Skip to content

कितीही प्रयत्न केले तरी हातातून काही गोष्टी निसटून जातातच!

आयुष्यात माणसाला नक्की काय हवं असतं तेच कळत नाही.


विक्रम इंगळे

4 एप्रिल 2020


आयुष्यात माणसाला नक्की काय हवं असतं तेच कळत नाही. मी असं म्हणतोय कारण प्रत्येक टप्प्यावर काहीतरी वेगळं हवं असतं. तुमचेच बघा ना! लहानपणी, पौगंडावस्थेत, तरुणपणी, तिशीत, चाळिशीत वगैरे, सगळ्या आवडी, गरजा, आवश्यकता पार बदलून जातात.

काहीही बदलू दे, पण प्रत्येक वेळी माणसाला एक गोष्ट मात्र नक्की हवी असते आणि ती म्हणजे सुख. खरं म्हणजे समाधान सुद्धा, पण ती गोष्ट पटकन कळत नाही. जरा मोठं झालं की समाधानाची पण किंमत कळते.

हे सुख मिळवण्यासाठी माणसाची भरपुर धडपड चालू असते त्यात तो कधी बोलणी खातो, ठेचा खातो अणि टोमणे ही सहन करतो. कधीकधी त्याची स्तुती, खरी अणि खोटी, पण होते. सगळे आनंदाने स्विकारायचं अणि एकच लक्षात ठेवायचं, हे आयुष्य आहे अणि ते क्षणाक्षणांने पुढे जातंय.

आयुष्यभर माणूस हे माझं, ते माझं असं करून काही गोष्टी कमवतो अणि काही गोष्टी नाही मिळत. मजेदार गोष्ट ही आहे की, कुणालाही विचारा, जे नाही मिळालं त्याचीच लिस्ट मोठी असते. शेवटी कळतं की जे मिळवण्यासाठी एवढी मरमर केली, ते फार उपयोगाचे नाहीये.
मग असही कळतं की गमावण्यासारख सुद्धा काहीच नाहीये. जे काही आहे ते सगळं इथंच सोडायचं. ह्या सगळ्या मिळवण्या गमवण्याच्या नादात आयुष्याची मजा घ्यायची पण राहिली!!

गंमत म्हणजे सुख मिळाल्यावर ते हरवून जाऊ नये म्हणून पण धडपड सुरू असते. पण कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी हातातून निसटून जातातच. मग परत त्याच्या मागे पळायचं. छाती फुटे पर्यंत पळाल्या नंतर सुद्धा हाती काही लागेल असं काही नाही. मग कळतं ह्या सगळ्या पळण्याच्या नादात आयुष्याची मजा घ्यायची पण राहिली!!

मला कधीकधी काय वाटतं की आपण आयुष्यभर नुसते कशासाठी तरी भांडत असतो. माहित नाही कुणाशी ते पण हे भांडण असतं हव्यासापोटी, लालसेपोटी, आणखीन आणखीन मिळवण्यासाठी! इतक्या टोकाच्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा असतात ना, त्याही स्वतः कडून अणि इतरांकडून सुद्धा. कुणालाच कमी नको असतं. आणि कुणालाच कष्ट ही नको असतात. फक्त ऐहिक सुखांची न संपणारी यादी तयार असती.

एक दिवस सगळे फोटो फ्रेम मध्ये टांगले जाणार आहेत. अधूनमधून त्यावरची धूळ झटकली जाईल सुद्धा. पण माणूस लक्षात राहील तो त्याच्या विचारांनी. तो लक्षात राहील, त्याच्याकडे किती ऐहिक संपत्ती होती ह्या पेक्षा त्याच्याकडे किती बौद्धिक संपदा होती. तो लक्षात राहील, त्याच्या घरी किती सुखासीनता होती ह्या पेक्षा त्याच्याकडे किती भावनांची श्रीमंती होती, ह्या वरुन!

त्याच्या पुढच्या पिढीची भाषा सांगेल की माणूस कसा होता. त्याच्या पुढच्या पिढीची निर्णय क्षमता सांगेल की माणसाचे विचार कसे होते. त्याच्या पुढच्या पिढीचा गर्व सांगेल की माणूस फक्त पैशाला किती महत्व देत होता. आणि त्याच्या पुढच्या पिढीचे संस्कार सांगतील की त्याची मूल्यं काय होती.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “कितीही प्रयत्न केले तरी हातातून काही गोष्टी निसटून जातातच!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!