दुःख का वाटतं .. …
आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे घटक सुख आणि दुःख आहेत.
प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येऊन गेलेले असतात किंबहुना येत असतात . सुखानंतर दुःख , दुःखानंतर सुख हे रहाटगाडगे चालू असते.
पण आपल्याला फक्त सुख हवे असते दुःख नको असते आणि नको म्हटलं तरी दुःख येतच असते…पण आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखामुळे आपण जर निराश , हताश झालो तर , आपल्या पुढील आयुष्यात सुखे जरी आली तरी ती निघून जातील
आपण आयुष्यभर सुख शोधतो किंबहुना प्रत्येकजण सुखासाठीच प्रयत्न करतो.
अगदी मुंगीलाही दुःख नको असते आपण तर माणूस आहे त्यामुळं हे वाटते ते स्वाभाविक आहे पण सुख ओळखायला शिकलं पाहिजे .
आपल्याला वाटतं नोकरी मिळाली , गाडी , बंगला मिळाला कि सुखी होईन , लग्न झाले कि मुलांच्या जबाबदारीतून पार पडलो कि सुखी होईन पुढे मुलांची शिक्षणे, त्यांची लग्ने केली कि सुखी होईन पुढे नातवंड हे चक्र असेच चालू राहते…
म्हणजे काय तर हे केलं कि सुखी होईन ते मिळालं कि सुखी होईन ; पण खरंच हे सर्व पार पाडले तरी आपण सुखी होतो का?
अगदी महालात राहणारा पंचपक्वान्न खाणारा सुद्धा काही बाबतीत दुःखी असू शकतो आणि साध्या घरामध्ये , झोपडीत राहणारा चटणी भाकरी खाणारा सुद्धा सुखी असु शकतो….
मुलांना आपण सेट करतो….घरामध्ये सोफासेट , डिनर सेट , टि सेट अगदी सर्व सेट सेट पण आपण मात्र शोधत असलेल्या सुखाच्या बाबतीत अपसेटच राहतो…
सतत इतरांशी तुलना केल्यामुळे आपल्याकडे असलेले सुख दिसत नाही . इतरांचे राहणीमान, संप्पती , त्यांची मुलंबाळं इथपर्यंत आपण तुलना करतो. त्यांच्याकडे आहे ते आपल्याकडे का नाही म्हणून दुःखी होतो ….
खरंतर त्यांचे हे वरवरचे बाह्य रूप दिसते पण आतील त्यांचीही खरी वस्तूस्थिती आपल्याला माहिती नसते. कदाचित त्यांच्यापेक्षाही इतर बाबतीत आपण सुखी असू शकतो….शेवटी काय मानलं तर सुख नाहीतर दुःख ….
आपल्या हातून आयुष्यात अनेक चूका झालेल्या असतात , म्हणून झालेल्या चुका आठवून दुःखी होण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे गेलो तर ….भूतकाळ मागे टाकून वर्तमानात जगलो तर आपल्याही जीवनात सुख आहे असे वाटू लागेल.
खरंतर सुख हे, प्रयत्न करून आपल्याला जे मिळालंय त्यात अजून काय चांगलं करता येईल आणि ते केल्यावर जे मिळेल तेच खरं सुख ….
आयुष्यातील प्रत्येक क्षण किमती आहे अमुल्य आहे ….
म्हणून आपल्या आयुष्यात असलेल सुख ओळखून…आनंदाने जीवन जगुया…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!
छान होता
छान
Nice