Skip to content

तुम्हाला आलेला feel तुमच्या पार्टनरला येईलच असं नाही, तुमच्या पार्टनरच्या feelings स्वीकारा.

तुम्हाला आलेला feel तुमच्या पार्टनरला येईलच असं नाही, तुमच्या पार्टनरच्या feelings स्वीकारा.


मेराज बागवान


पार्टनर म्हणजेच आयुष्याचा जोडीदार.ह्या लेखात आपण जोडीदाराविषयी,म्हणजेच पती-पत्नी यांचे नाते याविषयी पाहणार आहोत.लग्न हे एक प्रेमळ बंधन असते.जिथे प्रेमाबरोबर अनेक गोष्टी असतात.जसे की ,कमिटमेंट, जुळवून घेणे आणि समजून घेणे.ह्या गोष्टी जर का नसतील तर त्या लग्नाला अर्थच उरत नाही आणि ते नाते देखील टिकत नाही.लग्न दोन व्यक्तींचे असते.त्यामुळे एकाने दुसऱ्याची साथ दिली तर आणि तरच ते चिरकाल टिकते.संसार दोघांचा असतो.पण एक गोष्ट देखील विचारात घेणे गरजेचे असते. ती म्हणजे तुमच्या जशा भावना असतील तशाच तुमच्या पार्टनर च्या असतीलच असे नाही.तुम्ही जसे feel करतात तसेच feeling तुमच्या पार्टनर चे असेलच असे नाही.कारण सहजीवन जरी असले तरी देखील व्यक्ती मात्र दोन असतात आणि दोघांचे व्यक्तिमत्व वेगवेगळे असते.म्हणूनच ,’तुम्हाला आलेला feel तुमच्या पार्टनरला येईलच असं नाही, तुमच्या पार्टनरच्या feelings स्वीकारा.’

पती ला फिरायला आवडत असते.adventurous गोष्टी करायला त्याला आवडत असतात.आणि तशा गोष्टी केल्या की त्याला एक वेगळेच feeling येत असते.आणि म्हणून तो त्याच्या पत्नी ला देखील वारंवार सांगत असतो,”की तू पण चल जग फिरायला,प्याराजम्पिंग करायला”.पत्नी ला ते तितकेसे आवडत नसते,पण एक change म्हणून आणि पती चा आदर म्हणून ती ते करते देखील.पण तिच्या पती ला जसे feeling येते तसे तिला येत नाही.आणि मग पती म्हणतो,”कसं ग तुला काहीच आवडत नाही”.पण खरे तर पती ने इथे पत्नी च्या आवडीचा आदर केला पाहिजे.आणि तिला जे वाटते ते स्वीकारले पाहिजे.”तुला हे आवडत नाही,ते आवडत नाही अशी तक्रार करू नये”.

‘से-क्स’ लग्न जीवनातील सर्वात मोठी भूमिका बजावणारी गोष्ट.सेक्स ही भावना देखील अगदी नैसर्गिक आहे.पण त्यात कधी पत्नी ला वाटते,”ह्याला काही वेगळे असे करूच वाटत नाही.काही रोमँटिक पणाच नाही ह्याच्यामध्ये”.तर कधी पती ला पण वाटत असते,”हिला काही feel होतंय की नाही,काही रस वाटतोय की नाही”.सेक्स ही खूप नाजूक स्पर्शात्मक भावना आहे.कधी कधी सेक्स च्या माध्यमातून अनेक भावना एकमेकांपर्यंत पोहचवता येतात.पण हे करीत असताना,पती-पत्नी दोघांनी स्वीकारले पाहिजे की,”मी जे feel करेन तेच माझी/माझा पार्टनर पण करेल असे नाही”.त्यामुळे एकमेकांच्या feelings मोठ्या मनाने स्वीकारायला हव्यात.एकमेकांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात,कोणतीही जबरदस्ती न करता.किंबहुना दोघांनी एकमेकांना थोडा वेळ द्यावा,स्पेस द्यावी.

लग्न झाले की फक्त सहजीवन सुरू होते असे नाही.अनेक जबाबदाऱ्या येतात.आणि ह्या जबाबदाऱ्या काही एकाच्या नसतात.तर दोघांनी देखील त्या वाटून घ्यायच्या असतात.मग त्यामध्ये मुलांच्या जबाबदाऱ्या असतील,आर्थिक जबाबदाऱ्या असतील किंवा मग कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील. तसेच ह्या जबाबदार्यानबरोबरच पती आणि पत्नी ह्यांचे स्वतःचे देखील एक आयुष्य असते,हे देखील विसरून चालत नाही.स्वतःचे छंद, आवडी-निवडी असतात.आणि ह्याचा आदर करता आला पाहिजे.मला जे आवडेल तेच माझ्या नवऱ्याला आवडेल असे नसते. कोणी कोणाला dominate करण्याचा प्रयत्न करू नये. ‘प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा प्रथम एक माणूस म्हणून स्वीकार करायला हवा’.मग पुढची नाती आपोआप जपली जातील.

पती ला जर ला वाचनाची,लेखनाची आवड असेल तर पती ने त्या गोष्टीविषयी आदर ठेवायला हवा.तसेच पती ला त्यासाठी प्रोत्साहन देखील करायला हवे. तसेच पत्नी ला समजा नृत्य आवडत असेल तर तिला ते पती ने करू दिले पाहिजे,त्याने तिची ही आवड जपली पाहिजे.अशा प्रकारे प्रत्येक पार्टनर ने आपल्या पार्टनर च्या feelings ची काळजी घेतली पाहिजे.नाहीतर होते काय, एकमेकांच्या आवडी-निवडीत देखील उणी-दुणी काढली जातात.पण असे न करता एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर करता आला पाहिजे आणि फक्त आदरच नाही तर तो मनापासून स्वीकारता देखील आला पाहिजे.फक्त हे दोन्ही कडून व्हायला हवे.

पती-पत्नी एकत्र आयुष्य जगत असतात. पण आयुष्याविषयी चा दोघांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो.काही ठिकाणी तो एकच असतो.जसे की ,’ डॉ.प्रकाश आमटे-डॉ.मंदा आमटे’,दोघांनी आयुष्याचे एकच ध्येय ठरविले आहे आणि एकमेकांची अखंड साथ देत ते स्वतःच्या ध्येयासाठी जगत आहेत.पण जरी पती-पत्नी दोघांचा दृष्टिकोन निराळा असेल तरी काही अडचण नसते,जर दोघे एकमेकांसोबत कायम असतील तर. पण जर एक जण म्हणत असेल ,”मला एकांत च आवडतो,तुला जे काही करायचे ते कर ,मला काही विचारू नकोस” तर ह्याला देखील काही अर्थ नसतो.स्पेस जरूर द्यावी.वेळ जरूर जाऊन द्यावा.पण इतकाही नाही, की ,एक दिवस नातेच संपुष्टात येईल.

आपल्या पार्टनर च्या feelings जरी आपल्या पेक्षा वेगळ्या असतील तरी त्या ऐकणे खूप महत्वाचे असते. आणि अमुक एका गोष्टींमध्ये मी तुझ्या सोबत असेन कायम हा विश्वास दाखवणे देखील तितकेच जरुरी असते.तुमचा पार्टनर ला नेहमी तुमच्या बद्दल ”आपलेपणा” वाटला पाहिजे.तुमच्याविषयी विश्वास आणि आधार वाटला पाहिजे.आणि हे feeling तेव्हाच येईल जेव्हा ,दोन्ही कडून एकमेकांच्या भावना जपल्या जातील,एकमेकांना समजून घेतले जाईल.

लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे,आपुलकीच्या,आपलेपणाच्या आणि समजूतदारपणाच्या भावनेने लग्नाचे हे नाते जपले पाहिजे.एकमेकांचा प्रत्येकवेळी विचार करायला हवा. एकमेकांच्या इच्छा आणि अपेक्षा योग्य रित्या हाताळता याव्यात.बस इतकेच…..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!