Skip to content

कदाचीत यालाच म्हणत असतील… “जगणं” !!!

जगणं !


पवन पाथरकर


पावसाळ्याचे दिवस होते ..सकाळी ऑफीसला जातांना गाडी अचानक बंद पडली.थाेडीफार खटपट करुनही ती सुुरु हाेण्याचे चिन्ह दिसत नव्हते. वेळ हाेणार हे निश्चित झाल्यामुळे तसे ऑफीसला कळवले.आता गॅरेज शाेधावे लागणार हाेते, त्याहीपेक्षा जास्त संकट गाडी गॅरेजपर्यंत ढकलत नेण्याचे हाेते.पण करणार काय पर्याय नव्हता आलिया भाेगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे शाेधमाेहीम सुरु केली.गेली कित्येक वर्षे मी नेमाने ताे रस्ता तुडवताे आहे.त्यामुळे परीसरही पाहण्यात आहे ओळखीचा आहे.असं सगळं ओळखीचं असुनही आज ते सगळं विश्व मला अनाेळखी वाटत हाेतं.

अरे इथे हे दुकान आहे का ! अरे इथे ते आहे का ! आपण कसं पाहीलं नाही ? इतक्या दिवसांत आपल्या कसं लक्षात आलं नाही ? असे मनात म्हणत मी गॅरेज शाेधत हाेताे.सगळं ओळखीचं असुनही अनाेळखी असण्याचं कारण म्हणजे माझी गाडी या आधी तिथे कधी थांबलीच नव्हती.एवढेच काय, तर ज्या रस्त्यावरुन मी इतर दिवशी लिलया मार्गक्रमण करत हाेताे.इतर वाहनांना शिताफीने मागे टाकत हाेताे,आज ताेच रस्ता मला दमवत हाेता.त्यावरील चढ – उतार, खड्डे मला त्यांची दखल घेण्यास भाग पाडत हाेते. वरुन वरुणराज आपली कृपादृष्टी ठेऊन अखंड बरसत हाेते.मला त्यांच्यावर रागवण्याचा अधीकार ताे काय ? अखिल सृष्टिला अमृत घाेट पाजणारे ते जलबिंदू ,माझ्या घामाच्या धारांनाही मधुर करुन गालांवरतुन ओघळत हाेते.यथावकाश गॅरेज सापडले गाडीत किरकोळ बिघाड हाेता. तात्काळ दुरुस्तही झाला.मी पुन्हा मार्गस्थ झालाे. पण ह्या प्रसंगाने विचारचक्र सुरु झाले.

माणसाचंही असंच असतं ना ? राेजचीच माणसे, राेजच्याच वस्तु सगळं कसं ओळखीचंच पण त्यांची आणि आपली ओळख असतेच असं नाही.हजाराेंच्या गर्दीतही जिवाला मी एकटा आहे असे वाटण्याचे मुख्य कारण ओळखीचं आहे पण ओळख नाही हेच असावे का ? माणसाने पकडलेला वेग हे दुर्लक्षाचे कारण असावे का ? हा वेग का ? आणि कशासाठी ? याची खात्रीशीर उत्तरे ठाऊक असतील तर ठीक अन्यथा त्या वेगाचे करायचे काय ? हे सांगणार काेण ? समजवणार काेण ?
गाडीचं एकवेळ ठीक आहे, ती खराब हाेते थांबते,तीचे काय करायचे हे आपण ठरवताे तीची चावी आपल्याकडे असते.

माणसाचं काय ? त्याची चावी कुणाकडे असते ? पिढ्या सरल्या, शतके सरली तरीही माणसाचे एकटेपण सरले नाही.त्याला वेग हेच कारण असावे का ? विज्ञानाने प्रचंड प्रगती केली ती प्रगती माणसांपर्यंत पाेहाेचण्याच्या आतंच विज्ञानाने अजुन वेगाने प्रगती केली. तरीही अज्ञानाचे लाेट वाहतंच आहेत.त्यालाही वेग हेच कारण असावे का ?

जीवनातील चढ उतारांची जाणिव व्हायला आपणंही खराब हाेण्याआधी थांबायला हवं. आणि त्यावरंही चार पावलं चालायला हवं.

कदाचीत त्यालाच म्हणत असतील जगणं

धन्यवाद ????



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!