
“‘आकर्षणाचा सिद्धांत” – वायरस प्रसार थांबवा.
‘आकर्षणाचा सिद्धांत’ माहिती आहे का तुम्हांला? नसेल माहिती तर ऐका.
‘आकर्षणाचा सिद्धांत’ म्हणजे तुम्ही सतत जे शब्द उच्चारता किंवा ज्या गोष्टींची नेहमी कल्पना करता अगदी तसंच आपल्या अवतीभोवती घडत असतं.
कारण तुम्ही जे काही विचार करता, बोलता त्या लहरी वातावरणात विरून जातात आणि मग सारं ब्रह्मान्ड तुम्ही केलेला विचार साक्षात उतरवण्यात तुम्हांला मदत करत असतं मग तो चांगला असो की वाईट.
जसं तुम्ही विचार करणार तसंच घडणार
आणि आता सध्या तुम्ही नि मी काय तर सगळं विश्वच त्या एका वायरस बद्दलच बोलत आहे. माझ्या मतानुसार, “वायरस म्हणजे जो वाया गेला आहे अशी नकारात्मक ऊर्जा” मग त्याची चर्चा आणि प्रसार का?
उलट, आपण सतत वॉट्सअप्प, फेसबुक वरून हा वायरस पसरवत आहोत.
जर करोडो लोक ह्या वायरसचाच उच्चार करत राहिले तर तो आणखी शक्तिशाली बनत जाईल.
त्यामुळे ‘आकर्षणाचा सिद्धांत’ लक्षात घेऊन वायरसची चर्चा, प्रसार थांबवा.
सगळ्यांना त्याची लक्षणे तोंडपाठ झाली आहेत. काहीजण वाचून, पाहून अर्धे डॉक्टर सुध्दा बनलेत.
सगळ्यांकडे टीव्ही देखील आहे. त्यामुळे कोणालाही काहीही पाठवायची गरज नाही. त्यामुळे आपण सर्वांनी नकारात्मक गोष्टी पसरावायच्या थांबवूयात. त्याबदल्यात आनंद व इतर प्रेरणादायी पोस्ट पाठवू.
मला जसा हा सिद्धांत आठवला मी ताबडतोब माझं वॉट्सअप्प, फेसबुक स्टेटस बदललं, तुम्ही कधी बदलताय? आणि ह्यापुढे मी तुम्हांला वायरस संदर्भात कोणताही विडिओ, माहिती, जोक्स पाठवणार नाही. जर वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असेल तर तुम्ही देखील कराल ना ह्याचं पालन?
फक्त एवढाच सकारात्मक विचार करूयात की आम्ही सर्वजण सुरक्षित, निरोगी आहोत. संपूर्ण जग वायरस मुक्त झालं आहे. सर्व सुरळीत चालू झालं आहे.
नक्कीच हा सर्वांचा एकत्रित चांगला विचार सर्वांना आनंदीत व सुरक्षित ठेवेल. करताय ना ह्याची शीघ्र सुरवात? चला तर मग, चांगल्या गोष्टींना विलंब नको.
ह्या सिद्धांताने बहुतेकांची स्वप्नं साकार केलीयेत. आपण कमीतकमी विचारांना नवीन आकार देवूयात.
फक्त सरकारच्या धोरणांचा अवलंब करु आणि त्याचं काटेकोरपणे पालन करू. आजपासून त्या वायरस च नावंच नको घेवूयात. मग बघा परिस्थिती कशी सुधारेल आणि तुम्हांला पण आल्हाददायक वाटेल.
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.


Very very true
Very true, whatever v think same things r happening around us, so v vl start thinking + ve