Skip to content

‘आई’ पणात तिच्या दबलेल्या बेहिशोबी इच्छा-आकांशा!!

आईला बाई (स्त्री)म्हणून समजून घेताना….


श्री कांबळे


आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर…
आभाळाचा कागद आणि समुद्राची शाई…
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी….

हे ऐकत ऐकत च मोठा झालो. पण आई ही आई च्या आधी बाई असते हे कळायला लग्न व्हावं लागतं हे दुर्दैव..
ज्याला लवकर लवकरात आई चं बाई पण कळतं तो खरंच नशीबवान…

आई म्हणजे हक्काचा माणूस ज्याच्यावर अधिकार गाजवण्यासाठी आपला जन्म झालाय असा अलिखीत करार आहे या आविर्भावात आपण सगळे जण असतो. एक बाई म्हणून तीच स्वतंत्र अस्तित्व असतं हे आपण मान्यच करत नाही . कारण आपल्या लेखी (भले आपण शिक्षणामुळे स्वतःला कितीही पुरोगामी म्हणू ) बाई म्हणजे दुबळी, बाई म्हणजे गुलाम,बाई म्हणजे उपभोग्य वस्तू आणि बरच काही…

आई म्हणून भले ती किती ही मन मारून राहत असेल,सगळ्यांच्या सुखात आपलं सुख शोधत असेल,आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असेल पण ती देखील आपल्यासारखी इच्छा आकांक्षा असणारी बाई (स्त्री)आहे याचा आपणला विसर पडतो किंबहुना आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो…

खरंच आई ला
हॉटेल मध्ये जेवायला आवडत नसेल का?
थिएटर मध्ये जाऊन फिल्म बघायची इच्छा होत नसेल का?
निवांत खुर्ची मध्ये बसून चहा प्यावा वाटत नसेल का?
मैत्रिणी जमवून फिरायला सोडा निदान गप्पा माराव्या वाटत नसतील का?
तिला विचारून निर्णय घ्यावा असं वाटतं नसेल का?
मोठ्यानं हसायचं सोडा पण हळू आवाजात गाणं तरी गुणगुनावं वाटत नसेल का?

अशा किती तरी का? ची उत्तरे तिने आई पणात लपवलेली आहेत.

म्हणून आई असो नाही तर ताई…त्यांना बाई (स्त्री)म्हणून समजून घेवूया……

(“बाई “ही तिच्या पुरुष प्रधान संस्कृती मधील दुबळी ओळख बदलुया. आई पणाच्या ओझ्या ((ओझं म्हणाण्या मागं कारण पण तसच आहे. बाई एकदा आई झाली की तिच्या इच्छा आकांक्षा, भाव भावना यांचा तिला आपण विसर पाडायला भाग पाडतो.. ))खाली तिच्यातील बाई गुदमरायला नको यासाठी प्रयत्न करू..)



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!