Skip to content

विवाहबाह्य संबंध ही हल्ली फॅशन बनत चालली आहे !

विवाहबाह्य संबंध ही हल्ली फॅशन बनत चालली आहे.


शहरात या विकृतीने थैमान मांडले आहे.रोज टीव्ही सिरियल्स आणि वाट चुकलेल्या मित्र मैत्रिणींचे अनुकरण करत आपण आपला आत्मा आणि मने गहाण ठेऊन जे पाऊल उचलत असतो ते कितपत योग्य हे एकदा स्वतःच्या मनाला विचारायला हवे.

ज्या पतीशी आपण सात जन्म एकत्र राहायची वचने अग्नीच्या साक्षीने देतो,गळ्यात पतीच्या नावाचे मंगळसूत्र आजन्म घालतो,भाळात सौभाग्याचे लेणे म्हणून कुंकू लावतो या साऱ्या प्रथा मूर्खपणा असतो का ?

खुशाल हल्ली स्त्री व पुरुष दोघेही आपल्या पती/पत्नी व्यतिरिक्त एखादे असावे ही भावना मनात ठेवतात.

प्रेम हे गोंडस नाव देऊन आपण या विकृती लपवत असतो.

लग्नापूर्वी कित्येकांनी प्रेम या शब्दाचा अर्थ न समजता ज्या सेक्स च्या मैफिली रंगवल्या असतात त्या सुद्धा प्रेमाचा घेतलेला अतिशय घाणेरडा अर्थ होय.पण लग्नापूर्वी झालेले जे काही असेल ते लग्नाच्या अग्नीत जाळून खाक केले पाहिजे.

पतीच्या आयुष्यात मधुचंद्राची रात्र ही त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र असते,लग्नापूर्वी केलेल्या चुकांमुळे आपण आपल्या पतीसाठी काय शिल्लक ठेवलेले असते व पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी काय शिल्लक ठेवलेले असते हे एकदा मनाला विचारणे गरजेचे आहे.

नाते टिकवायचे असेल तर जे आहे ते स्वीकारणे याशिवाय पर्याय नसतो,पण प्रत्येकाचे मन इतके मोठे असेलच असे नसते.

एखादा पुरुष जगातील सर्वात मोठी दुःखे सहन करू शकतो पण आपल्या पत्नीची गद्दारी कदापि नाही.

हल्ली मात्र पतीसमोर राजरोजपणे मित्रांशी होणारे चॅटिंग ही कुठली संस्कृती म्हणावी..?
जे स्त्रियांबाबत तेच पुरुषांच्या बाबत.

एका मैत्रिणीने असाच एक मेसेज केला म्हणून हे लिहू वाटत आहे.

लग्नाच्या अगोदर तिचा एक मित्र होता.चांगला मित्र होता.लग्नानंतर ती जेव्हा संसारात रुळते तेव्हा त्याला अनुभूती होते की तिच्यावर त्याचे प्रेम आहे.तिचा प्रेमप्रस्ताव तो तिला कळवतो आणि ती भाबडी मुलगी सुद्धा त्याच्या या प्रस्तावाने बधिर होऊन जाते…!

ते हल्ली झुरतात म्हणे एकमेकांसाठी….तिने तिच्या मनातील हे द्वंद्व मला कथन केले….क्षणभर मी सुद्धा बधिर झालो व विचारांच्या प्रवाहात वाहू लागलो….

कुठे निघालोय आपण.जगात ज्या भारतीय विवाह संस्कृतीचा आदर्श दिला जातो ती संस्कृती टिकवण्याचे काम हे प्रत्येक विवाह झालेल्या पती व पत्नीचे असते.भोगप्रवृत्ती हल्ली समाजात फारच बळावत निघालेली आहे.

मला माहिती नाही त्या मुलाचे लग्न झाले आहे किंवा नाही पण त्याच्या पत्नीला जर कोणी असा प्रस्ताव ठेवला असता तर ?

पत्नी राहूदे बहीण,भाची,पुतणी.. कोणत्याही नात्यातील विवाहित स्त्री ला जर कोणी पुरुष असा प्रस्ताव ठेवत असेल तर तो त्याला चालेल का ?

याचे उत्तर जर होय असेल तर त्याला या गोष्टीची माफी मी स्वतः नक्की देईन…..

प्रेम या नावाखाली स्वतःची पत्नी कोणी दुसऱ्याशी वाटू शकतं नाही हे जर खरे असेल तर स्वतः तसे का वागावे ?

माणसाचे मन मोठे विलक्षण आहे..जोवर दुसऱ्याच्या बाबतीत घडते तोवर आपल्याला काही वाटत नाही,आपल्यासोबत घडले तर मात्र डोक्याचा तीळपापड…

माणूस हा स्वतःसाठी वकील आणि दुसऱ्यासाठी न्यायाधीश असतो..स्वतःच्या हजर चुका मान्य दुसऱ्यांनी केली तर त्वरित टोकाचा निर्णय….

प्रत्येक विवाहित स्त्री च्या आयुष्यात लग्नानंतर पहिले व शेवटचे प्रेम जर पती आणि पतीच्या आयुष्यात तिची पत्नी असेल तर जीवनासारखी सर्वात सुखाची गोष्ट दुसरी कोणती असेल…?

प्रेमच करायचे असेल तर ते त्यागात आहे…भोगून व्यक्त करतात ते प्रेम नव्हे तर प्रेम या पवित्र नावाला दिलेली सर्वात घाण शिवी असेल असे माझे मत आहे….

मी त्या व्यक्तीला या लेखाद्वारे विनंती करेन…तुझे जर तू म्हणत असशील तसे त्या व्यक्तीवर खरे प्रेम असेल तर तिला तिच्या पतीसोबत सुखाने राहू दे…त्यागातला आनंद मिळव..बघ जमते का…हा निसर्ग तुला तितकेच निस्वार्थी व पवित्र प्रेम परतफेड म्हणून देईल….

त्या स्त्री ला विनंती…. तुझ्यासाठी व तुझ्या कुटुंबासाठी दिवसभर जो राबतो त्याच्या नजरेत तुला खरे प्रेम दिसत नाही ?

जे मंगळसूत्र तू अभिमानाने घालतेस तो केवळ दागिना नाही तर तू तुझ्या पतीला दिलेले ते वचन आहे…

जे लिहल आहे ते समजते का बघा…जे लिहले नाही ते सुद्धा समजवून घेण्याचा प्रयत्न करा…तरीही नाही जमले तर या नात्याला किमान “प्रेम” या उदात्त आणि पवित्र नाव मात्र देऊन त्याची अवहेलना मात्र करू नका.

धन्यवाद !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

45 thoughts on “विवाहबाह्य संबंध ही हल्ली फॅशन बनत चालली आहे !”

  1. Ak mulgi aani mulga premat asatat kahi mahinech jhale asatat nantar tichya gharchyana samjte ,tiche gharche aka veglyach mulashi lagn laun detat,ti suddha tadjod karte aani 22 varsh sansar chalu asto.ticha navryala daruch vyasan kam dhad karat nahi satat bhandan,ake divshi Achanak tila tich pahil prem aathvte tila rahvat nahi tyachyashi bolavas vatt pan kuthe shodh lavaycha pan tarihi ti tyala bhette aani mg tyana aatatari aktra jagta yeil asach vatat rahat tich lagn houn 22varsh jhali 2 mul aahet,thach lang houn 21 varsh jhali tyala 3mul aahet pan tyana aata tari jagta yeil ashi apeksha aahe ashyat kay karav tine yach uttar aahe ka.radha Krushna ch prem pavitra aahe mg ya premach kay he prem nahi tar ha vyabhichar asach na baich man konich olkhu naye ka ti dagadachi aahe

  2. “भारतीय विवाह संध्येचा इतिहास ” हे पुस्तक जरुर वाचावे.

  3. है लेख खरोखरच उलेखनीय आहे, कारण आज बऱ्याच लोकांची मानसिक विकृति वाढत चाललेली आहे. कारण वेब, tv वरील serial, net.

  4. Vrushali Jagtap

    आपण सतत आपल्या संस्कृतीचे गोडवे गात असतो मग या घाण व वाईट अपप्रवृत्ती चा आपण विरोध केलाच पाहिजे तो किंवा ती दोघांनी पण जोडीदाराला फसवून विश्वासघात करणे चूक आहे
    काही लोक समर्थन च कसे करु शकतात पाश्चात्य भोगवादी विचार आपल्या देशात आवडायला लागले का ❓ मग ऋषींनी स्वत:चे आयुष्य पिढ्यानपिढ्या खर्च करुन कुटुंब व्यवस्था उभी केली त्याला मोल नाही का ❓

  5. पण तिचा पति तिला त्रास देतोय जर दुसरा तिला आधार देत असेल तर त्यात गैर काय आहे हेच पुरूषाने केल तर चालत आणी बायकांनी केल तर गैर वाह रे संस्कृती

  6. Meghana Kalekar

    Ex Affairs r very bad …honest rahun marriage continues krne hach khup motha Apradh ahe.
    Cheating krt ektra rahnya peksha separate vhave.
    Husband ex affairs 2, or more women sobt krun wife la suicide krnyachi dhamki deto. Already husband, wife hv special child ..n wife devoted her life to build up her life. N also husband s relative support krtat husband la. Husband not gv minimum respect to wife ..she also look after husband’s relatives..
    Wife’s life like Garbage……
    Kamaturana Bhayam n Lajja…

  7. Ha lekh khup chan ahe pan mala hal lekh opposite krun vachayla khup avadel mins mulga chukicha vagtoy Ani mulach lgn zalel ahe asa

  8. लेख वास्तववादी आहेच…परंतु आपल्या आजूबाजूला जे लोक प्रेम या गोंडस नावाखाली जो व्यभिचार करतात त्यांना या गो्ष्टी पटत नाहीत..जर कोणी समजावायचा प्रयत्न केलाच तर त्यांनाच असे लोक वेडात काढतात. माझ्याही काही मित्रांची लफडी आहेत. त्यांना यात काहीच वावगं वाटत नाही. एकमेकांसाठी झुरत असतात. बायको , नवरा , मुलं , संसार असूनही त्यांना प्रेम मिळत नाही. असे त्यांचे बाहयसंबंधांना समर्थन असते .यासाठी हा प्रकार त्यांना योग्य व नैतिकच वाटतो. मला खूप रागही येतो आणि स्वत:ची लाजही वाटते. कारण 40 वर्षांच्या माझ्या आयुष्यात मी अजूनही स्री स्पर्श केला नाही. मुलींच्या अवास्तव अपेक्षांमुळे लग्नासाठी सतत नकार …मित्र म्हणतात , चल एकदा , अनुभव घे..पण माझं धाडस होत नाही. मग मी मुर्ख ठरतो,माझ्या पार्श्वभागात दम नाही, अशी अवहेलना नेहमी अनुभवतोच आहे. बाहय संबंधांमुळे उदया जर माझ्याच बाबत असं काही घडेल याची भीती तर वाटतेच. त्यापेक्षा लग्न न करणेच योग्य आहे की काय असं वाटतंय. विवाहबाहय संबंध हे चालतच राहणार..जोवर यांचं समर्थन करणारे असणार ..जरी मी प्रामाणिक असलो तरी माझा सोबती आजच्या घडीला माझ्याशी प्रामाणिक असेल का ? हा खरा प्रश्न आहे..नात्यांची ओढ, विश्वास, प्रेम हया सगळया गोष्टी आजकाल अर्थहीन ठरल्या आहेत.

  9. ज्याने कोणी हा लेख लिहिला आहे त्याला माझा सलाम….
    तुम्ही एकदम सत्य माहीती दिली आहे.
    परंतु आजकाल याप्रमाणे कोणिही वागत नाही …..

  10. Purush lagna aadhi 2-3 lafdi karato, 50-60 wela redlight area madhe jaun annand gheto,ani tarihi to charitya wan, ani bai ne ek-2 purusha sobat sambandha thewale tar ti charitrya hin hote , haduheri mapdand kasa chalel jyala apalya baiko che ekahi lafade nako asel tyachi Narco test kara mag samjel tyani kiti diwe lawale te.ani sanskriiti hi doghasathi aahe .

  11. पती पत्नी यांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहणे हे काळाची गरज आहे. यामुळे आपली भारतीय संस्कृती जपली जाईल व पुढच्या पिढीला यातुन बोध घेता येईल.

  12. लेख चांगला पण सद्या तो कालबाह्य होत चालला
    संस्कृती बुडवायला निघालेत सगळे कालच मला कळले
    झेंड्यावर गुलाल वाहने व आगरबत्ती लावने कायद्याने गुन्हा आहे तसा नियम कुंकवाच्या बाबतीत हि येऊ शकतो तर्क
    आसेल सात जन्म हे आंधश्रद्दा आहे व कुंकु लावने साथ फेर्या घेणे म्हणजे आंधश्रद्दा वाढवने म्हणून यावर काहि नियम येउ शकते झेंड्या सारखा आता झेंडा वंदन करतांना गुलाल वाहुन नारळ फोडन्यावर बंदि आली

  13. jar tya strila premachi kimmatach nasel tar tyane asech ayush jagayche ka samaja baherkuthe tyala have tase prem milale tar prem karne chuk kashi asel

  14. ya doghanna tyanchya maryadet rahil pahije
    ek divas ayushyamadhye kharab ala mhanun pay chukicha takun nahi chalnar
    vichar kara …ani sansar sukhacha kara
    shevti kahi goshtincha tyag mhanjech prem …..

  15. हा लेख आणि प्रतिक्रिया वाचून मला असे वाटते की समाजात फार प्रमाणात भोगवाद व चंगळवाद खूप वाढला आहे. असा समाज पुढील पिढीसमोर कोणता आदर्श ठेवणार.

  16. Exactly नात्यात ओलावा दिन्ही बाजूनी असावा लागतो , तसेच नुसत सोबत रहाण महत्वाच नसत तर सहवास दोघांचा असावा लागतो ….सर्वप्रथम लेखकाचे अभिनंदन कि त्यानी खुप सुंदर असा लेख सर्वांसमोर मांडला … जगात खुप कमी लोक असतात जे आपल्या जोडिदाराच्या चुका मागे टाकत सर्व गोष्टी माफ करून नव्याने सुरू करतात …. आणि जोडिदाराच्या सर्व चुका माफ करुन त्याच्यावर जिवापाड प्रेम करण प्रत्येकाला जमत नाही….. आणि ज्याने केल तोच

  17. आधुनिक काळात व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. यामध्ये स्त्री पुरुष दोघेही आहे. आजकाल लग्न पसंतीने होतात. त्यामुळे नापसंतीने लग्न होण्याचे प्रमाण खूप कमी. आणि त्यात आता पैसा व नोकरी महत्वाची पहिली जाते व यात पालकांसोबत मुली पुढे आहेत.
    आज मालिकांमधून जे चित्र, विचार दाखवला जात आहे त्याच अनुकरण आपला समाज करत आहे. त्याच प्रमाणे माणसाच्या आपल्या आवडीवरील श्रद्धा कमी होत आहेत.
    हे प्रमुख कारण आहे कि समाज मध्ये अनैतिक संबंध वाढत आहेत.

  18. मला असे वाटते,असे विवाहबाह्य संबंध ठेवने हे चुकिचेच आहे.एखादि स्त्री जेव्हा असे वागते त्यामागचे कारण म्हणजे,आपला नवरा आपल्याला टाईम देत नाहि,हौस पुरवत नाहि,आपले पुर्वीसारखे कौतुक करत नाही वगैरे वगैरे.पण तीला या गोष्टीचे सुद्धा भान असायला पाहिजे की आपला नवरा जे काही कष्ट करतो,कामानिमित्त जास्त वेल बाहेर असतो,तो या स्पर्धेच्या युगात आपली नोकरी,आपला व्यवसाय आणि सोबतच आपल्या घरातील गरजा पुर्ण करण्यासाठी धडपडत असतो.तो दमतो,तो सतत आपल्या घरच्यांचाच सुखाचा विचार करत असतो.तो फक्त व्यक्त होत नाहि,कारण एक म्हन आहे “मर्द को कभी दर्द नही होता”!
    . आणि
    पुरूष असले तर अशा पुरूषांनी आपल्याला आपल्या पत्नीमध्ये काय कमतरता दिसायला लागते की ते असे विवाहबाह्य संबंध ठेवतात.ती सुध्दा घरासाठीच राबते ती सुध्दा मन मारून घरातील सर्व कामे करते,मुलांच संगोपण,येणाय्रा जाणाय्रा पाहुण्यांचा,नातेवाईकांचा पाहुणचार,घरातील जेष्टांची देखभाल तीच करते.हे सर्व करताना ती स्वताला किती वेल देते?या सर्व गोष्टी करताना ती स्वताच सौंदर्य ,आरोग्य पणाला लावते,या तीच्या स्वताकडील दुर्लक्षामुले ती सुंदर दिसत नसेल किंवा नवीन जनरल नोलेज ठेवन्यात कमी पडत असेल,तर या गोष्टीला कारणीभुत कोण,पुरूषच ना.
    म्हणुन मला असे वाटते नवरा असो वा बायको दोघांमध्ये संवाद- वाद झालाच पाहिजे,त्यामुले दोघांनाहि एकमेकांचे मनात काय चालले असेल,प्रोब्लेम काय आहेत हे समजेल.नवरा घरासाठी काय काय करतो हे बायकोला समजेल,तसेच बायको घरासाठी काय काय करते हे नवर्याला समजेल.
    कारण गेले ते दिवस मनातील ओलखण्याचे,आता संवाद झालाच पाहिजे.संवाद झालाच नाहितर बाहेरील व्यक्ती बरोबर वाटतो किंवा वाटते, आपले दुख्ख समजनारा वाटतो किंवा वाटते आणि तो किंवा ती बाहेरील व्यक्ती आपला आर्थिक किंवा शाररिक उपभोग घेते किंवा घेण्याचा प्रयंत्न करते.

  19. Purush aaj kal ase mhi karat te Bajiroa chya kalapasun ase kartat hyala aapan Premch pratik mhantoy……..pan ata Stri karty karan tu shikali baher padali…. tula jagnyasathi kay havay he tila samaju laglay……ashya veli jar tine tiche sukh baher shodhate……stri kadhich sharirik sukhasathi baher jat nhi ti fkt Prem Swabhinam japnara kivha tichya matana kimmat denar bhetla tar ti tyala aapal sarvas dete kivha ak changla mitr manate……purush karto tevha chan pan stri ne karu nye. Hech mahachay lekhakala

  20. मलाअजिबात आवडला नाहि हा लेख नवर्‍यांनि नवरे शाहि गाजवलेलि चांगल आणि बायकाेला गुलाम वागणुक दयायचि हि भारतिये परंपरा का

  21. Aplya life partner sobat eknisth asane ya peksha atmik samadhan konatach nahi,jar tumchi wife or husband ch affair asel tar tumhi swata tya vyaktila etk prem dyayala pahije jene karun tyanch laksh dusarikde jauch naye. Samorachi vyakti jar honest asel tar itk prem,sukh Ani Anand milalyavar konata vyakti kadhich konala dhoka nahi deu shakat……

  22. Sorry, Pramanik pana donhi bajune asla pahije fakt ladies kadunch apeksha karnyat chuk aahe. Aaplya kade saraas pane june lok mhan bolataat ki “Gharat jevan milale aste tar Purush baher kashala jaaiel ” mag hich same situation Ladies sathi ka manta nahi . Tine ka aaple aayushya adjust karave asha navryasathi jo vaiet prasangi tila sath n deta sodun jaato . Aaj ladies ,Gents Samanataa aahe mag kuthe geli hi samantaa asha veli . Stri chya babtit buddhi gahan thevli jaate ka . Stri la Seeta banaylaa sangtaa Aadhi tyala Ram banaylaa sanga.

  23. Manish Nerurkar

    Vivahbahy sambandh he anaitik ahetach pan kondmara karun jagnyat kay arth ahe…natyache mahtav donhi side ne asle pahije .Navrayne kuthehi tond marle tari chalel he chukiche ahe….Stri la jagnyacha purn adhikar ahe….man marun jagnyat kay arth ahe….Perm he khup chan gosht ahe pan nuste premane man bharat nahi Sahvas tar lagtoch

  24. I think women’s vr khup tika kelya ahet…. Men’s che pn affairs astat lagnantr…. Tyavar on jara discuss kela aste tr bar zal asta…. Karan tali eka hatane vaajat nahi……

  25. Ya lokanchya comment bgun aapla samaj kiti dhasltoy yachi janiv hote….akhada mulga kivha mulgi pasand naslyas lagnch ka krayche tyachyshi…ani ata engagement nantr hi bryapaiki vel dila jata doghana akmekana samjun ghyayla..aani jamatch nsel tumch tr legal procedure ahech na aaplyakde..ugach premachya navakhali unmadach samarthan kru nka

  26. छान! प्रेम या गोंडस नावाखाली भोगवाद केला जातो. नाती फक्त गोड बोलून जपली जात नाहीत तर त्यासाठी त्यागही करावा लागतो, प्रामाणिक असावे लागते, तो ती चुकत असेल नात्यात काही कमतरता जाणवत असेल तर एकमेकांना समजून घेऊन नाते कसे सुरळित होईल हे जमवले पाहिजे. समजुतदार पणा नसेल तर प्रेमविवाहात पण घटस्फोट होतात आणि ते वारंवार ही होऊ शकतात. आई बाबा ना मूल अथवा मुलांना आईबाबा आवडत नाही म्हणून दुसऱ्या कोणाला दत्तक घेणे वा आईबाबा मानणे योग्य असु शकते का? या नात्यातही वाद होतात पण ते कसे शेवटी एकमेकांना सांभाळतात आपले कर्तव्य नात्यात टिकवतात हे जाणले पाहिजे. नाहीतर आहेत निराधारांसाठीचे आश्रम, नात्यात प्रेम असते तशी जाणीवही असावी लागते नाहीतर स्वतःला आशा आश्रमात भरती व्हावे लागते किंवा आपल्या कोणाला तरी आपल्यामुळे व्हावे लागेल. जोडीदार चुकत असेल तर समजावण्याचा सात जन्माच्या जोडीच्या शपथे साठी प्रामाणिक प्रयत्न किमान सात वेळा तरी करा. प्रत्येक नात्यात गोडवा हा कोणाच्या तरी एकाच्या त्यागाशिवाय येत नाही. पारमपारिक कुटुंब संस्कृती योग्य आहे हेच म्हणेल.

  27. छान! प्रेम या गोंडस नावाखाली भोगवाद केला जातो. नाती फक्त गोड बोलून जपली जात नाहीत तर त्यासाठी त्यागही करावा लागतो, प्रामाणिक असावे लागते, तो ती चुकत असेल नात्यात काही कमतरता जाणवत असेल तर एकमेकांना समजून घेऊन नाते कसे सुरळित होईल हे जमवले पाहिजे. समजुतदार पणा नसेल तर प्रेमविवाहात पण घटस्फोट होतात आणि ते वारंवार ही होऊ शकतात. आई बाबा ना मूल अथवा मुलांना आईबाबा आवडत नाही म्हणून दुसऱ्या कोणाला दत्तक घेणे वा आईबाबा मानणे योग्य असु शकते का? या नात्यातही वाद होतात पण ते कसे शेवटी एकमेकांना सांभाळतात आपले कर्तव्य नात्यात टिकवतात हे जाणले पाहिजे. नाहीतर आहेत निराधारांसाठीचे आश्रम, नात्यात प्रेम असते तशी जाणीवही असावी लागते नाहीतर स्वतःला आशा आश्रमात भरती व्हावे लागते किंवा आपल्या कोणाला तरी आपल्यामुळे व्हावे लागेल. जोडीदार चुकत असेल तर समजावण्याचा सात जन्माच्या जोडीच्या शपथे साठी प्रामाणिक प्रयत्न किमान सात वेळा तरी करा. प्रत्येक नात्यात गोडवा हा कोणाच्या तरी एकाच्या त्यागाशिवाय येत नाही. पारमपारिक कुटुंब संस्कृती योग्य आहे हेच म्हणेल.

  28. Counsellor Jyotsna Dagale

    काही अंशी हा लेख योग्य ही आहे आणि नाही पण.
    जगातल्या सर्व दांपत्यांना हा सरसकट लागू करता येत नाही.
    विवाह म्हणजे वि + वाह = विकास म्हणजे दुसर्‍यालावाहून घेणे.हाविवाह संस्थेचा खरा अर्थ. परंतु सध्या या अर्थाने विवाह पार पडत नाही. होतो तो व्यवहार. डाॅ मुलगी डॉ ला च दिली जाते. दोघांचे पॅकेज कसे. प्रापर्टी पाहून.. खोट्या प्रतिष्ठेची बळी पडलेली लोक एकत्र येताना दिसतात.
    सगळ्या च जोड्या नाही तशा. पण काही आहेत जिथे खरोखरच बायको ला मोलकरीण बनवून ठेवले जातो. पती ई तिला फक्त भोगवस्तू समजतो. किसी ठिकाणी बायको ही नवऱ्याला पैसे मिळवण्याचे एटीएम समजते. प्रेम पवित्र आहेच त्यात वाद नाही. परंतु आपण लिहिता की प्रेमात जर शारिरीक संबंध येत असतील तर ती शिवी वगैरे… असे असेल तर मग नवरा बायको च्या प्रेमाला प्रेम कसे म्हणायचे?
    खरे तर स्त्री पुरुषाच्या प्रेमात 80% भाग हा प्रेमाचा व 20% भाग हा सेक्स चा ही आहे.
    कायद्याने ही आता live in ला मान्यता दिली आहे. प्रत्येकाला सुख समाधान मिळण्याचा अधिकार आहे. राहिला प्रश्न संस्कृती जपण्याचा त्यात जपण्यासारख्या इतरही खुप बाबी आहेत. इथे मी सरळ सरळ विवाह बाह्य संबंधांचे समर्थन मुळीच करत नाही.परंतु वेळ परत्वे असे संबंध नेहमीच चुकीचे असतात हे ही म्हणणे योग्य नाही.

    कौंसेलर ज्योत्स्ना डगळे, नाशिक
    8830298936

  29. आपण 21व्या शतकात आहोत. स्त्री व पुरुष चांगले मित्र असू शकत नाहीत का? कि स्त्री पुरुष मैत्री करतात ती केवळ extra marital affair साठीच हा चुकीचा समज आहे. त्यांची देखील मैत्री खरी असू शकते. पण ही मैत्री समाजाला तेंव्हाच खरी वाटते जेंव्हा त्यांची फैमिली ती मैत्री accept करते…पण ही गोष्ट आज देखील अवघडच वाटते म्हणून अचानक समोर आलेल्या मैत्रीणीला वा मित्राला ओळख दाखवणे जड जाते आणि तेच कदाचित एकत्र दिसले तर त्यांची मैत्री एक्स्ट्रा मैरिटल अफेयर समजली जाते कारण त्यांचे मैत्री ला महत्व देण्याचे वय सरलेले असते.

  30. सेक्स आणि लग्न याचा काय समंध , लग्न या रोगा मुळे सगळे प्रॉब्लेम आहे ,ओशो लग्न केले म्हणजे काय आप गुलाम झालो का

  31. संगीता नाईक

    विवाह बाह्य संभंध हे नेहमी चुकीचेच का दर्शवली जातात ? बरीच लग्न झालेली नाती अनेक कारणांनी एकमेकांना अनुरूप नसल्याची जाणीव एकमेकांना समजत असते तरीही मन मारून दोघे ही फक्त समाजाला दाखवण्यासाठी संसार करत असतात.
    अशा वेळी त्यांना बाहेरील व्यक्ती आपल्याशी जुळणारी वाटली आणि ते रेलशन मध्ये येतात या कारणांवर विचार का नाही होत. किंवा खरोखरच एखाद्या एकट्या पडलेल्या स्त्रीच्या जीवनात मानसिक आधारासाठी तिला समजून घेणारा पुरुष येत असेल तरीही तिने असे नाते ठेऊ नये का?
    या विषयावर एखादा लेख मिळेल का?

  32. Ajibat changala Nahi ha lekh sorry
    Navara ne baykola molkarin mahnun ghari aanale Tri chalel , tila kimmat Nahi dili Tri chalel , char mansat insults kela tri chalel pn tyachya shi pramanik rahayache bar Ka, mansik Aadhar Nahi dila Tri, sharirik Sukh bhetale Nahi Tri tyachyashich pramanik rahayache br Ka.

  33. The best artical.
    In this they hv given the example of their frnd bt also mentioned that both r same ŕesponsible for it.
    In most of the cases we can also observe that one of the partner is very good in nature caring, no any bad habits bt still other partner for the pleasure or thrill only hv extramarital affair.

    Nice artical

  34. प्रताप

    फक्त मंगल सूत्र नि जगवण्याची ग्यारंटी देणारा म्हणजे नवरा,,त्यासोबत त्याचे वेसनं, मूर्खपणा,जबरदस्ती,मन मानी पणा ,लहरीपणा,मुकाट्याने स्वीकारायचे बरं का

  35. आजच्या तथाकथित दुनियादारी चा नैतिकतेने प्रामाणिक भावनांवर प्रत्येकाने आपापल्याशिच जबरदस्ती करावी हाच संदेश
    स्वतः स्वाभाविक न्यायाधीश बनून या लेखात दिलाय अस वाटतंय का कुणाला?

  36. Rohit Kishor Landge

    केवळ व्यवहार म्हणुन एखादे नाते स्थापित झाले असेल तर त्या नात्यात भावनिक ओलावा किती असेल ???
    जर खरोखरच परस्पर प्रेम असेल तर प्रतारणा करेलच का ???

    केवळ चांगली नौकरी अथवा बिझनेस , उत्तम पाककला , प्रॉपर्टी , साथीदार सेटल असणे या व्यावहारिक तत्वावर जर नाते प्रस्थापित होत असतील तर भावनिक ओलावा त्या नात्यात असणे म्हणजे नशिबच म्हणावे लागेल

  37. खुप छान मांडणी….शेवटी माणसाणे स्वतःशी प्रामाणिक असणं,आणि नात्याने शील जपणं यापेक्षा या जगात सुंदर सुख असुच शकत नाही…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!