Skip to content

तुमच्या मेंटल हेल्थला प्रोटेक्ट करण्यासाठी काहींना दुर्लक्षच केलेलं केव्हाही चांगलं.

तुमच्या मेंटल हेल्थला प्रोटेक्ट करण्यासाठी काहींना दुर्लक्षच केलेलं केव्हाही चांगलं.


मेराज बागवान


आज सर्वात जास्त काही महत्वाचं असेल तर ते म्हणजे, ‘आरोग्य’, शारीरिक तसेच मानसिक देखील.शारीरिक दुखणी तशी नवीन नाहीत. पण आजकाल ‘मेंटल दुखणी’ दिवसेंदिवस वाढत आहेत.नैराश्य, भीती,ताण-तणाव,फोबिया,अस्वस्थता,एकटेपणा यांसारखे मानसिक विकार आज प्रत्येक घरात सर्दी-पडशासरखे झाले आहेत.पण ह्या मानसिक आजारांवर उपाय मात्र करणे फार गरजेचे आहे तुमचे मेंटल हेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी.

मेंटल हेल्थ हे बहुदा तुमच्या आजूबाजूच्या माणसांमुळे बिघडते.किंबहुना तुम्हीच काही व्यक्तींकडे अति लक्ष देतात आणि स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडवतात. खरे तर त्या माणसांची चूक नसते,चूक तुमचीच असते की तुम्ही त्यांच्याकडे वारंवार लक्ष देत बसतात.मग ह्यावर उपाय काय? उपाय सरळ आहे, ‘काहींना दुर्लक्ष करायचं’.दुर्लक्ष म्हणजे त्यांचं तुमच्या आयुष्यातील स्थान,महत्व कमी करायचं. अगदी त्यांना आयुष्यातून हद्दपार नाही करायच पण दुर्लक्ष करायचं. त्यांना त्रास देण्यासाठी नव्हे तर स्वतःचा त्रास कमी करण्यासाठी.

तुमच्या संपर्कातील काही जण असे असतात की , तुमचा नेहमी वापर करून घेतात आणि काम होईपर्यंत गोड गोड बोलतात आणि नंतर निघून देखील जातात.तुम्हाला मग सहजीकच वाईट वाटते.पण अशा वेळी, ‘मी इतके केले त्या व्यक्तींसाठी तरी ते निघून गेले’ असा विचार करण्याऐवजी,त्यांचा अति विचार न करता त्यांच्या आयुष्यातून चार हात दूर गेलेले केव्हाही चांगले.यामुळे तुम्ही एक शांतीमय आयुष्य जगू शकतात.

तुम्हाला कुठल्या तरी क्षेत्रांत यश मिळते.अशा वेळी बरेच जण तुमचे कौतुक करतात,अभिनंदन करतात.पण मनापासून कौतुक करणारे हातावर मोजण्याइतकेच असतात.ही वास्तविकता आहे.काही जण वर वर कौतुक करता करता,टोमणे मारून जातात.तुमच्याविषयी त्यांना जळफळाट होतो,तुमचे यश ते पचवू शकत नाही,स्वीकारु शकत नाहीत. काहींचा तर हा स्वभावच असतो.मग अशा वेळी ,तुमची चक्क त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामात ,आयुष्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे.

काही जण सदैव तुमच्या आयुष्यात घुटमळत असतात.कधी तुमची आर्थिक सुबत्ता आहे म्हणून तर कधी तुम्ही सदैव उपलब्ध आहात म्हणून.अशी माणसे ओळखता आली पाहिजेत.कारण कुणी स्वतःहून आपला हा असली चेहरा दाखवत नाही.त्यामुळे वेळीच मी अशी मानसिकता असणारी मंडळी ओळखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आले पाहिजे, स्वतःचे मेंटल हेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी.

अनेक व्यक्तींचा ‘नाही’ न म्हणण्याचा स्वभाव असतो.ते प्रत्येकवेळी इतरांच्या गरजेला उपयोगी पडतात.पण ह्याचा काही जण गैरफायदा देखील घेतात.’तू माझ्यासाठी खूप केलेस, थँक्स’ असं म्हणणं तर दूरच.पण ,’ माझ्यासाठी करतेस /करतोस तर अजून कर’ ही भावना ह्या लोकांची असते.त्यामुळे वेळीच अशा लोकांना आवर घालता आलं पाहिजे.आणि याची सुरवात ‘नाही’ म्हणून केली पाहिजे. अन्यथा तुम्ही ‘गृहीत’ धरले जाल आणि शेवटी तुम्ही एकटेच राहाल,कोणीच तुमच्यासोबत त्यक्षणी असणार नाही.

मेंटल हेल्थ योग्य असेल तर आणि तरच मनुष्य आयुष्यात योग्य निर्णय घेऊ शकतो,पुढे जाऊ शकतो.मेंटल हेल्थ ला हानी पोहचवणारे अनेक जण भेटीतील. पण त्यांच्यावर मात करून पुढे जायला शिकले पाहिजे.’जो तुमच्याशी जसा आहे ,तसेच तुम्ही देखील त्यांच्याशी वागले पाहिजे’.कारण असे केल्यानेच तुमचे मानसिक आरोग्य सुस्थितीत राहील आणि तुमचे स्वत्व, अस्तित्व,तुमची किंमत टिकून राहील.

माणूस अनेकदा बरीच नाती जपत बसतो.पण कोण आपल्याशी खेळत आहे,हे माणसाच्या काही वेळेस लक्षात येत नाही.आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा प्रचंड मानसिक त्रास होतो.माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही.एकमेकांची प्रत्येक माणसाला गरज असते. त्यामुळे माणसं तर जपायला हवीच.पण कोण आपल्या ‘मेंटल हेल्थ’ ला हानी पोहचवत आहे हे देखील समजून घेता आले पाहिजे.

आज वाढत जाणारे मानसिक आजार ( जे उघड डोळ्यांनी दिसत देखील नाहीत) पाहिले की मन खिन्न होते.अगदी सुशिक्षित, सधन,सुसंस्कृत माणसे देखील ह्या मानसिक आजारातून जात आहेत. मानसिक आजारांचे वाढत जाणारे प्रमाण ही एक मोठी सामाजिक समस्या आहे.त्यामुळे आपण स्वतःपासून ह्या अशा आजारांपासुन सुरक्षित राहण्यासाठी एक नवी सुरवात केली पाहिजे आणि इतरांना देखील आदर्श घालून दिला पाहिजे.

‘मेंटल हेल्थ प्रोटेक्ट करणे हे सर्वस्वी स्वतःच्या हातात असते’.प्रयत्न करून पाहा…..

‘ऑल द बेस्ट’!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तुमच्या मेंटल हेल्थला प्रोटेक्ट करण्यासाठी काहींना दुर्लक्षच केलेलं केव्हाही चांगलं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!