आपण जे जे करू शकलो नाही याबद्दलचा प्रचंड guilt आपल्याला पुढचंही काहीच करू देत नाही.
पुजा सातपुते
काश! मी ती गोष्ट त्या वेळीस केली असती तर किती बरं झालं असतं, आता काय उपयोग वेळ निघून गेली.
असा विचार बरेचदा आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी तरी येतोच. आपली बरीच स्वप्न असतात, इच्छा असतात आणि काही कारणाने आपण ते पुढे ढकलत राहतो. कधी आपल्या करिअरमुळे, कधी घरघुती कारणाने तर कधी असा विचार करून की अजून आपलं बरंच आयुष्य बाकी आहे, पुढे करूयात सर्व काही…. आणि यातच आपल्या आयुष्याचा शेवटचा टप्पा कधी येतो हे कळतच नाही.
मग वय झालं म्हणून आपली स्वप्न हीं स्वप्नच राहतात आणि इच्छा असूनही आपण त्या वेळेस काही करू शकलो नाही याचा guilt आपल्याला पुढचंही आयुष्य आनंदात जगू देत नाही. इतरांना कधीतरी आपली स्वतःची असलेली स्वप्न पूर्ण करताना बघून आपण regret करतो आणि त्या ओझ्यामुळे डिप्रेस होतो आणि आपलं आयुष्य थांबवतो. हा guilt आपल्याला पुढचंही काही करू देत नाही. वेळ निघून गेली म्हणून आपण आपलं आयुष्य थांबवतो आणि काहीच करू शकलो नाही या विचाराने आपलं मन अस्थिर होतं.
वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी या वेळेतच व्हायला पाहिजेत तर काही गोष्टी या वेळ आली की होतात. म्हणून कर्म करत राहणं हे आपल्या हातात आहे. श्रीमद भगवद गीतेमध्ये सुद्धा श्री कृष्णाने हेच सांगितलं आहे. तुमच्या कर्माचं फळ हे तुम्हाला मिळणार फक्त वेळ आल्यावरच, कारण त्याचा कंट्रोल आपल्या हातात नसतो तो निसर्गाच्या हातात आहे. आपल्या हातात आपले कर्म असतात आणि ती चांगली असली तरच त्याचं फळ चांगलं मिळणार.
योग्य वेळी योग्य त्या घटना घडत असतात. आपल्याला बरंच काही शिकवतात, घडवतात आणि आपल्या आयुष्याला वेगळं वळण देतात. म्हणून प्रत्येक संधीचा फायदा वेळेत घेतला तरच त्याचा उपयोग होतो आणि पुढे regret किंव्हा guilty फील करायची गरज पडत नाही. जरी त्या संधीचा फायदा घेऊन अपयश आलं तरी सुद्धा त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे कारण प्रत्येक प्रयत्न आपल्याला नवीन अनुभव देतात जे आपल्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासात मदत करतात.
आपण आपल्या आयुष्यातील बऱ्याच संधी failure च्या भीतीने सोडून देतो आणि मग निराश होतो आणि हा guilt आपल्याला पुढचंही काही करू देत नाही. प्रत्येक गोष्टीत आपल्याला अपयशच येणार या विचाराने निसर्गाने आपल्या साठी निर्माण केलेल्या संधीनकडे दुर्लक्ष करतो आणि नशिबाला दोष देत बसतो.
निसर्ग आपल्याला रोज एक नवीन संधी उपलब्ध करून देत असतो आणि त्याचा फायदा घेऊन आपल्याला आपले शंभर टक्के दिले पाहिजेत. संघर्षाला एक challenge समजून सामोरं गेलो तर आपल्याला यश मिळतं किंव्हा त्यातनं शिकायला मिळतं जे आपल्याला आपल्या यशा जवळ नेतं.
आयुष्यातली कुठलीही गोष्ट ग्रांटेड नाही घेतली आणि प्रत्येक गोष्टीचा वेळेत फायदा घेतला तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला समाधान वाटतं. आयुष्यात संघर्ष करूनही आपण ते सुंदरीत्या जगू शकलो याचा अभिमान वाटतो आणि इतरांसाठी एक उदाहरण बनतो.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदरच ठेवा. प्रत्येक संधीचा वेळेत फायदा घ्या. नवीन नवीन गोष्टी शिका. तुम्ही जर तुमचं आयुष्य बदलण्याचं मनापासून ठरवलं तर तुम्ही ते नक्की करू शकता. एक पॉसिटीव्ह विचार आपल्या आयुष्यात पॉसिटीव्ह बदल नक्कीच घडवू शकतो फक्त स्वतःच्या आयुष्यात पॉसिटीव्ह बदल आण्याची इच्छा असली पाहिजे. खूपदा आपल्या हट्टीपणामुळे आपलं नुकसान होत असतं. तो जर वेळेत आवरता घेतला तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार.
जे जे करू शकलो नाही याचं regret करत बसण्यापेक्षा आता पुढे काय करू शकतो याचा विचार केला आणि निसर्गाने निर्माण केलेल्या संधीचा फायदा घेतला तर आपल्याला कधीच guilty फील होणार नाही.
ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

