Skip to content

जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे.

जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे.


जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होते? म्हणजे,
मनुष्य आनंदासाठी जगतो, आणि दुःख करतो. याचे कारण असे की, आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो.

मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो.

आपल्याला अशी एक सवय लागली आहे की, काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही.
प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो, आणि त्यापासून आनंद भोगतो.

आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे; पण कारणावर अवलंबून असणार्या आनंदाची वाट दुःखामधून आहे, आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून,

कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी.

कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही.

कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे. हे ‘काहीही न करणे’ ही फारच उच्च अवस्था आहे.

आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा ! कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे.

कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा, आपल्याला त्रास देणारा कुणी आहे; आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते; म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो, म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो;

हे जसे खरे, तसेच, त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा ? त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा ? असे आपण वागावे.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे.”

  1. अंजना साठे

    मला यातून घेण्यासारखे आहे. ते मी घेणार. कारण माझी 29 yr. ची मुलगी अशीच aahe. तिला मला त्रास देण्यात खूप आनंद हॊतॊ. पण मी हा लेख वाचला. मन आनंदी zhale. तुमचे सगळे लेख मी vachte. छान असतात.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!