Skip to content

अशा पुरुषांना salute.. जे ग्रेट पती, अमेजिंग भाऊ आणि सिन्सिअर मित्र आहेत.

अशा पुरुषांना salute.. जे ग्रेट पती, अमेजिंग भाऊ आणि सिन्सिअर मित्र आहेत.


टीम आपलं मानसशास्त्र


बरेचसे पुरुष हे सहनशील , प्रेमळ, समजून घेणारी , कायम मदत करणारे असतात. संयमी असतात. पण काही त्या विरूद्ध ही असतात. अतिशय चिडखोर , रागीट , अजिबात सहनशीलता नसते.

आजच माझा बॉस , सल्लागार , हितचिंतक आणि मित्र ,उदय त्याच्या सोबत दोन तीन वेळा कामानिमित्त मग general असे फोनवर खूप मोकळेपणाने बोलणे झाले. त्याच्या घरच्या अडचणी , मुलाच्या पर्सनल , शैक्षणिक समस्या , आणि नवीन घर घेताना येणाऱ्या अडचणी , काही गोष्टी detail तपशीलवार माहिती करून आणि समजून घेणे गरजेचे अशा वेळी तो त्याचा परदेशी गेलेला पण अतिशय जवळचा मित्र हेमंत याची आठवण काढून मी त्याला खूप मिस करतो म्हणाला. त्याची आता मला सर्वात जास्त गरज आहे . त्याच्या सोबत मोकळेपणे बोलायचे आहे. त्याचा सल्ला घ्यायचा आहे. त्याच्या शिवाय दुसरी कोणीही योग्य व्यक्ती नाहीच. एव्हढा ठाम विश्वास त्याचा मित्र ही कामात एकदम सिन्सिअर, कोणतीही गोष्ट असेल त्याचा पूर्ण अभ्यास करून मगच ठाम मत मांडणार आणि योग्य सल्ला देणार.

उदय ला म्हणले अरे मग काय परदेशी आहे तर फोन कर, तर म्हणतो कसा फेस to फेस बोलण्यात जे समाधान ते नाही मिळत. मग म्हणले व्हिडिओ कॉल कर. अगदी समोरासमोर बोलणे होईल. मग तर चेष्टा मस्करी करत म्हणतो कसा मग ग्लास घेवून कसे बसता येईल, आणि एकमेकांना एक ठेवून द्यावी वाटली तर कशी देणार ?

त्यात काय दोघांनी तिकडून एकमेकास एक एक चापट मारून घ्या आणि ही तू मला दिली ही मी तुला. असे म्हणून स्वतः घ्या मारून एक आणि मग सगळी मनातली , डोक्यातली भडास रिकामी करा. भरपूर बोला , अडचणी सांगा , बोलता बोलता सगळ्यांवर मार्ग निघतील . किंवा. अजून काही वेगळ्या गोष्टी समजतील . वेगळी वळणे येतील.

आता बोलतो च त्याच्या बरोबर म्हणाला उदय.


इथे तर दोन मित्र आहेत. पण बरेचवेळा स्त्रियांच्या आयुष्यात असे पुरुषांचे एक खास स्थान असते. जसे की सुरुवात होते ती पिता , वडील , बाप , बाबा इथून.. बाबा म्हणजे मुलीच्या आयुष्यात खूप आदर्श व्यक्तिमत्त्व असते. मुलीचे बाबा हे मुली करिता काही ही करायला तयार असतात..प्रसंगी उपाशी राहून तिच्या करिता आठवणीने तिच्या आवडीचा खाऊ घेवून येणारे.

स्वतः फाटका बनियन घालतील पण मुलीने हट्ट केलेला फ्रॉक , ड्रेस , एखादी बाहुली , किंवा वयात येवू लागली की तिला लागणाऱ्या आवश्यक वस्तू . दूर राहून केवळ कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणारे चोवीस तासाच्चे ATM असून ही इगो नाही. कुठेही मी करतो, मला करावे लागते ही खंत नाही. किंवा इगो नाही. कधी ही कोणाकडून साधी अपेक्षा ही नाही की बाबा तू दमलास .थोडी विश्रांती घे. तू आराम कर या कशाची कधी अपेक्षा नाही.

इतरांच्या आनंदात सुख मानणारा , इतरांना आनंद देणारा , प्रसंगी पेट्रोल , रिक्षाचे पैसे वाचवून चालत येताना त्याच पैशातून घरी गरजेच्या वस्तू , मुलांच्या करिता खाऊ , खेळणी , कपडे घेवून येणारा हा बाबा अतिशय संवेदनशील असतो त्याच्या मुलीच्या बाबतीत. सासरी मुलगी देताना सासरच्या मंडळींना एवढेच म्हणतो तळ हातावरच्या फोडासारखी जपली आहे पोरीला सांभाळून घ्या तिला. तेव्हा अक्षरशः तो बाप रडत असतो कारण त्याच्या काळजाचा तुकडा तो दुसऱ्याला देत असतो. तो याच विश्वासावर की तिचा पती ही तिला असेच जपेल. काळजी घेईल. सांभाळेल. काही कमी पडू देणार नाही. आणि मुलीचे बाबा जणू तिच्या पती कडून आश्वासन च घेतात की तिला आयुष्यभर फुलासारखी जपेन. आणि कधी जर काही उलटे झाले तर खंबीर बाप आपल्या पोरीला आधार देवून घेवून येतो की मी आहे जिवंत अजून ..

मुलगी ही बाबांकडून महत्वाचे ज्ञान प्राप्त करून घेत असते. व्यवहारीक , आर्थिक गोष्टी , बचत , गुंतवणूक या गोष्टी शिकत असतेच पण त्यांचे अमूल्य आणि मार्गदर्शनाचे , motivate करणारे विचार तिला कायम भारावून टाकतात. बाबांनी अतिशय कष्टातून हळूहळू पुढे जात केलेली त्यांची आणि कुटुंबीयांची प्रगती उभे केलेले

शिकून काय करणार ? त्यापेक्षा घरकाम शिकवा, असे म्हणणाऱ्या घरातल्या वरिष्ठ स्त्रियांना गप्प बसवत आपल्या लेकीचा कल पाहून , तिची आवड, इच्छा समजून घेवून तिच्या आवडत्या विषयाचे शिक्षण घेण्याकरिता खंबीर पाठीशी राहणारे वडील आणि भाऊ च असतात. कधी विसावा घ्यावा वाटला तर बाबांचा भक्कम खांदा हा विसावा घेण्यासाठी तत्पर असतो. योग्य पण प्रसंगी कटू वाटणारे ,ठाम निर्णय घेण्यास ही पाठिंबा देणारे बाबा असतात. आवडी निवडी जपत असताना लेकीच व्यक्तिमत्त्व घडविण्याकडे त्यांचे लक्ष जास्त असते.

कॉलेज मध्ये अभ्यासात , नोट्स मिळविण्यासाठी मदत करणारे सिन्सिअर मित्र. कधी कधी मनाची खूप विचित्र अवस्था असते. मन अस्वस्थ असते. कशातच इंटरेस्ट वाटत नाही. कोणाशी तरी बोलावे .मोकळे व्हावे असे वाटत असते आणि आपण आपल्या जवळच्या मित्राला फोन करतो आणि तो लगेच विचारतो कशी आहेस ग. काय झाले नेहमी सारखी वाटत नाहीस. अशावेळी त्याची ही आपुलकीची विचारपूस आपल्यामध्ये उत्साह निर्माण करते. त्याच्याशी अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने संवाद साधला जातो.

मुलींना सख्खा असो चुलत , मावस , मामे , आत्ये भाऊ कोणी ही असो. त्यांचे एक नाते वेगळेच असते. त्यात बरोबरचे असतील तर म्हणजे एका generation चे तर मग काय अभ्यास एकत्र, नोकरी मिळविण्यासाठी मदत करणारे , मार्गदर्शन करणारे , खाण्या पिण्याच्या आवडी एकत्र, फिरणे , पार्टीज ला निम्मित ही लागत नाही. शॉपिंग, गप्पा , एकमेक कधी ही हाकेला येणार याची खात्री आणि होते ही तसे. एकमेकांचे मित्र मैत्रिणी ही एकमेकांस चांगले ओळखू च नाही तर चांगली मैत्री होते सगळ्यांमध्ये. धमाल , मस्ती , नवीन गोष्टी करणे , शिकणे , गणपती असोंकी दिवाळी , ख्रिसमस सगळे सण उत्साहाने एकत्र celebrate करण्यात एक वेगळीच धमाल असते.

हेच भाऊ राखी पौर्णिमेला राखी बांधून घेताना रक्षण करण्याची जबाबदारी उचलतात आणि आयुष्यभर वेळप्रसंगी केवळ कठीण प्रसंगी च नाही तर नाजूक प्रसंगी ही कायम साथ देतात. काळजी घेतात.सगळ्या संकटाना तोंड देताना घाबरु नकोस मी तुझ्या सोबत आहे. माझा खंबीर आधार आहे हे केवळ आश्वासन नाही तर वेळप्रसंगी तशी कृती ही करतात. बहिणीची बाजू घेवून घरात सगळ्यांचा रोष पत्करणारे हे भाऊ खूप amazing असतात.

लग्नानंतर स्त्री चे आयुष्य बरेच मोठ्या प्रमाणांत बदलते. माहेर सोडून सासरी येते तेव्हा ती पतीच्या भरोशा वर येते. त्याच्यावर प्रचंड विश्वास. आणि पती ही जर असा मिळाला की तिला समजून घेणारा , समजावून सांगणारा , सुरुवातीला आणि पुढेही गरज असेल तेव्हा घरातल्या इतर व्यक्तींचे स्वभव कसे आहेत. , आवडी निवडी कशा आहेत, गरजा काय आहेत हे सांगणारा असेल , बायको चे कधी चुकले तरी आरडाओरडा न करता शांतपणे समजून घेवून , जवळ घेवून काही काळजी करू नकोस मी आहे ना असा ठाम विश्वास देणारा असेल , बायकोवर नितांत प्रेम करणारा , तिला आर्थिक, मानसिक , शारीरिक, सामाजिक सुरक्षितता देणारा. तिच्या आवडी निवडी जपणारा , मुले झाल्यावर तिला दिवसभर दमते तू. मी बघतो मुलांच्या कडे तू आराम कर म्हणून तिला विश्रांती देणारा. मुलांची बायकोच्या बरोबरीने काळजी घेणारा. बायको कधी आजारी पडली, तिच्या त्या चार दिवसात त्रास होत असेल तर डॉक्टर कडे घेवून जाणारा , घरातले ,मुलांचे , ऑफिस , बाहेरचे सगळे सांभाळून परत बायकोची खाण्या पिण्याची काळजी घेणारा असा पती, तिला शारीरिक आणि मानसिक सुखाच्या शिखरावर घेवून जाताना स्वतः मात्र अनेक गोष्टी वर एकटा लढणारा , त्यावर मात करणारा , अनेक गोष्टी करत असताना ही बायको , कुटुंब यांस प्राधान्य देत त्यांचे रक्षण , सुरक्षिततेची ऊब देणारा हा पती ग्रेट असतो.

वेळप्रसंगी स्वतः नोकरी निमित्त दूर राहून , परदेशी राहून स्वतः पोटाला चिमटे घेवून तर कधी प्रगती साठी आणि जास्त पैसे मिळविण्याची धडपड करत , त्याग करत , बायको मुलांना सगळ्या सोयी सुविधा देणारा हा पती खरेच कधी ही कुरबुर नाही, चिडचिड नाही. मीच का करायचे ही तक्रार नाही. दिवाळी, सणा सुदी ला सगळ्यांना काही ना काही घेईल मात्र स्वतः ला काही घेणार नाही.

सातत्याने तो त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडून आपला वर्तमान आणि भविष्यकाळ ही सुरक्षित करण्या करिता धडपडत असतो. असा नवरा , असा प्रेमळ ,पत्नीला आधार देणारा, समंजस , त्याग करणारा अख्खे जग भ्रमंती करून आयुष्य उत्साही बनविण्याचा ध्यास असणारा , पत्नी ला गरजा असतील त्या गोष्टी , तिच्या करिता भूषण असणाऱ्या मग उंची कपडे ,डाग दागिने , वस्तू, आता गॅजेट्स , आरामशीर प्रवास व्हावा तिचा म्हणून कार दाराशी सेवा. सगळ्यात किती ही बिझी असेल तरी पत्नी आणि कुटुंब यांच्या करिता कायम उपलब्ध असणारा, नवीन गोष्टी , ॲप, तंत्रज्ञाने यांची माहिती देणारा , शिकविणारा पती. असे पती खरेच ग्रेटच.

पुरुष स्त्रीच्या आयुष्यात आदर्श पिता , amazing भाऊ. सिन्सिअर मित्र, आणि भविष्यकालीन जबाबदारी घेणारा पुत्र , सासरचे खंबीर खांब सासरे , दिर , अशा विविध भूमिका निभावत असतात.

स्त्रियांच्या आयुष्यातल्या अशा पुरुषांना salute.. जे ग्रेट पती आहेत, अमेजिंग भाऊ आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सिन्सिअर मित्र आहेत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अशा पुरुषांना salute.. जे ग्रेट पती, अमेजिंग भाऊ आणि सिन्सिअर मित्र आहेत.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!