काहीही न बोलता लोकांना माफ करणे, याला स्वतःची काळजी घेणे म्हणतात.
हर्षदा पिंपळे
श्रेयस म्हणजे अगदी चोविस वर्षाचा तरूण. शिक्षण, नोकरी सगळं व्यवस्थित चालू होतं.त्याच्या आयुष्यातही आपल्यासारखीच वेगवेगळ्या प्रकारची माणसं होती.श्रेयसचा स्वभाव तसा साधा आणि सरळ होता.तो कुणाला काही बोलायचा नाही. कुणी त्याला दुःखावलं तरी त्याला फारसा फरक पडायचा नाही.
कारण त्याला दुसऱ्यांसाठी जशी काळजी, जितकी तळमळ असायची तितकीच काळजी त्याला स्वतःसाठीही असायची. त्यामुळे स्वतःची काळजी घेताना तो कधीच कमीपणा घ्यायचा नाही.आपण स्वतःची काळजी घेतली तरच दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो याची जाणीव त्याला होती.अनेकदा असच झालं,लोकं त्याला त्रास देऊन सॉरी बोलायची.
पण श्रेयसही मोठ्या मनाने काहीही न बोलता त्यांना माफ करून टाकायचा.इतकच नाही तर त्यांच्या मागे किंवा त्यांच्याविषयी तो कधीच चर्चा करायचा नाही.”त्यांनी मला त्रास दिला,असच केलं,तसच केलं”असं तो कधीच करायचा नाही.उलट लेट इट गो असं म्हणून तो पुन्हा नव्याने वाटा मोकळ्या करायचा. यामुळे काय व्हायचं तर त्याला सहसा कोणताही मानसिक त्रास जाणवायचा नाही.
दुःख,खेद,घुसमट अशा गोष्टींचा त्याला सहज विसर पडायचा. यामुळे स्वतःचं नुकसान होत नाही असचं त्याला वाटायचं. असं केल्यामुळे आपण आपली एक प्रकारे काळजीच घेत असतो असं तो नेहमी इतरांना सांगायचा.आणि इतरांनाही त्याच्या या गोष्टीचं कौतुक वाटायचं.त्याच्या या गोष्टीमुळे कित्येकांच्या आयुष्यात खूप चांगला बदल झाला होता.असं वागणं म्हणजे स्वतःची एकप्रकारे काळजी घेणं असतं याची त्यांनाही जाणीव झाली होती.
तर मित्रांनो, काळजी हा शब्द जरा आपल्या प्रत्येकाच्या जास्तच जवळचा आहे. नाही का ? दिवसाला किमान एकदा तरी हा शब्द प्रत्येकजण आपापल्या बोलण्यात वापरत असणार यात शंकाच नाही.मग ती स्वतःची काळजी असो वा इतरांची.काळजी शब्दाला आपल्याकडे काही मर्यादाच नाही.
तर मित्रांनो आपण स्वतःची काळजी घेतो.पण आपण स्वतःची काळजी घेतो म्हणजे नेमकं काय काय करतो ? बेसिकली स्वतःला हवं नको ते पाहतो.स्वतःला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा विचार करतो.स्वतःच्या आवडी निवडी जपण्याचा प्रयत्न करतो.पण काळजी घेणं फक्त यालाच म्हणतात का ? तर नाही मित्रांनो, फक्त याच गोष्टींना काळजी घेणं म्हणत नाही.आपण आपली काळजी विविधांगाने घेऊ शकतो. आणि आपण ती घ्यायला हवी. आपण विचार करताना सर्वांगाने विचार करायला हवा.आपण आपली काळजी केव्हा केव्हा घ्यायला हवी याचा आपण विचार करायला हवा.
कधी कधी काय होतं,आपल्याच आयुष्यातील लोकं आपल्याला दुःखावतात.टोचून बोलतात.चुका नसतानाही आपल्या चुका काढत राहतात. आपल्या सुखात मोडता पाय घालणारीही असंख्य माणसं आपल्या सभोवती असतातच.छोट्या छोट्या गोष्टींचा अनेकदा आपण फार विचार करत नाही. पण कधी कधी काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मनाला इतक्या लागतात की डोळ्यात टचकन पाणी येतं.लोकांनी आपल्याला इतका त्रास दिलेला असतो की त्याला काही सीमाच नसते.
आणि येता जाता लोकं आपल्याला त्रास देतच असतात.आणि त्रास दिल्यावर लगेचच सॉरी बोलून ती लोकं मोकळीही होतात.पण अनेकदा काय होतं काही जणं पटकन समोरच्याला माफ करत नाहीत.त्यामुळे त्यांच्यात वादविवाद अजूनच वाढत जातात.इतकच नाही तर ते त्या त्रास दिलेल्या लोकांविषयीही सतत मागेपुढे बरच काही बोलत राहतात. स्वतःला त्यामुळे जास्त त्रास करून देतात.यामुळे काय होतं मनाला त्रास होतो,शरिरालाही त्रास होतो.म्हणजेच शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे स्वतःची काळजी घेणं बाजूला राहतं.यामुळे स्वतःची काळजी वाढत जाते.
पण मित्रांनो अशावेळेस खरं तर आपण आपली काळजी घ्यायची असते.अशावेळेसच आपण आपला विचार करणं आवश्यक असतं.अनेकदा समोरच्याला काहीही न बोलता आपण माफ करतो त्यावेळेस बरेच प्रश्न सुटतात.त्यांच्याविषयी सतत काहीही चर्चा न केल्यास आपल्याला होणारा बराच त्रास कमी होतो.नाहीतर मग मी माफ नाही करणार,तु असाच आहेस तसाच आहेस असं करण्यात आपण आपलाच वेळ वाया घालवत असतो.आपलीच शारीरिक आणि मानसिक ऊर्जा खर्च करत असतो.यामुळे आपल्याला अधिकाधिक त्रासच होतो.पण श्रेयससारखाच आपणही विचार केला तर नक्कीच काहीतरी चांगला बदल आपल्यामध्ये घडू शकतो.
तर मित्रांनो,
काहीही न बोलता लोकांना माफ करणे आणि त्यांच्याशी त्याविषयी काहीही न बोलणे, यालाही स्वतःची काळजी घेणे म्हणतात.तर स्वतःची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.म्हणून सर्वांगाने विचार करून अशाप्रकारेही नक्कीच स्वतःची काळजी घ्या.
कुणीतरी म्हंटलच आहे,
Self care is the best care…!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

