Skip to content

काहींचं आयुष्य खूप एकटं असतं, जेथे कुटुंब, मित्र, जोडीदार हे कोणीच त्यांचे नसतात.

काहींचं आयुष्य खूप एकटं असतं, जेथे कुटुंब, मित्र, जोडीदार हे कोणीच त्यांचे नसतात.


टीम आपलं मानसशास्त्र


खरेच हे जगातले सगळ्यात वाईट की कुटुंब , मित्र , जोडीदार आहेत तरी ही एखादी व्यक्ती ही एकटी असते. तीच आयुष्य खूप एकटं असतं. पण आजकाल असे बरेच प्रमाण वाढते आहे. सगळे असून एकटं वाटणे ही मानसिकता खूप त्रासदायक ठरते बरेचवेळा. त्यातही जी व्यक्ती खूप भावनिक असते तिला , जी इतरांच्या करिता कायम तत्पर असते. त्यांची काळजी घेते , त्यांना जपण्याचा प्रयत्न करते अशा व्यक्ती ला सगळे असून एकटं फील होत तेव्हा बरेचवेळा ते सहन होत नाही.

वारंवार असे होत गेलं की आयुष्यात ती व्यक्ती हळूहळू एकटी राहू लागते. चार माणसात असेल तरी ही बोलताना ही तोलून मापून बोलायचे. कारण इतर सगळे त्यांच्या त्यांच्या मस्ती मध्ये जगत असतात. पण ही व्यक्ती त्यांच्या लेखी असून नसल्यासारखी असते.

सुखदा खूप हुशार होती. अभ्यासात ही कायम पुढे. इतर activities मध्ये ही कायम पुढे असायची. दुर्दैवाने वडिलांचे आणि आई चे सारखे आजारपण सुरू झाले. मोठ्या बहिणीच लग्न झालेले, मोठा भाऊ शिक्षण झाल्यावर नोकरी करिता मोठ्या शहरात गेला. आई वडिलांची पूर्ण जबाबदारी सुखदा ने उचलली . रात्री अपरात्री कधी ही बाबांना डॉक्टर कडे घेवून जावे लागे. सुखदा कायम तत्पर असे . तशी वयाने ही लहान पंधराव्या वर्षीच सगळी जबाबदारी पडली तिच्यावर. घरचे करून ती शिक्षण आणि नोकरी असे सगळे सांभाळत होती.

बाबांनी तिचे लग्नं ते हयात आहेत तोपर्यंत करायचे ठरविले. पहिलेच स्थळ बघितले . तेही मोठ्या शहरात होते. पण एकत्र कुटुंब म्हणून बाबांनी होकार दिला. शिवाय लग्नानंतर सुखदा ने तिचे शिक्षण पूर्ण केले तरी त्याला तिकडच्या लोकांनी ही तयारी दर्शविली.

सुखदा अतिशय हुशार , माहेरी खरे तर खूप आनंदी वातावरण , आर्थिक सुबत्ता , सगळ्या सुख सोयी.

एकमेकांना सांगून , विचारुन सगळे निर्णय घेत. मोकळेपणाने रोज गप्पा , पत्ते खेळणे , टीव्ही बघणे सगळे एकत्र असे.

याउलट सुखदा चे सासर . कुटुंब एकत्र आजे सासूबाई , सासू सासरे , दिर जाऊ त्यांची मुलगी म्हणजे पुतणी , दोन लग्न झालेल्या नणंदा , त्यातली एक गावातच तर दुसरी बेंगलोर मध्ये. धाकटी नणंद , तिचा नवरा तिची मुले सतत माहेरीच . आणि सुखदा सुखदाचा नवरा.

घर मोठे असेल तरी दिर जाऊ , सासू सासरे यांना स्वतंत्र खोल्या होत्या. मात्र सुखदा आणि तिच्या नवऱ्याला स्वतंत्र खोली नव्हती. अगदी नवे लग्न झाले तेव्हा सगळे पाहुणे , नणंदा , त्यांची मुले आजे सासूबाई सगळे एका मोठ्या हॉल मध्येच.

म्हणजे नव्या जोडप्याला स्वातंत्र्य असे काहीच नव्हते. नवऱ्या सोबत बोलणे ही दूरच . त्यात नवरा financially , professionally stable नव्हता. त्यामुळे घरात त्याला कोणते महत्व नव्हते. त्यामुळे तो खूप चिडका किंवा मुळातच त्याचा स्वभाव जमदग्नी चा त्यामुळे कधी काही बोलायचे झाले तरी तिसऱ्या वाक्याला सुखदा बरोबर ही वाद घालत असे. त्याची आर्थिक परिस्थिती बघता सुखदा ने नोकरी करणे सुरू केले.

त्यामुळे तोच तिच्या कडून वेळोवेळी पैसे घेत असे. हेही दिवस जातील तो स्थिर होईल म्हणून तेही सहन करत होती सुखदा . पण तो कधीच तिला काय हवे नको बघत नव्हता काही पाहिजे का हे विचारणे तर दूरच. हीच सगळे करत होते आणि परत प्रेम नाही , संबंध नाहीत , बोलणे नाही नात्यात आपलेपणा नाही.

एक तर स्वतच्या आई बाबांना सोडून इकडे सगळ्या लोकांशी जमवून घेता घेता नाकी नऊ येत असे. घरचे सगळे करत होती. पहाटे पाच पासून घरचे काम , स्वैपाक मग कॉलेज , नोकरी परत घरी येता येता भाजी , इतर कामे करून घरी येवून परत स्वैपाक , दुसऱ्या दिवशी ची तयारी हे सगळे करताना आर्थिक स्थैर्य नसल्याने घरचे जे बोलतील ते ही ऐकून घ्यायचे नवरा कधीच कोणाला बोलत नव्हता ..सुखदा ची बाजू घेवून कोणाला बोलणे तर दूरच होते.

या सगळ्यात एव्हढे घर , मोठे कुटुंब असूनही जोडीदाराची साथ नाही त्यातून सुखदाच आयुष्य खूप एकटं होत.मोकळा श्वास नाही , मोकळे बोलणे नाही. कधी बाहेर फिरायला नाही. कधी एखादी आवडती गोष्ट ही घेतली नाही . किंवा तिचे आवडते छंद , आवडत्या गोष्टी , सगळ्या आवडी निवडी माराव्या लागल्या. कोणाकडे जाणे नाही येणे नाही. पैसे नाहीत म्हणून परत कोणाच्या कडे जायला ही नको. नातेवाईक , सण समारंभ याची आवड असून ही सगळ्यापासून अलिप्त राहावे लागत होते. यातून सुखदला आयुष्यात खूप एकटं एकटं वाटू लागलं.

त्यात आई वडिलांचे आजारपणात लवकरच देहांत. माहेरचा ही आधार कायमचा संपला. भाऊ वहिनी कधी बोलावत नसत. कोणाचा च आधार नव्हता ..माहेर ही नाही आणि सासर ही नाही. बरं सगळे सोडून निघून जावे तर जाणार कुठे. राहणार कुठे. या जगात चांगले लोक आहेत तसे वाईट ही . मग कोण चांगले कोण वाईट भेटले तर कसे राहणार. आर्थिक क्षमता कुठून येणारं .कोणी मदत करणार नाही. निदान सासरी राहायला छप्पर आणि झोपायला सुरक्षित जागा आहे असे म्हणून सुखदा तिथेच सगळ्यांच्या असून एकटी राहत होती.

आयुष्यात खूप एकटं एकटं वाटू लागले सुखदाला.

शिक्षण सुरू असल्यामुळे सासू बाई नी स्पष्ट सांगितले तीन चार वर्ष शिक्षण पूर्ण होईपर्यंत मूल होवू द्यायचे नाही. तसेही सगळे एकत्र असतं त्यामुळे मूल होणार तरी कसे. त्यात लग्नानंतर देव दर्शन होईपर्यंत काही नाही असे सांगितले होते. त्यानंतर ही जेव्हा हनिमून करिता गेले तेव्हा सोबत घरची अख्खी कुटुंबीय. का ? तर म्हणे तुम्ही दोघे लहान आहात दिवस असे नाहीत तुम्हाला एकट्याने सोडण्याचे. हा हा हा. म्हणजे तिथे ही दोघांना एकटे, एकत्र सोडले नाही.

तिकडून दोन दिवसांनी आल्यावर सुखदा ची धावपळ इथल्या कॉलेज मध्ये admission घेण्या करिता खेट्टे सुरू झाले. डिस्टिंक्शन असून ही सगळीकडे एडमिशन करिता अडवणूक . का तर काही ना काही टेबल खालून अपेक्षित. तरी सुखदा ने चिकाटीने एक ही पैसा न देता एडमिशन मिळवली. पण तब्बल तीन महिने उशिरा मिळाली . तोपर्यंत अभ्यास बुडलेला.

गावाकडून शहरात आलेली , भाषेत फरक , त्यात वर्गात , कॉलेज मध्ये ग्रूपिझम .. त्यामुळे सुखदा ला कोणी ही मैत्रिणी नव्हत्या सुरुवातीला. पण तिची अभ्यासात असणारी प्रगती , तिच्या नोट्स शिक्षक refer करत . ते बघून मुली हळूहळू मैत्री करिता तिच्या सोबत बोलू लागल्या. त्यातही तिच्याकडून नोट्स मिळाल्या की गरज सरो वैद्य मरो अशीच वृत्ती होती त्या मैत्रिणींची. त्यामुळे मैत्रिणी असून ही त्या केवळ स्वार्थ साधून घेण्या पुरत्या च होत्या. म्हणजे मैत्रिणी असून ही ती आयुष्यात एकटीच होती.

सुखदा सारखे अनेक लोक अवती भोवती सगळे असून खूप एकटे असतात. आपले असे कोणी नसते. नात्याची उब नसते . . कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको तसे अनपेक्षित अनुभव येतात . .

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो .

आपण आपलेपणाने इतरांची काळजी घेतो , कित्येक वेळा स्वतः अनेक गोष्टीत त्याग करून, sacrifice करून , इतरांचे प्रेमाने ,आपुलकीने करतो परंतु आपल्या वेळेला मात्र इतर कोणी अगदी आपले जवळचे कुटुंबीय, नातेवाईक , मित्र मैत्रिणी , जोडीदार ही येत नाहीत, मदत करत नाहीत, साथ देत नाहीत.

अशातून हळूहळू मग आयुष्यात स्वार्थी , केवळ आपला स्वतः चा विचार करणारे आपमतलबी असे जवळचे ही कोणी नको त्यापेक्षा आपण एकटं राहू . कोणाकडून अपेक्षा नकोत. कोणावर हक्क दाखवायला ही नको . आणि तशी जागा ही नसते. तुमचे असे कोणी नसतेच. ध्रुव ताऱ्या सारखे तुमचे अढळ स्थान कोणाच्या आयुष्यात नसते. त्यामुळे सगळे स्वार्थी , स्वतः पुरते मर्यादित विचार करणारे , असे लोक असण्यापेक्षा एकटं जगू आयुष्य असेच वाटते.

आणि तसे एकटं राहण्याची सवय होवून जाते. उलट त्यातून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली जडणघडण करू शकता. कारण सगळे एकटं करायचे, निर्णय ही एकटे घ्यायचे त्यातून निर्णय क्षमता चांगली पक्की होत जाते. बारीक सारीक गोष्टीं सह मोठ मोठ्या गोष्टी एकटे करण्याची सवय लागते. कोणी सोबत नाही म्हणून कधीच काही अडून राहत नाही. उलट पटापट वचार करण्याची क्षमता वाढते. निर्णय घेवून ते लवकरात लवकर अमलात आणण्याची क्षमता वाढते.

आपली कोणाकडून अपेक्षा राहत नाही . आणि इतरांनी ठेवली तरी आपण ती पूर्ण करण्याकरिता जबाबदार राहत नाही. स्वतः पाहिजे तसे आपले आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करतो. परंतु एकच घर असेल त्यात राहत असू तर अनेक गोष्टींवर बंधने येतात. वेळ , कामाची वेळ , घरातले काम इतर जबाबदाऱ्या , मोठ्यांची मन मर्जी सांभाळावी लागते. नाही ऐकले तर परत वाद , दोषारोप , त्यातून परत एकटे राहणेच नशिबात असते.

जसे तोटे आहेत तसे आयुष्यात एकटं राहण्याचे फायदे ही आहेत. पण मनुष्य सामाजिक प्राणी आहे त्यामुळे त्याला आपला समाज , लोक , नातेवाईक , जोडीदार , कुटुंब , मित्रमैत्रिणी यांची साथ असावी असे कायमच वाटत असते. आणि ती मिळाली नाही की ते मोठे घर, घरातल्या वस्तू , दागदागिने सगळे , गाडी , बंगला सगळे असून ही आयुष्यात एकटं फील करतात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!