भविष्याच्या चिंतेपेक्षा पुढच्या सगळ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात असावेत याचीच जास्त चिंता सतावते.
हर्षदा पिंपळे
आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास ! पण हाच प्रवास अनुभवताना किती किती खाचखळगे येतात काही वेगळं सांगायला नको.आयुष्यात अनेक गोष्टी रोजच्याच झालेल्या असतात.आणि त्यापैकीच एक म्हणजे चिंता.रोज आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता लागलेली असते.एखाद्या गोष्टीविषयी चिंता वाटत नाही असं होत नाही.मान्य आहे की, भविष्याची चिंता सतावणं अगदी नैसर्गिक आहे.
परंतु आपण भविष्यापेक्षा समोर घडणाऱ्या काही गोष्टींविषयीच अधिक चिंतातुर असतो.भुतकाळात डोकावून आपण आपल्या अनेक चिंता वाढवत असतो.तसेच वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींविषयीही आपल्या मनात सतत चिंता असते.आपल्याला नं कोणत्याही प्रकारची चिंता सतावू शकते.
आता हेच पहा नं…की, आपल्याला भविष्याच्या चिंतेपेक्षा पुढच्या सगळ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात असाव्यात याचीच जास्त चिंता सतावते.
तर नक्की यामध्ये काय होतं ?
अनु नावाची एक साधारण सत्तावीस वर्षाची तरूणी.चांगल्या ठिकाणी नोकरीला करत होती. तिचं कुटूंब मोठं होतं.घरात आई वडील आणि तीन भावंड होती.अनुला वेगवेगळ्या कला जोपासायला खूप आवडायचं.ती एक उत्तम चित्रकार होती.तिचा स्वभाव हळवा, लाघवी होता.प्रत्येकाविषयी तिच्या मनात कायम काळजी असायची. चिंता करणं तिचा स्वभाव होता.साध्या साध्या गोष्टींचीही तिला फार चिंता वाटायची.प्रत्येकालाच असते तशी तिलाही तिच्या भविष्याची चिंता सतावायची.
तिला पुष्कळ गोष्टी तिच्या नियंत्रणात असाव्यात असं वाटायचं. आणि याबद्दलच तिला जास्त चिंता वाटायची.साधारणपणे पुढे जाऊन अजून चांगल्या पगाराची नोकरी लागेल नं ? सगळ्या भावंडांच सगळं व्यवस्थित पार पडेल नं ? आई वडीलांना आपण सगळी सुखं देण्यासाठी सक्षम असू नं ? एखादं छानसं घर घेता येईल नं ? अशा प्रकारच्या भविष्याच्या चिंता तिला सतावायच्या. पण या चिंतांच तिला फार काही वाटायचं नाही.
याउलट तिला समोर असणाऱ्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात असाव्यात या गोष्टीविषयी चिंता वाटायची.आणि अनेकदा गोष्टी काही तिला हव्या तशा मुळीच घडल्या नाहीत. तिच्या नियंत्रणात राहून कितीतरी गोष्टी घडल्याच नाहीत. तिच्या नियंत्रणाविरुद्ध गोष्टी घडल राहिल्या. आणि एकामागोमाग एक अशा गोष्टी घडायच्या.याचा अनुला प्रचंड त्रास व्हायचा. चिडचिड व्हायची.कालांतराने तिला तिच्याच जवळच्या मैत्रिणीने समजून सांगितलं.
“अगं अनु,भविष्याची चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे गं..ते मीही नाकारत नाही.पण तुला ज्याविषयी चिंता वाटते नं ते काही फारसं योग्य नाही गं.गोष्टी आपल्या नियंत्रणात असाव्यात असं वाटणं साहजिक असलं तरीही त्याविषयी सतत मनात चिंता बाळगणं कितपत चांगलं आहे ? मुळातच गोष्टी नेहमीच आपल्या नियंत्रणात असाव्यात हा विचार कधी कधी बाजूला ठेवणं आवश्यक आहे. काय आहे नाहीतर नेहमीच तुला गोष्टी नियंत्रणात असाव्यात म्हणून चिंता वाटत राहणार…आणि नाही तसं झालं तर उगाच त्याचा त्रासही होत राहणार. बघ पटतय का माझं म्हणणं? भविष्याची चिंता करू नको असं म्हणणं बिलकूल नाही. परंतु सगळ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात असाव्यात याचीच जास्त चिंता करत बसू नको.हळुहळू छोटी चिंता मोठी केव्हा होते कळतही नाही. वेळीच लक्ष दे.आनंदी रहा…सगळं नियंत्रणात असावं असा विचार बाजूला ठेवायलाही शिक.”
असं बोलून तिची मैत्रिण घरी गेली. अनुने त्या गोष्टीवर थोडाफार विचार केला.आणि अनुला ते पटलं सुद्धा.भविष्याच्या चिंता सोडून तिने नंतर बाकी कोणत्याही गोष्टीचा फारसा विचार केला नाही.त्यामुळे ती आनंदी आयुष्य जगू लागली.
आपलीही अवस्था कधी कधी या अनुसारखीच होते.आपल्यालाही भविष्याच्या चिंता सतावतात.परंतू त्याहीपेक्षा आपल्याला पुढे असलेल्या गोष्टी आपल्या नियंत्रणात असाव्यात असं वाटत राहतं.आणि त्या तशा राहतील की नाही याचीच जास्त चिंता सतावत राहते.
तर मित्रांनो, जास्त चिंता करत राहू नका.आणि केली तरी भविष्याची चिंता करा.अशा गोष्टी नियंत्रणात वगैरे असाव्यात याची चिंता करू नका. काय आहे नेहमीच ते आपल्या हातात असू शकेन याची काही शाश्वती नाही. त्यापेक्षा जे आहे जसं आहे तसं स्वीकारून पुढे जाण्यात तथ्य आहे. चिंता करून त्रास करून घेण्यापेक्षा मोकळं राहून आनंदी आयुष्य जगूयात नं ?
काय वाटतय…नक्की सांगा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

