
पती-पत्नी संबंध…..काही स्व-अनुभवी टिप्स!
किमान खालील सुत्रे पाळलीत तर पती-पत्नी मधील संबंध मधूर होतील व पुढील आयुष्य आनंदाने जगता येण्यास मदत होईल.
1. इगो -प्राब्लम :-येऊ देऊ नका. कोण पडतं घेईल? मी का कमीपणा स्वीकारू? असं म्हणून ताणून घेवू नका. नेहमी अँडजस्ट करा. प्रेमाचे दिवस वाया घालवू नका.
2. भावना प्रकट करा :- दुस-याविषयी जे जे वाटते ते नक्की सांगा. प्रेम, आपुलकी,आकर्षण, काय वाटतं ते सांगा.
3. कौतुक करा :- प्रत्येक चांगल्या गोष्टीचं आवजूर्जन कौतुक Appreciation करा. स्वयंपाक छान केलाय….वगैरे.
4. आवडी निवडीचे भान ठेवा :- एक- दुस-याला काय आवडतं ते नीट लक्षात ठेवून वेळोवेळी उपयोग करा.
5. संवाद :- एक- दुसऱ्या चा मनासोबत थेट संवाद साधा. दोघांनी वेळ काढावा. एक दुस-याविषयी बोला. भावना… वाईट वाटलं…काय वाटलं…छंद… विचार.. सेक्स आवड-निवड…वगैरे.
6. संशय नको:- त्याचा प्रामाणिकपणा त्याचा सोबत… माझा प्रामाणिकपणा माझा सोबत हा नियम पक्का करा दुढ करा. संशयाला थारा देऊ नका. नाहीतर संसाराची राखरांगोळी होईल.
7. सेक्सला योग्य प्राधान्य द्या:- ज्यांच बेडवर पटतं, त्यांचंच जीवनातल्या सगळ्या अंगांत पटतं. स्वतंत्र बेडरूम राखा. मुलांना मध्ये झोपवू नका. कुणालाच, मुलांनासुध्दा लैगिंक जीवनावर अतिक्रमण करु देवू नका. दोघांची प्रायव्हसी राखा.
8. कटकट नको :- एक-दुस-याला कटकट करू नका. प्रेमाने सांगा. सतत नकारात्मक बोलू नका. सतत चुका, कमतरता दाखविण्यासाठी बोलतांना टोन, वाक्यरचनासुद्धा विधायकच वापरण्याचा प्रयत्न करा.
आपण जर आपल्या संवाद कौशल्यात, वर्तणुकीत, माणुसकीपुर्ण वागण्यात ८०% बदल केलेत तर त्यातुन दुस- ला 20% बदल करण्याची प्रेरणा मिळते. आणि सुंदर, मधुर संबंध निर्माण होतात. कसं वागावं, कसं बोलावं, दुर व्हावं, संबंध तोडावेत, कि तोडू नये. सुखी जिवनाची चाबी आपल्या दोंघाचाही हाती आहे. एक सुखी आयुष्य घालविण्याच्या निर्णय तुम्हाला घ्यावयाचा आहे.
माझ्या खुप खुप शुभेच्छा सोबत आहेत.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.


Chan mahiti milali
Nice sir khar tar mi tumcha aabhari aahe sir mala ha lekh vachayala milala maz lgn houn 3 varsh zale sir satat bhandan astata suru sir