Skip to content

जोपर्यंत समोरच्याला तुमच्या सोबत असण्याची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्यांना कन्व्हेन्स करू नका.

जोपर्यंत समोरच्याला तुमच्या सोबत असण्याची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्यांना कन्व्हेन्स करू नका.


टीम आपलं मानसशास्त्र


दोन व्यक्ती मध्ये interaction, नाती ही कधी टिकतात ? जेव्हा समोरच्याला ही तुमच्या असण्याची जाणीव असते. तेव्हाच. हो नक्की तेव्हाच. तुम्ही समोरच्याला खूप importance देत आहात , तुम्ही मैत्री , नाती , relationship मनापासून निभावत आहात , समोरच्याची काळजी , त्याच्याविषयी भावनिक होत आहात, त्याच्यात पूर्ण involve आहात पण समोरच्या माणसाचे विश्व हे वेगळेच आहे. त्यात तुम्ही त्याच्याकरिता जे करत आहात त्याची जाणीव ही नाही. आणि जरी त्याच्या लक्षात आले तुम्ही हे करत आहात तेव्हा एक तर तुम्ही करणे हे गृहीत च धरले जाते. आणि एखाद्या वेळी तशी कृती , किंवा गोष्टी तुमच्याकडून केल्या नाहीत तर तुम्ही भयंकर गुन्हा केला आहे असे बोलून , वागून तुमच्यावर कृती केली केली जाते. आणि तुम्ही दोषी ठरविले जाता.

उदा. : स्नेहा आणि पूर्वा दोघी मैत्रिणी. स्नेहा कायम पूर्वा ला फोन करणार , कशी आहेस ,काय सुरू , बरी आहेस ना, जेवलीस का ? मग पूर्वा हो नाही उत्तरे देणार. बरं पूर्वा कधी विचारणार ही नाही आपणहून . मेसेज ही नाही. फोन ही नाही का ? तर ती मोठ्या कंपनी मध्ये कामाला होती. खूप बिझी असायची. म्हणून तिला वेळ नसे म्हणे. पण हीच पूर्वा तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणी , घरच्यांच्या सोबत फोनवर , मेसेज करून कायम बोलत असे. त्यांची विचारपूस करत असे. तेव्हा मात्र स्नेहा ला वाईट वाटत असे. स्नेहा ही पूर्वा ची अगदी लहान पणापासून ची मैत्रीण असून तिला पूर्वा ची मैत्री प्रिय होती, तिची काळजी होती. मात्र तिच्या सोबत असण्याची जाणीव ही पूर्वा ला नव्हती.

एकदा दोन दिवस स्नेहा नी पूर्वा ला फोन केलाच नाही की बघू तिला आठवण तरी येते का आपली ? तिला आपण फोन केला नाही याची जाणीव तरी होते का ? पण काहीच नाही. शेवटी न राहवून स्नेहा ने च विषय काढायचा म्हणून विचारले जेवलीस का ग ? तर पूर्वा इतक्या तुटकपने तिला म्हणाली दोन दिवस विचारले नाहीस तर आता कशाला विचारते ? म्हणजे स्नेहा ला विचारायचे राहिले बाजूला की का ग फोन नाही मेसेज नाही बरी आहेस का . याउलट तिला असे एव्हढे तोडून बोलली आणि जसे की काही गरज नाही आता विचारण्याचा. तू दोषी आहेस असेच चोराच्या उलट्या बोंबा.

नाही तर मग अशा लोकांचा स्वभाव असतो की समोरचा म्हणतो की तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही करता , मी सांगितले का करायला असे उलटे attitude असते.

तुमचे अस्तित्व किंवा तुमच्या सोबत असण्याची जाणीव ही समोरच्याला नसते तेव्हा वाईट हे नक्की वाटते. कारण ती साथ , मैत्री , नाते आपण आपलेपणाने करत असतो. त्या व्यक्तीविषयी आपल्याला भावना असतात. किंवा आपण मुळातच भावनिक असतो.

पण यातून झाले काय की पूर्वा आणि स्नेहा या कायमच्या दुरवल्या. एवढी मैत्री तुटली. कारण काय स्नेहाच्या लक्षात आले की पूर्वा ला आपल्या मैत्रीची , आपल्या अस्तित्वाची जाणीव च नाही तर मग आपण तिच्या विश्वात तरी का राहायचे. त्यापेक्षा अंतर ठेवू.

मेघा ही स्वाती कडे कायम जात येत असे. तिचे आई बाबा काका काकू कधीच नव्हते तिच्यासाठी. ती आई बाबाच म्हणत असे. कायम मदतीला तत्पर असे त्यांच्या. एकदा बाबाना हार्ट अटॅक आला आणि तेव्हा स्वाती नेमकी शहराच्या बाहेर होती. तिच्या ऑफिस कामानिमित्त बाहेर होती. तेव्हा मेघा ने सगळी धावपळ केली. वेळीच सगळी treatment मिळाली. तिने पैशाचा ही विचार केला नाही. पटापट सगळ्या arrangments केल्या.

पेपर work , डॉक्टर सोबत बोलून निर्णय घेणे सगळे एकटीने ताकदीने पेलून नेले. सोबत आई ची काळजी घेणे. तिचे खाणे पिणे सांभाळून . रात्री ही मेघा च थांबत होती हॉस्पिटल मध्ये. आई ला घरी पाठवायची विश्रांती करिता. तिचे ऑफिस महत्वाचे असून ही तिने सगळे adjust केले घरी ही सगळे manage करून , मुलांची जबाबदारी , सासू , नवरा सगळे सांभाळून त्यांच्या arrangements करून ही एवढी धावपळ , दगदग करून बाबांना डिस्चार्ज घेवून घरी घेवून आली . एक आठवडा तिची ही पूर्ण धावपळ, ऑफिस , मुले यांच्याकडे आणि स्वतः कडे ही दुर्लक्ष च झाले होते. पण मग स्वाती परत आल्यावर मात्र मेघा जोमाने तिच्या कामांना लागली.

मात्र स्वाती ने एवढेच धरून ठेवले की मेघाने मी परत आल्यावर जबाबदारी झटकून टाकली. आणि तिने आपणहून मेघा ला फोन ही केला नाही. किंवा तिची विचारपूस ही नाही. तिने केलेली धावपळ हे शहरातून बाहेर असताना मात्र फोनवर म्हणली होती. मात्र परत alywar तिला जावून भेटणे नाही. फोन वर तिला काही गरज आहे का हे विचारणे नाही. तिने पैसे खर्च केले. त्याची चौकशी नाही. काही ही नाही. उलट मेघा ने तिला थोडी रिकामी झाल्यावर फोन केला. बाबा आई आणि स्वाती ची चौकशी केली. तर ही स्वाती उलट म्हणते काय आता कशाला चौकशी पाहिजे तुला. मी आल्यापासून तू फिरकली ही नाहीस.

मेघा करिता हे अनपेक्षित होते. तिने सगळे जीव तोडून केले होते. आर्थिक,मानसिक , शारीरिक ताण , त्रास सहन करून , शिवाय घर , ऑफिस सगळे manage करून जीवापाड केलेले प्रयत्न , तिची धावपळ हे काहीही स्वाती समजू शकत नाही याचे आश्चर्य ही वाटले.

पण मेघा ने ही शांतपणे फोन ठेवला. काही बोलली नाही . चिडली नाही. रागावली नाही. किंवा काही समजून सांगण्यास ही गेली नाही.

फक्त तिने कटाक्षाने स्वतः ला आपल्या कामात , मुलांमध्ये गुंतवून घेतले. स्वाती ला काही ही सांगायला , जे problems आले तेही शेअर करायला गेली नाही. की आर्थिक गोष्टी ही केलेल्या सांगण्यासाठी गेली नाही. की रोज हॉस्पिटल मध्ये स्वतः बाबांची घेत असलेली काळजी, त्यांना स्वतः भरवत होती. अगदी वेळ प्रसंगी त्यांचे कपडे बदलून देणे. आवरून देणे सगळे करत होती या कोणत्याही गोष्टी सांगायला ही गेली नाही. अशी तुटक वागू नको स्वाती असे काही कन्व्हेन्स करायला गेली नाही.

पण थोडे दिवसांनी बाबा पूर्ण बरे झाले. फ्रेश झाले.तेव्हा बाबांनी मेघा ला घरी बोलावून घेतले आणि स्वाती समोर तिचे कौतुक केले. तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव त्यांना होती. त्या सगळ्या छोट्या गोष्टी सह मोठ्या गोष्टी ही स्वाती समोर ते बोलले. हॉस्पिटल मधून त्यांनी सगळा खर्च किती आला ते खर्च मागवून घेतले होते. आणि आज त्यांनी स्वतः ते सगळे पैसे तिला परत दिले. आणि म्हणले की तुझे ऋण आयुष्यभर फेडू शकत नाही. तू वेळेला केलेली धावपळ , घेतलेले निर्णय , केलेली मदत याची जाणीव आयुष्यभर राहील आम्हाला. तुझ्यामुळे आजचा दिवस मी बघत आहे. तिला आशीर्वाद दिला. आणि तू माझी मुलगी आहेस कायम येत रहा. कधी ही अंतर देणार नाही आम्ही तुला. हक्काचे माहेर आहे तुझे.

हे जेव्हा बाबा आणि आईने स्वाती समोर सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली तेव्हा स्वाती चे डोळे उघडले. तेव्हा तिने मेघाची माफी मागितली. अर्थात मेघा चे मन मोठे असल्याने तिने स्वातीला मोठ्या मनाने माफ केले.

जोपर्यंत समोरच्याला तुमच्या सोबत असण्याची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्यांना कन्व्हेन्स करू नका.

कारण तुम्ही काही ही सांगायला गेलात की त्याच्या विरुध्द समोरची व्यक्ती विचार करते. किंवा तुम्हाला विरोध च करते. तुमचे बोलणे उडवून लावते. ” हा सूर्य आणि हा जयन्द्रथ अशी जोपर्यंत खात्री पटत नाही समोरच्याची तोपर्यंत काही ही सांगायला जावू नका. पटवून द्यायला जावू नका. किंवा कशाची जाणिव करण्यास जावू नका.

तुमचे महत्व , तुमची जाणीव ही तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही काही ही न बोलता शांत राहाल. आणि कधी तरी तुम्ही दूर ही व्हाल तेव्हा. आणि जेव्हा कधी परत असे बिकट प्रसंग येतील तेव्हा तुमची साथ नसेल. तुम्ही मदतीला नसाल तेव्हा तुमची प्रकर्षाने जाणीव होईल.

म्हणूनच तुम्ही आपणहून कसली जाणीव करून देवू नका. समोरच्याला आतून , अंतकरणा तून , मनातून तुमच्या विष्यी ची जाणिव निर्माण होवू दे. तेव्हाच त्याला तुमची उणीव ही भासेल.

आयुष्य सुंदर आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाची आणि अपल्याकरिता प्रेमाने , आपुलकीने साथ देणाऱ्या , मदत करणाऱ्या , प्रसंगी कटू बोलले वागले तरी ही केवळ आपल्या हिता करिता हे लक्षात घेवून त्यांच्या आपलेपणाची जाणीव ठेवा. आणि कधीच समोरच्याला गृहीत धरू नका.त्याने केले तर त्यात काय , केलेच पाहिजे हे विचार आणि ही अपेक्षा चूक आहे. आणि त्याने केले हा विचार ही प्रत्येक वेळी मनात येवू दे. दुर्लक्ष करू नका त्या व्यक्ती कडे . उलट समोरची व्यक्ती आपल्यासोबत आहे याची कायम जाणीव ठेवा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *