Skip to content

तिला वेळ देता येत नाही, म्हणून त्या रात्री एक चिट्ठी ठेऊन गेलो.

आयुष्यातली गंमत..


राजकुमार नायक

९९२१५८१४४४


लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला वाटत बायकोचे लाड पुरवावेत ,
पण बर्याचदा परिस्थिती आडवी येते.
माझ लग्न झाल त्यावेळी मोबाईल नव्हते.
(शहरात होते पण खेड्यात रेंज नसायची)
कुणाच्यातरी गाडीवर ड्रायव्हर होतो.
बायको शेतात जायची रोजाने.
अशीच एक दिवस बायको शेतात गेली.
मला घरी यायला उशीर होणार होता ,
निरोप शेजार्याकड ठेवावा अस वाटलं.
पण मनात आल नको त्यापेक्षा एखादी चिठ्ठी लिहुन ठेउ.
(साहित्यिक, कवी असण्याचा तोच फायदा.मनातल्या भावना मांडता येतात.
ती देणगी परमेश्वर प्रत्येकाला देत नाही.
त्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभार.)
एक कागद घेतला.
चिठ्ठी अशी होती,

प्रिये,
खरतर शब्द सापडत नाहीत.
(डोळे भरुन आले.
अन् दोन थेंब आसवांचे टपकन कागदावर पडले)
काय लिहु,
कारण नवीनच आपल लग्न झाल.
हातात हात घालुन चंद्र, चांदण्याच्या गप्पा करायचे हे दिवस .
कुठेतरी दुर फीरायला जाण्याचे हे दिवस.
पाच रुपयाचा एखादा गजरा तुझ्या वेणीत माळण्याचे हे दिवस.
बाईकवर बसुन फिरायला जाण्याचे हे दिवस.
पण तु काळ्या ढेकळात राबतेस अन् मी काळ्या डांबरावर,
काय दुर्देव नाही का?
जर चंद्र चांदण्याच्या गप्पा करायच्या म्हणलं तर
भाकरीच्या चंद्राच काय?
जावु दे ,हेही दिवस जातील एक दिवस आपलाच असेल.
चिठ्ठी लिहिण्याच कारण अस आहे,
मी बाहेरगावी चाललो .यायला रात्र होईल.
काळजी करु नकोस.
तु जेवुन घे.मी आल्यानंतर जेवण करतो.
कदाचीत तु जे स्वप्न पाहिले असतील त्या स्वप्नासारख होत नाही म्हणुन दुःखी होउ नकोस ?
दिवस कधीच सारखे नसतात.
एकदिवस आपलाही येईल.
Miss you
तुझाच..
नावानं राजा असलेला

चिठ्ठी लिहुन दरवाज्याच्या कडीत अडकवली.
मी गाडीवर गेलो.
ईकड बायको शेतातुन परत आली.
दरवाज्याजवळ आली अन् दाराच्या कडीत पांढरा कागद दिसला.
तीने तो घेतला.
कागद उघडुन पाहीला.
अन् प्रिये हा शब्द वाचताक्षणी डोळ्याच्या कडा ओलावल्या.
टपकण दोन थेंब अश्रुचे पडले.
माझ्या अश्रुच्या थेंबावर.
अधाशासारखी चिठ्ठी वाचुन काढली.
ढसाढसा रडायला लागली.
रात्री तीन वाजता परत आलो.
पहातो तर बायको जागी होती.
दार वाजवल तीनं दार उघडलं अन्
गळ्यात पडुन मनसोक्त रडली.
मी लिहीलेली चिठ्ठी तोंडपाठ वाचुन दाखवली.
हात हातात घेतला अन् म्हणाली कुठ शिकलात हो सगळ.
तुम्ही लिहीलेली चिठ्ठी हजारदा वाचली पण मन् भरलच नाही.
घाळजाला घट्ट बिलगुन एवढच म्हणाली अहो दिवस सारखे नसतात.
बदलत असतात.
दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था नसतांना आज जेंव्हा दोनवेळ पोटभर जेवतो तेंव्हा ते शब्द आठवतात.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण अजुनही काळजात जपुन आहे.

मित्रहो,
मी रोज उलगडणार आहे.
माझ्या आयुष्यातल्या सुखातल्या, दुःखातल्या अशा काही काळजात ठेवलेल्या सोनेरी क्षणांना.
आपल्याला हा लेख आवडला का नाही नक्की कळवा.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!