Skip to content

या लेखात आपल्यातला ‘न्यूनगंड’ ओळखुया आणि काढुया!

न्यूनगंड……


न्यूनगंड म्हणजे नक्की काय ? आपल्यात काही उणीव आहे याची मनाला असलेली एक सल असेच ना ?

आपल्या प्रत्येकालाच कसला ना कसला न्यूनगंड असतोच , गरिबाला आपण श्रीमंत नसल्याचा , सावळ्या माणसाला आपण गोर नसल्याचं , ढ व्यक्तीला आपण हुशार नसल्याचे अशी बरीच उदाहरणे देता येतील.
पण खरच अशी न्यूनगंड घेऊन जगण्याची गरज असते का ? आपल्याकडे जी गोष्ट नाही आणि समोरच्याकडे आहे तर तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ हे कोण ठरवतो आपणच ना .

ती व्यक्ती आपल्यापेक्षा एका बाबतीत उजवी असली म्हणून तिचे श्रेष्ठत्व आपण गृहीत धरतो . असे ही असू शकते कदाचित आपल्याकडे असणारा एखादा गुण हा त्या व्यक्ती कडे कडी मात्र ही नाही .

काही वेळा न्यूनगंड हा क्षणिक असतो म्हणजे कुणीतरी आपल्यापेक्षा jyast चांगले काही तरी करून जाते आणि मग आपल्याला वाटते की आपण हे अस उत्तम करूच शकत नाही ? त्या वेळी गरज असते आपण आपल्यावर विश्वास ठेवायची? .त्या गोष्टीची बरोबरी न करता त्यातले वेगळे पण शोधायच आणि आपण तसे स्वतःला घडवायच..

मला खरच कौतुक वाटतं जेव्हा कुठे तरी वाचतो किंवा बघतो एखादा अपंग व्यक्ती जेव्हा खूप छान कलाकृती निर्माण करते , आपल्यातल्या कमतरते ला आपली लाचारी न बनवता जिद्दी ने काही करून दाखवता .. रांगोळी , चित्र , गायन ,अशा किती तरी कला ते उत्तम पने सादर करतात , मी या ठिकाणी एकच उदाहरण देईल ते म्हणजे upsc क्रॅक करणारी हर्षदा जाधव..

एखादी व्यक्ती जर अडखळत बोलत असेल तर आपण त्याच्या समोर हसतो ? अरे हे काय बोलता काही समजतच नाही असे बोलून मोकळे होतो ,.कधी शांतपणे एकूण घेण्याचा प्रयत्न करत नाही ,.त्यांच्या भावना समजून घेतल्या तर संवाद आपोआप साधला जातो..

खरे तर न्यूनगंड येण्याला आपल्या आजूबाजूचे लोक जस्त कारणीभूत असतात , एखादी व्यक्ती मधे काही उणीव असेल तर तिच्या गुणांकडे दुर्लक्ष्य करून त्या उनिवेवरच बोट ठेवले जाते ?. मग त्या व्यक्तीला आपोआप च आपल्यातल्या त्या उनिवेची लाज वाटू लागते .आणि त्या गोष्टींचा न्यूनगंड येतो .

कुणीतरी आपल्याला कमी लेखले म्हणून आपण कुणीच नाही असा ही न्यूनगंड आपल्या सगळ्यात बऱ्याच वेळा येतो , आणि आपोआप ती व्यक्ती सगळ्यापासून लांब राहू लागते .

आपण निदान एका व्यक्तीला तरी न्यूनगंडा तून बाहेर पडायला मदत करू .

कुणाच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्यांच्या गुणाचे कौतुक करू..


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!

नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

1 thought on “या लेखात आपल्यातला ‘न्यूनगंड’ ओळखुया आणि काढुया!”

  1. अगदी चांगल्या पद्धति ने समजावून सांगितले.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!