Skip to content

जेव्हा आपण शांतता निवडू, तेव्हा पुष्कळ गोष्टींचा निरोप आपल्याला घ्यावा लागेल.

जेव्हा आपण शांतता निवडू, तेव्हा पुष्कळ गोष्टींचा निरोप आपल्याला घ्यावा लागेल.


हर्षदा पिंपळे


सततच्या भांडणाला कंटाळून रमा घर सोडून चालली होती.सतत घरामध्ये पैशावरून, नातेवाईकांवरून काही ना काही भांडणं होत होती.मोठमोठ्याने आरडाओरडा आणि विचित्र असे शब्द तिच्या कानाला नकोसे झाले होते.अक्षरशः वीट आला होता तिला या सगळ्याचा. तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं.शिकता शिकता ती नोकरीही करत होती.परंतु अशा कटकटीमध्ये,गढूळ वातावरणामध्ये तिला तिच्या अभ्यासावर, कामावर लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. अभ्यासावरचा फोकस कमी होत होता.घरामध्ये उठता बसता केवळ वादविवाद असायचे.थोडी म्हणून शांतता नव्हती.तिला शांतपणे हवी होती.आणि म्हणूनच तिने घर सोडून जायचा निर्णय घेतला होता.

घरापासून लांब जायचं म्हणजे सोपं नसतं.सगळं सोडून जायचं म्हणजे तर फारच अवघड असतं.शांतता हवी असेल तर तिला हे सगळं करावं लागणार होतं.घर सोडून जायचं म्हणजे आईवडील, भाऊ बहीण आणि घरासोबत जोडलेल्या असंख्य आठवणी तिला तिथेच सोडून जाव्या लागणार होत्या.

एकतर शांतता नाहीतर त्या वातावरणात काही काळ तरी आयुष्य जगणं…हे दोनच पर्याय तिच्याकडे होते.तिने आधीच शांतता निवडली होती.त्यामुळे तिला साहजीकच काही गोष्टींचा निरोप घ्यावा लागणार होता.आणि हे सगळं तिला माहीत होतं.शेवटी नाईलाजाने तिने घर सोडलं.एका जवळच्या शहरात ती शिफ्ट झाली.कटकटीपासून जरा दूर गेली.तिला हवी तशी शांतता आता मिळाली होती. अभ्यास आणि काम दोन्हीही छान चाललं होतं.

तिला तिच्या काही गोष्टी व्यवस्थित हाताळता येत होत्या.तिचं बिघडलेलं मानसिक संतुलन सुरळीतपणे चालू होतं.पण कुठेतरी तिला घराची ओढ काही स्वस्थ बसू देत नव्हती. घरच्या कडू गोड आठवणी तिला सतत त्रास देत होत्या.पण आता शांतता हवी असेल तर काही गोष्टी कराव्याच लागणार होत्या.

तिने घरचा विचार थांबवून पुन्हा अभ्यासावर/कामावर फोकस केला.जेव्हा जेव्हा आपण शांतता निवडू, तेव्हा पुष्कळ गोष्टींचा निरोप आपल्याला घ्यावा लागतो हे तेव्हा तिला चांगलच जाणवलं होतं.

तर रमा…..आपल्यासारखीच. सततच्या कटकटीला कंटाळून तिने शांतता निवडली. आणि त्यामुळे तिला कित्येक गोष्टींचा निरोप घ्यावा लागला.

आपलही काही वेगळं नाही.

आपणही जेव्हा जेव्हा शांतता निवडू तेव्हा तेव्हा आपल्याही बाबतीत असचं घडू शकतं.प्रसंग कोणताही असो,आपण शांतता निवडली तर कित्येक गोष्टींचा आपल्यालाही निरोप घ्यावा लागेल.

कधी काही आवडीच्या गोष्टींचाही त्यात समावेश असू शकतो.

रमाच्या बाबतीत आपण घराचं,घरातील माणसांशी असलेल्या तिच्या आठवणींच उदाहरण आपण पाहिलं.परंतु अशीच कित्येक उदाहरणं आहेत.

म्हणजे नेहमीच कटकट वगैरे असते असं नाही.काही ठिकाणी फार गोंगाट असू शकतो.एखाद्या ठिकाणी कोणता प्रोग्राम असू शकतो.कुठे लहान मुलं दंगा करत असतील तर कुठे कुणी मोठमोठ्याने बोलत असू शकतं.मग अशावेळेस कित्येकजण शांतता निवडतात.

काहीजणांना मुळातच आवाज,गोंधळ वगैरे आवडत नाही.अशावेळेस शांतता निवडली तर पुष्कळ गोष्टींना निरोप हा द्यावाच लागणार.अगदी सिंपल आहे, लहान मुलांच्या दंगामस्ती पासून लांब गेलात,शांतता निवडली तर त्यावेळी लहान मुलांसोबत वेळ घालवता येणार नाही. त्यांच कोवळं हसणं,बागडणं अनुभवता येणार नाही.एखादा प्रोग्राम खूप छान असेल परंतु शांतते अभावी तुम्ही तिथून निघून गेलात किंवा तिथे गेलाच नाही तर एखादी छान कलाकृती तुम्ही मिस करू शकता.

आणि नेहमीच अशी शांतता हवी असेल तर काही गोष्टींचा निरोप हा घ्यावाच लागेल यांत शंका नाही.

सो..विचार करा.किंवा मग,शांतता केव्हा प्रेफर करायची आणि केव्हा नाही याचं गणित तरी एकदा ठरवून घ्या.काय आहे, हे गणित एकदा ठरलं तर गोष्टी हाताळायला सोप्या जातील. कधी कधी शांततेला महत्त्व द्यायचं की एखाद्या गोष्टीला तेच आपल्याला कळत नाही.

म्हणूनच शांतता केव्हा निवडायची हे एकदा ठरवून घेतलं तर बऱ्याच गोष्टी नक्कीच सोप्या होतील.आणि कधी कधी चांगल्या गोष्टींचाही सहसा निरोप घ्यावा लागणार नाही.

शांतता ही चांगलीच असते परंतू कधी कधी दुसऱ्या बाजूनेही विचार करून पहायला हवा नं ?

म्हणून,काय करायचं ते विचार करून ठरवा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *