार लक्ष द्या. आयुष्य भरभरून जगा, खुप फिरा, चांगलं खा आणि खूप जगा, कारण पैसा पैसा करताना आपण जीवन संपवत चाललो आहे आणि मग कधी कधी असं वाटतं, का करतो आपण सगळं ?
वयाची चाळिशी तरी आपण क्रॉस करू शकणार आहे का नाही..?
जरा थांबा, विचार करा आणि आजपासून जगायला शिका..!
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



