
आपणच आपली किंमत कमी करतोय!!
एका प्रसिद्ध वक्त्यांनी हातात पाचशे रुपयाची नोट दाखवत आपल्या सेमिनारची सुरुवात केली. हॉलमधे बसलेल्या शेकडो लोकांना त्यांनी विचारलं,
ही पाचशे रुपयाची नोट कोणाला पाहिजे हॉलमधे बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले.
तो म्हणाला मीही नोट या हॉलमधील कोणा एका व्यक्तीला देईन.
परंतु पहिले मला हे करू द्या.. आणि त्याने ती नोट चुरगळली आणि तो म्हणाला, “आता ही नोट कोणाला पाहिजे” तरीसुद्धा हॉलमध्ये लोकांनी हात वर केले.
पुढे त्याने ती नोट खाली फेकून दिली आणि तो ती नोट पायाने तुडवू लागला. त्याने ती नोट उचलली तर ती नोट खूप चुरगळलेली होती आणि खूप घाण झाली होती.
वक्ता म्हणाला की, “अजूनही कोण आहे का की ज्याला ही नॉट हवी आहे” तरी सुद्धा हॉलमधील लोकांनी पुन्हा हात वर केले.
मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाचा धडा शिकलात कारण मी या नोटे बरोबर खूप काही केलं तरी देखील ही नोट तुम्हाला हवी आहे कारण नोटेची किंमत अजूनही पाचशे रुपये आहेत.
जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या.
म्हणून तुमची किंमत काही कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधीच विसरू नका.
एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन….
ते आनंदाने आणि सुखात जगूया….
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


जिवनाला नवीन गतीमिलाल्या सारखी
खूप छान
Excellent
Chan aahe….
Small but sweetest