Skip to content

‘व्हाट्सऍप’ मुळे जगण्यातला जिवंतपणा हरवतोय??

Smiley मध्ये हरवलेला संवाद….


श्री कांबळे


सध्या मानवाला अन्न ,वस्त्र ,निवारा याहून अधिक गरजेची गोष्ट कुठली? या प्रश्नाचे मेंदूला अजिबात ताण न देता सहज देता येणारे उत्तर Whatsapp…

माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपला आवाज दूरपर्यंत कसा पाठवता येईल या जिज्ञासेपोटी फोन चा शोध लावला. एखादी जादू वाटावी इतके कुतूहल होते फोनचे. आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या माणसाचा आवाज कानात कमी आणि काळजात अधिक जायचा…

landline-ते- मोबाईल हा प्रवास माणसाने काही वर्षात पार केला. इंटरनेट मुळे तर जग अगदी जवळ आले. फेसबुक च्या तुलनेत उशीरा चालू झालेले पण हृदयाच्या ठोक्या सारखे भावनांची धडधड करणारे Whatsapp आले आणि कधी आपल्या भावनांचा ताबा घेऊन बसले कळले सुद्धा नाही…

सुख दुःखाचा असा एकही क्षण नाही ज्याचे प्रकटीकरण Whatsapp वर करता येत नाही. सण,वाढदिवस,नवीन वर्ष,अगदी श्रद्धांजली काहीही असो तुम्हाला Whatsapp वर साजरी करता येते.(कॉपी- पेस्ट – forward)

मित्राचा वाढदिवस समजू शकतो पण बायको- मुलं
याच्या वाढदिवसाला फक्त “स्टेट्स” ठेवले म्हणजे काम झालं अशी नवी संस्कृती उदयास आली आहे.

एकाच घरात राहणारे नवरा, बायको, मुलं त्यांच्या त्यांच्या
असंख्य व्हॉटसअप ग्रुप शी जोडलेली दिसतात(काही 100 मेंबर असलेल्या ग्रुप चे admin पण आहेत) पण घरात मात्र दुरावलेले असतात.

जेवण खायच्या आधी ग्रुप वर फोटो टाकणे हे राष्ट्रीय कर्तव्य झाले आहे. दिवाळीचा फराळ, संक्रांती चे तिळगुळ यांचा तर वैताग येतो साखर नसताना डॉक्टरकडे जाऊन चेक करावी वाटते..

“सगळ्या भावना बोथट झाल्यात
संवाद हरवला आहे
जिव्हाळा कमी झाला. ”

मान्य काळाबरोबर चालले पाहिजे पण भावना,काळजी,प्रेम,जिव्हाळा,आधार च नसेल तर काळाच्या पुढे तरी जाऊन काय फायदा…….



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!